' जगभरात ब्रेकफास्टसाठी आवडीने खाल्ल्या जाणा-या या पदार्थाची जन्मकथा आवर्जून वाचावी अशीच आहे!

जगभरात ब्रेकफास्टसाठी आवडीने खाल्ल्या जाणा-या या पदार्थाची जन्मकथा आवर्जून वाचावी अशीच आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कॉर्न फ्लेक्स म्हटलं की, डोळ्यापुढे केलॉग्स कंपनीचे मक्याचे पोहेच येतात. आपण भारतीय लोक सकाळच्या न्याहारीला पोहे, उपमा, शिरा, थालीपीठ, घावनं ,सांजा , लापशी , पेज अगदी काही नाही तर मऊ भात खात होतो.

पण ग्लोबलायझेशनमुळे आपल्याकडे सुद्धा जगभरात बहुतांश सगळीकडे सकाळच्या नाश्त्याला खाल्ले जाणारे केलॉग्सचे कॉर्न फ्लेक्स आले आणि हळूहळू लोक आपल्याकडील पारंपरिक न्याहारी सोडून झटपट तयार होणारे कॉर्न फ्लेक्स खाऊ लागले.

लहान मुले सुद्धा नुसते दूध न पिता त्यात चॉकोज मागू लागली आणि मोठी माणसे वजन कमी करण्यासाठी केलॉग्स स्पेशल के चॅलेंज घेऊ लागली. (अर्थात त्याने वजनात किती फरक पडला हा एक संशोधनाचा विषय आहे)

केलॉग्सने नंतर विविध फ्लेवर्सचे कॉर्न फ्लेक्स बाजारात आणले. मग काळाची पावले ओळखून व्हीट फ्लेक्स, ओट फ्लेक्स, मल्टिग्रेन फ्लेक्स सुद्धा आणले.

 

corn flexs inmarathi
a.william-reed.com

केलॉग्सच्या पावलावर पाऊल ठेवत अनेक कंपन्यांनी विविध प्रकारचे, विविध चवींचे, विविध धान्यांचे फ्लेक्स बाजारात आणले. पण कॉर्न फ्लेक्सची सुरुवात करण्याचे श्रेय केलॉग्स कंपनीचे जन्मदाता जॉन हार्वे केलॉग्स ह्यांनाच जाते.

१८९४ साली जॉन हार्वे केलॉग्स ह्यांनी पहिल्यांदा कॉर्न फ्लेक्स बनवले तेव्हा ते त्यांनी मिशिगन मधील बॅटल क्रिक सॅनिटेरियम मधील रुग्णांसाठी एक हलके आणि पौष्टिक पदार्थ म्हणून तयार केले होते.

जॉन तेव्हा ह्या ठिकाणी सुपरिटेन्डन्ट म्हणून काम करत होते. त्यांना वाटले की त्यांनी कॉर्न फ्लेक्स हा एक पौष्टिक पदार्थ तयार केला आहे. त्या रुग्णांनाही हा नवा पदार्थ आवडला.

नंतर डॉक्टर जॉन ह्यांच्या भावाने म्हणजे विल केलॉग्स यांनी मोठ्या प्रमाणावर कॉर्न फ्लेक्स बनवण्यासाठी आणि सामान्य लोकांना खाता यावे म्हणून ते बाजारात आणण्यासाठी केलॉग्स कंपनी तयार केली. कॉर्न फ्लेक्स बनवण्याच्या ह्या पद्धतीचे त्यांनी १८९६ साली पेटंट घेतले.

 

john harvey kellogg InMarathi

डॉक्टर जॉन आणि विल कीथ केलॉग्स हे १९८४ साली अमेरिकेत मिशिगन येथील बॅटल क्रिक ह्या लहानश्या शहरात एक सॅनिटेरियम आणि हेल्थ स्पा चालवत होते. जॉन तेथील अधीक्षक होते तर विल कीथ जमाखर्च सांभाळत असत.

ह्या सॅनिटेरियममध्ये रुग्णांवर विविध उपचार केले जात असत. तसेच त्यांच्या व्यायाम आणि आहाराची काळजी घेतली जात असे. त्यांना वेळोवेळी मसाज दिले जात असत.

त्यांच्या ह्या सॅनिटोरियममध्ये १९१० आणि १९२० च्या दशकात राष्ट्राध्यक्ष वॉरेन हार्डिंग, अभिनेता जॉनी वीसम्युलर, हेन्री फोर्ड, अमेलिया इअरहार्ट मेरी टॉड लिंकन ह्यांच्यासारखी मोठी आणि प्रसिद्ध माणसे देखील उपचार घेत होती.

