' नाही – सेल्फी काढणं हा मानसिक आजार अजिबात नाहीये – InMarathi

नाही – सेल्फी काढणं हा मानसिक आजार अजिबात नाहीये

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

९ जानेवारी २०१६ रोजी, Bandra Bandstand इथे एक २० वर्षीय तरुणी सेल्फी काढण्याच्या नादात मृत्युमुखी पडली. तिला वाचवण्याचा प्रयत्न करणारे रमेश वाळूंज हे देखील लाटांनी ओढल्या गेले आणि मरण पावले.

ramesh-walunj-marathipizza

Image source: deccanchronicle

ह्या घटनेमुळे विवीध माध्यमांमध्ये सेल्फी काढण्याच्या ह्या नवीन ‘व्यसनाबद्दल’ चर्चा सुरु झाल्या आहेत आणि ह्या चर्चांच्या दरम्यान एक खोटी बातमी पसरली आहे – सेल्फी काढणं हा ‘मानसिक आजार’ असल्याची.

खरी गम्मत ही, की ह्या अफवेचं मूळ, २०१४ चं एक जुनं “fake article” आहे 😀

भारतात जरी सेल्फीचं लोण अश्यात पसरलं असलं तरी इतर देशांमध्ये हे आधीपासून सुरु आहे. सेल्फी काढण्याच्या नादात इतर देशांमध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडले आहेत. ह्यावर एक स्वतंत्र Wikipedia पेजच आहे!

ह्या ट्रेंडचा गमतीशीर आढावा घेण्यासाठी The Abodo Chronicles ह्या वेबसाईटने एक satirical article पोस्ट केलं. त्यात त्यांनी अमेरिकन सायकिअॅट्रिक असोसिएशनने सेल्फी काढण्याच्या सवयीला मानसिक रोग म्हटलंय आणि त्या रोगाला “सेल्फायटीस”  असं विचित्र नाव दिल्याची माहिती प्रस्तृत केली.

अर्थात, वेबसाईट स्वतःच आपल्या articles च्या सत्यतेबद्दल खात्री देत नाही.

Adobo च्या “About” page वर लिहिलंय :

your source of up-to-date, unbelievable news. Everything you read on this site is based on fact, except for the lies.

 

आपल्याकडे सेल्फी-अपघात घडायला लागल्यावर उतावीळ लोकांनी गुगल केलं, ही बातमी उचलली आणि पसरवली !

खेदाची गोष्ट ही की विवीध गंभीर चर्चांमध्ये ही अफवा एखाद्या authentic माहितीप्रमाणे वापरली जात आहे.

So, remember – सेल्फीचा अतिरेक हा मूर्खपणा नक्कीच आहे – पण मानसिक आजार नाही.

alex-chacon-selfie-marathipizza

Image source: India.com

योग्य ठिकाणी, योग्य प्रकारे सेल्फी काढायला काहीही हरकत नाही !

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Omkar Dabhadkar

Founder@ इनमराठी.कॉम

omkar has 167 posts and counting.See all posts by omkar

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?