' ‘मंगळयान’ मोहिमेबद्दलच्या ११ अभिमानास्पद गोष्टी माहित असायलाच हव्यात! – InMarathi

‘मंगळयान’ मोहिमेबद्दलच्या ११ अभिमानास्पद गोष्टी माहित असायलाच हव्यात!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू आणि सोनाक्षी सिन्हा या स्टारकास्ट चा मिशन मंगल या चित्रपट सध्या भरपूर चर्चेत आहे आणि बॉक्स ऑफिस वर देखील चांगलं यश मिळवत आहे.

हा चित्रपट भारताच्या मार्स ऑर्बिटर मिशनवर आधारित आहे. चित्रपट जरूर पाहावा असा झालाच आहे.

तो तुम्ही अजून बघितला नसेल, तर जरूर पहा, पण तत्पूर्वी, सर्वांना अभिमान वाटावा असा भारताच्या मंगळयान मोहिमेविषयी काही मनोरंजक गोष्टी तुमच्या समोर आणत आहोत.

१. आपल्या पहिल्या प्रयत्नात, मंगळ ग्रहावर पोहोचणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला.

 

mangalyan-inmarathi
factordaily

२. मंगळयान ही इस्त्रोची पहिली इंटर-प्लॅनेटरी मोहीम होती, मंगळ गाठणारा भारत हा आशिया खंडातील पहिला देश बनला.

 

isro-marathipizza00
isro.org

३. रोजकोसमॉस, नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सीनंतर, मिशन मंगळ यशस्वीरीत्या पूर्ण करणारी “इस्त्रो” ही चौथी अवकाश संस्था आहे.

 

mars inmarathi
Universe Today

४. भारताला मिशन मंगलची किंमत म्हणून फक्त रु. ४५० कोटी मोजावे लागले.

प्रभास आणि श्रद्धा कपूरचा “साहो” चित्रपट तयार करायला तब्बल ३०० कोटी चा खर्च झाला आहे. आपल्या मंगळयान मोहिमेपेक्षा हॉलिवूड चित्रपट जास्त महाग आहेत.

 

mars mission cost inmarathi
U.S. – The Wall Street Journal

५-६ वर्षांपूर्वी आलेल्या “ग्रॅव्हिटी” या सायन्स फिक्शन चित्रपटाचा खर्च या मोहिमेपेक्षा कितीतरी जास्त होता. भारताची मंगळ मोहीम आजपर्यंतची सर्वात कमी खर्चाची मोहीम आहे.

५. इतक्या गौरवशाली आणि विशाल प्रकल्पाचा खर्च आपल्या विशाल देशाच्या प्रत्येक नागरिकाकडून घेतला असता तर, प्रत्येक भारतीयाला फक्त चार रुपये द्यावे लागले असते.

 

mission mars inmarathi
Zee News

६. जरी डिझाइन करतांना मिशन मंगलचे आयुष्य फक्त सहा महिनेच होते, परंतु हे अंतराळ यान अद्यापही चांगल्या स्थितीत आहे आणि आपलं कार्य चोख पद्धतीने करत असून मंगळावरुन माहिती पाठवत आहे.

 

mars inmarathi
Livemint

७. या एकमेवाद्वितीय, यशस्वी मंगळ अंतराळ यानाचे चित्र भारताच्या २००० रुपयाच्या नोटेच्या मागच्या बाजूवर आहे.

 

2000 note inmarathi
Patrika

८. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण, मंगळयानाचे वजन वजन फक्त १,३५० किलोग्राम आहे जे स्पोर्ट्स युटिलिटी व्हीकल (एसयूव्ही) पेक्षा कमी आहे.

 

mma inmarathi
Wikipedia

९. मंगलयानमध्ये मिथेन वायूचे अस्तित्व जाणून घेणारी सेन्सर यंत्रणा बसवलेली आहे. अशा प्रकारे, जर तिथल्या वातावरणात मिथेनचा अंश जरी मिळाला तरी, मंगळावर जीवनाच्या सर्वात प्राथमिक स्वरूपाचे अस्तित्व सिद्ध होईल.

 

mma 1 inmarathi
ISRO

१०. भारताला संपूर्ण यान उत्पादन प्रक्रियेस अवघ्या १५ महिन्यांचा कालावधी लागला; तर, नासाच्या मॅव्हन (मार्स ऑर्बिटर) ला तब्बल पाच वर्षे लागली.

 

mma 2 inmarathi
Spaceflight Now

११. मंगळ पृथ्वीपासून सुमारे ६७० दशलक्ष किलोमीटर अंतरावर आहे. एकूण खर्च बघता, मंगळयानच्या प्रति किलोमीटरच्या प्रवासाची किंमत ७.७ रुपये आहे, आपल्या पुण्यातल्या ऑटो-रिक्षा ग्राहकांकडून जे शुल्क आकारतात त्यापेक्षा कमी!

 

mma 3 inmarathi
Teslarati.com

तर या होत्या भारताच्या “मिशन मार्स” बद्दल काही अविश्वसनीय गोष्टी.

उण्यापुऱ्या ७० वर्षांपूर्वी स्वतंत्र झालेल्या भारताने अतिशय तटपुंज्या संपत्तीच्या बळावर जे जे घडवून दाखवलंय – त्या सर्वांचं प्रतिनिधित्व मंगळ-यान मोहीम करते, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?