या १० सुपरहिट हिंदी चित्रपटांची खरी कहाणी ‘वेगळ्याच वाटेने’ आलेली आहे
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
हल्ली सेट मॅक्स असो कि झी सिनेमा, स्टार गोल्ड असो कि अन्य कोणतेही हिंदी चॅनेल… यामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला साऊथ इंडियन चित्रपट लागलेले दिसतील.
हे हिंदी चॅनेल आहेत कि दक्षिणेतील कोणतेतरी चॅनेल आहेत असा प्रश्न पडावा इतक्या प्रमाणात हे दाक्षिणात्य चित्रपट सध्या हिंदी वाहिन्यांवर दिसत असतात.
अर्थात इतक्या प्रमाणावर हे चित्रपट दाखवतात त्या अर्थी तितक्या प्रमाणात हे सिनेमे आवडणारा एक वर्ग हि असणारच. किंबहुना तो आहे देखील.
याच एक महत्वपूर्ण कारण म्हणजे दाक्षिणात्य चित्रपटांमधील आशय. म्हणजे हा आशय खूप गांभीर्यपूर्ण नसला तरी असा आहे कि चित्रपट बघणाऱ्यांचं मनोरंजन तर होतच पण पैसा देखील वसूल होतो. म्हणूच असेल कदाचित कि हे चित्रपट जगभरात चांगली कमाई करत आहेत.
याच यशाला भुलून बॉलीवूड फिल्म मेकर्सनी या चित्रपटांना हिंदीत डब केले. तस पाहायला गेल तर हि परंपरा फार जुनी आहे. अगदी अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना यांनी देखील कितीतरी साऊथ मधून आलेल्या चित्रपटांच्या हिंदी व्हर्जन मध्ये काम केले आहे.
तर चला एक नजर टाकू अशाच काही दाक्षिणात्य चित्रपटांच्या हिंदी रिमेक वर…
१. दृश्यम
अजय देवगण व तब्बु यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट याच नावाच्या मल्ल्याळम चित्रपटाचा हिंदी व्हर्जन आहे. निशिकांत कामत यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांनी चांगली दाद दिली होती.

२. कबीर सिंग
कबीर सिंग चित्रपट दाक्षिणात्य फिल्म अर्जुन रेड्डी चा हिंदी रिमेक होता. शाहिद कपूर नायक असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. अर्जुन रेड्डीचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वेंगा यांनीच या चित्रपटाचे देखील दिग्दर्शन केले आहे.

३. सिम्बा
हा चित्रपट तेलगू फिल्म टेम्पर चा हिंदी व्हर्जन आहे. या चित्रपटामध्ये रणबीर सिंगची भूमिका चाहत्यांना खूप आवडली. सिम्बाचं दिग्दर्शन रोहित शेट्टी यांनी केलं होत.

४. गजनी
ए.आर. मुर्गादास दिग्दर्शित व याच नावाने आलेल्या तामिळ चित्रपटाचा हिंदी व्हर्जन म्हणजे अमीर खानचा गजनी चित्रपट होय.
या फिल्म मध्ये अमीर खान आणि असीन दोघे लीड रोल मध्ये होते. असीनला या चित्रपटासाठी बेस्ट फ़ीमेल डेब्यू चा फिल्म फेयर अवॉर्ड मिळाला होता.

५. वॉन्टेड
सलमानच्या आटत चाललेल्या करियरला पुन्हा उभारी देण्याचं काम वॉन्टेड चित्रपटाने केले.
२००६ मध्ये आलेल्या तेलगू फिल्म पोकिरीचा हा हिंदी रिमेक होता. या चित्रपटाचे दिग्दर्श प्रभू देवा यांनी केले होते. शिवाय महेश बाबू आणि इलियाना डिक्रूज लीड रोल मध्ये होते.

६. हाऊसफुल
१९९८ मध्ये कमल हसनचा तमिळ चित्रपट Kaathala Kaathala प्रदर्शित झाला होता. याच चित्रपटाचा हिंदी व्हर्जन आहे हाऊसफुल सिरीज मधला पहिला चित्रपट.
तामिळ चित्रपट निर्माता P. L. Thenappan यांनी या चित्रपटाविरोधात खटला दाखल केला होता. पण याचा प्रदर्शनावर काही परिणाम झाला नाही.

७. सिंघम
सिंघम चित्रपमध्ये अजय देवगण ने साकारलेल्या मराठमोळ्या बाजीराव सिंघमची भूमिका कोण विसरेल?
हा चित्रपट दाक्षिणात्य फिल्म सिंघमचा हिंदी व्हर्जन होता. पण याच्या दुसऱ्या पार्टची कथा मात्र ओरिजिनल होती.

८. राऊडी राठोड
अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिंन्हाचा हा सुपरहिट चित्रपट २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या Vikramarkudu या तेलगू चित्रपटाचा रिमेक होता. याचे दिग्दर्शन प्रभू देवा यांनी केले होते. यातील चिंता ता चिंता चिंता…हे गाणे खूप गाजले होते.

९. किक
दिग्दर्शक म्हणून साजिद नाडियावाला याने दिग्दर्शन केलेला किक हा पहिला चित्रपट. सलमान खान असल्यामुळे या चित्रपटाला प्रेक्षकांनी खुप पसंद केले. हा चित्रपट तामिळ फिल्म किकचा रिमेक होता.

१०. भूलभुलैया
अक्षय कुमारचा हा सुपरहिट चित्रपट मल्याळम फिल्म Manichitrathazhu चा हिंदी रिमेक होता. या चित्रपटात मोहनलाल आणि शोभना लीड रोल मध्ये होते.
यावरूनच – आपल्या हिंदी फिल्म इंडस्ट्रीत एवढे हिट झालेले चित्रपट केवढ्या मोठ्या प्रमाणात दाक्षिणात्य चित्रपटांचे ‘रिमेक’ असतात याची कल्पना येते.

===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.