 

worren harding inmarathi
inmarathi.com

हे दोन्ही केलॉग्स बंधू अत्यंत धार्मिक होते. आणि ते सेव्हन्थ डे ऍडव्हेण्टिस्ट चर्चचे कट्टर अनुयायी होते. ते बायबलची शिकवण अत्यंत कट्टरपणे आणि कसोशीने पाळत असत. त्यांच्या अनेक उपचार पद्धतींवर त्यांच्या धार्मिक श्रद्धांचा पगडा होता.

त्यांची अशी श्रद्धा होती की शरीर हे एक मंदिर आहे आणि त्याचे पावित्र्य जपले गेलेच पाहिजे.

त्यामुळे ते स्वतः सुद्धा कॅफिन, मद्य आणि निकोटीन पासून चार हात लांब राहत असत आणि रुग्णांना सुद्धा ह्या तामसिक पदार्थंपासून लांब ठेवण्याचा त्यांचा कटाक्ष होता. ते स्वतः कट्टर शाकाहारी होते.

डॉक्टर जॉन हे इतके कट्टर ऍडव्हेण्टिस्ट होते की त्यांची श्रद्धा होती की “सेक्स” सुद्धा एक गलिच्छ आणि घातक प्रकार असून शरीराचे पावित्र्य जपण्यासाठी “सेक्स” टाळला पाहिजे असा त्यांचा विचार होता. शारीरिक संबंध तर लांब राहिले, पण लोकांनी हस्तमैथुन ह्या गलिच्छ प्रकारापासून लांब राहायला हवे असा त्यांचा प्रयत्न असायचा.

जॉन ह्यांनी विवाह तर केला. पण ते कायम त्यांच्या पत्नीपासून लांबच राहिले. त्यांनी तिला स्पर्श सुद्धा केला नाही. इतकेच काय तर त्यांच्या खोल्या सुद्धा वेगवेगळ्या होत्या. त्यांनी त्यांची सगळी मुले दत्तक घेतली होती.

केलॉग्स हे त्यांच्या ब्रह्मचर्याच्या पुरस्कारामुळे, शरीरसंबंधांचा निषेध केल्यामुळे आणि हस्तमैथूनाच्या भयावह परिणामांबद्दल जनजागृती केल्यामुळे देशभरात प्रसिद्ध झाले होते.

 

john kelloge inmarathi
newspunch.com

त्यांच्या मते हस्तमैथुनामुळे अपस्मार, मूड स्विंग आणि स्मृतिभ्रंश सुद्धा होतो. “प्लेग, चेचक, युद्ध ह्या कशामुळेही जितके नुकसान होत नाही तितके नुकसान हस्तमैथुन केल्यामुळे होते. लोक अक्षरश: स्वतःच्याच हाताने स्वतःचा जीव घेतात.” असे जॉन केलॉग्स म्हणत असत.

त्यांच्याकडे हा “भयावह आजार” रोखण्यासाठी अनेक जालीम उपाय होते. “Piercing the foreskin with silver wires to prevent erections, using carbolic acid to burn the clitoris so it wouldn’t be touched” असे रामबाण उपाय त्यांच्याकडे होते.

तसेच शाकाहारी जेवणामुळे सुद्धा शारीरिक संबंध किंवा हस्तमैथुनाची इच्छा कमी होते अशी त्यांची मान्यता असल्यामुळे ते शाकाहाराचे खंदे पुरस्कर्ते होते.

त्यांच्या मते मांस आणि मसालेयुक्त पदार्थ खाल्ल्याने मनुष्याच्या मनात वासना तयार होतात आणि म्हणूनच त्यांच्या सॅनिटेरियममध्ये ते मांस आणि मसालेदार पदार्थ रुग्णांना देत नसत. रुग्णांच्या मनात “भलतेसलते” आणि “घाणेरडे” विचार येऊ नये म्हणून रुग्णांना बिन मसाल्याचे बेचव जेवण (अख्खे धान्य आणि सुकामेवा, बिया) देण्यात येत असे.

 

corn flexs inmarathi
123rf.com

त्यांना ह्याची प्रेरणा प्रेस्बिटेरियन धार्मिक धर्मांध सिल्वेस्टर ग्रॅहम ह्यांच्याकडून मिळाली. ह्या ग्रॅहम ह्यांनीच लोकांमधील शरीरसंबंधाची व हस्तमैथुनाची इच्छा कमी व्हावी म्हणून अख्ख्या गव्हाच्या (बेचव) ग्रॅहम क्रॅकरचा शोध लावला.

त्यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन केलॉग्ज ह्यांनी “अँटी सेक्स फूड” बनवण्याच्या प्रयत्नात मक्याचे पीठ आणि ओट्सचे पीठ एकत्र करून त्यात काही सुकामेवा घातला आणि नंतर त्या गोळ्याची बिस्किटे बनवली. आणि नंतर त्याचे तुकडे करून त्यांना “ग्रॅन्युला” असे नाव दिले.

पण हा प्रकार केलॉग्ज ह्यांच्या आधीच एका माणसाने बनवला होता. आणि त्याने केलॉग्जला कारवाईची धमकी दिली म्हणून केलॉग्जने त्यांच्या पदार्थाचे नाव “ग्रॅनोला” असे केले. त्यानंतर केलॉग्ज बंधूंनी अनेक “सात्विक” पदार्थांचे प्रयोग केले.

एक दिवस त्यांना गव्हाचा काहीतरी पदार्थ तयार करताना अचानक बाहेरून बोलावणे आले आणि ते पदार्थ तसाच ठेवून गेले. परत आल्यानंतर त्यांनी तो गहू रोलर्स मधून फिरवला आणि प्रत्येक गव्हाचे पोहे तयार झाले होते.

त्यांना वाटले हा पदार्थ अतिशय पौष्टीक आणि सात्विक आहे. १८९८ साली त्यांनी हाच प्रयोग गव्हाऐवजी मक्यावर केला आणि “कॉर्न फ्लेक्स” चा जन्म झाला.

 

corn flexs inmarathi
shopify.com

जॉन केलॉग्ज ह्यांनी लगेच हे कॉर्न फ्लेक्स त्यांच्याकडील रुग्णांना देणे सुरु केले जेणे करून त्यांची शरीरसंबंधांची इच्छा कमी होईल. विल ह्यांचा मात्र धर्माकडे कल कमी असून व्यापाराकडे जास्त कल होता.

त्यामुळे त्यांनी त्यात व्यापाराच्या दृष्टीने विचार केला आणि कॉर्न फ्लेक्सची लाकडाच्या भुश्यासारखी चव बदलण्यासाठी त्यात थोडी साखर घालण्याविषयी सुचवले.

अर्थातच जॉन ह्यांना हा सल्ला पटला नाही. आणि ह्या कॉर्न फ्लेक्सचे पेटन्ट त्यांनी घेतले. काही काळानंतर व्हीट फ्लेक्सचे उत्पादन बंद झाले आणि सगळे लक्ष कॉर्न फ्लेक्सवरच केंद्रित करण्यात आले.

सुरुवातीला त्यात साखर नसल्याने फार कुणी कॉर्न फ्लेक्स विकत घेत नसत. नंतर वैतागून १९०६ साली व्हीके केलॉग्स ह्यांनी स्वतःच्या भावाकडून कॉर्न फ्लेक्स चे हक्क विकत घेतले. पण लोकांना हे ब्रेकफास्ट सिरियल्स विकायचे असल्यास त्यांची चव बरी असायला हवी म्हणून त्यात साखर घातली गेली.

दोन्ही भावांत “केलॉग्ज” नावावरून भांडण झाले आणि नंतर व्हीके केलॉग्ज ह्यांनी त्यांच्या कंपनीचे नाव केलॉग सिरीयल कंपनी असे केले.

 

kellog brother inmarathi
media.npr.org

त्यांनी १९१५ साली ब्रॅन फ्लेक्स सुद्धा बाजारात आणले आणि १९२७ साली राईस क्रिस्पीज सुद्धा आले. अजूनही झटपट खाता येणारा पदार्थ म्हणून कॉर्न फ्लेक्स आणि राईस क्रिस्पीज जगभरात घराघरांत सकाळच्या नाश्त्याला खाल्ले जातात.

आजही अमेरिकेत कॉर्नफ्लेक्स बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये केलॉग्जच सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे. भारतात सुद्धा कॉर्न फ्लेक्स म्हटले की लोकांना केलॉग्जच माहिती आहे.

तर अश्या रीतीने लोकांना ब्रह्मचर्याकडे वळवण्यासाठी तयार करण्यात आलेले कॉर्न फ्लेक्स आज लाखो लोक रोज सकाळी नाश्त्याला खातात. तरीही जगाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे हे बघून जॉन केलॉग्जचा आत्मा मात्र नक्कीच अस्वस्थ होत असणार!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?