' राज ठाकरेंच्या ज्या केसची चौकशी चालू आहे ती कोहिनुर मिल केस समजून घ्या – InMarathi

राज ठाकरेंच्या ज्या केसची चौकशी चालू आहे ती कोहिनुर मिल केस समजून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

कोहिनुर बिल्डींग केससंदर्भात इडीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) प्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे सुपुत्र उन्मेष यांना नोटीस बजावली असून त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सुनावले आहे.

आयएल अँड एफएस ग्रुपचे कर्ज आणि कोहिनुर सिटीएनएलमध्ये ८५० कोटींपेक्षा जास्त इक्विटी गुंतवणूक केल्या प्रकरणी त्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहे. दादर मध्ये कोहिनूर स्क्वेअर तोवार नावाची कंपनी सध्या उभी राहत आहे.

मराठी माणसासाठी लढणारे आणि मराठी भाषेवर प्रेम असणारे राजकारणी अशी राज ठाकरे यांची राजकीय ओळख असली तरी, बिझनेसमध्ये मात्र त्यांना फक्त पैशाचीच भाषा समजते, असे दिसते.

कोहिनूर सिटीएनएल इडीच्या निगराणीत बऱ्याच दिवसापासून होती कारण, आयएल अँड एफएसच्या थकबाकीदारांच्या काही प्रमुख नावांमध्ये यांच्या नावाचा देखील समावेश आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार त्यांनी बेकायदेशीररित्या १३५ कोटी रुपये थकवले आहेत.

कोहिनूर सिटीएनएल मधील समभागाचे नमुने आणि त्यातील गुंतवणुकीवरही इडीची नजर होती. उन्मेष, ठाकरे आणि आणखी एक पार्टनर अशी तिघांनी मिळून ही कंपनी स्थापन केली आणि ४२१ कोटी रुपयांमध्ये त्यांनी कोहिनूर मिल नं.३ खरेदी केली.

 

kohinoor-square Inmarathi
MyMahanagar

आयएल अँड एफएसने यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यात २२५ कोटी रुपये गुंतवले होते. परंतु, २००८ मध्ये आयएल अँड एफएसने बेकायदेशीररित्या आपले शेअर फक्त ९० कोटी रुपयांना विकले ज्यामूळे त्यांना फार मोठा तोटा सहन करावा लागला.

याच वर्षी ठाकरेंनी देखील आपला शेअर विकून त्या टीम मधून ते बाहेर पडले. नंतर आयएल अँड एफएसने कोहिनूर सिटीएनएलला कर्ज देखील दिले ज्याची परतफेड करणे कंपनीला शक्य झाले नाही.

२०१७ मध्ये कोहिनूर सिटीएनएलने कोहिनूर स्क्वेअरच्या परिसरातील काही भाग आयएल अँड एफएसच्या थकीतकर्जापैकी ५०० कोटी रुपयांची परतफेड करण्यासाठी म्हणून विकण्याचा करार केला.

त्यानंतर आयएल अँड एफएसने पुन्हा कोहिनूर सिटीएनएलला १०० कोटी रुपयांचे कर्ज दिले ज्याची परतफेड कंपनी करू शकली नाही. उन्मेषचा कोहिनूर ग्रुपचे कोहिनूर सिटीएनएलवर कसलेही नियंत्रण नाही सध्या या कंपनीचे नियंत्रण प्रभादेवीमधील एका दुसऱ्या कंपनीकडे देण्यात आले आहे.

आयएल अँड एफएसच्या मनी लॉन्ड्रिंग केस मध्ये इडीने त्यांच्या माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर असे आरोप ठेवलेत की, त्यांनी योग्य ती काळजी न घेता विविध खाजगी कंपन्यांना कर्ज वितरीत केले आहेत.

 

IL and FS Inmarathi
Hindustan

असे कर्ज देताना पुरेसे तारण न घेता आर्थिकदृष्ट्या अडचणीत असणाऱ्या कंपन्यांना कर्ज दिले जात असे, असाही आरोप केला जात आहे.
ठाकरेंचे बिझनेस पार्टनर आणि मातोश्री इन्फ्रास्ट्रक्चरचे चेअरमन राजन शिरोडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा महिन्यांपूर्वीच ते या प्रोजेक्ट मधून बाहेर पडलेत आणि त्यांचा शेअर विकून त्यांनी ६२ कोटींचा फायदा कमावला आहे.

परंतु, बँकर्स आणि रिअल इस्टेट मधील लोकांच्या मते यात याच्या पाचपट फायदा राज ठाकरेंना झाल्याचे दबक्या आवाजात बोलत आहेत. २००५ मध्ये ८८ कोटी रुपये प्रती हेक्टर दराने ४.८ एकरचा हा प्लॉट ४२१ कोटी रुपयांना खरेदी करण्यात आला होता.

यामध्ये ठाकरे हे मातोश्रीचे संचालक होते, दुसरा पार्टनर होता शिवसेनेचे नेते मनोहर जोशीचा कोहिनूर ग्रुप आणि तिसरी कंपनी होती इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्विसेस.

२००५ मध्ये जेंव्हा एनटीसीने ही मिल ब्लॉक केल्यानंतर मुंबई आणि दिल्लीतील अनेक बिल्डर्सनी ही जागा खरेदी करण्यात रस दाखवला होता. प्रचंड स्पर्धे नंतर प्रत्यक्षात तीनच बिल्डर लिलावात उतरले आणि कोहिनूर ग्रुपने ही बिल्डींग विकत घेतली.

यामध्ये सहभागी झालेले दुसरे दोन बिल्डर होते, वरून इंडस्ट्रीज (बोली ४११.११ कोटी) आणि आकृती निर्मन (बोली ३५५ कोटी). २००५ मध्ये या जागेची खरेदी झाल्यानंतर कॉंग्रेसचे खासदार संजय निरुपम यांनी मादागास्कर मध्ये जमा केलेल्या फंड या व्यवहारासाठी वापरल्याचा आरोप केला होते.

 

kohinoor-square-and-raj-thackeray Inmarathi
TV9 Marathi

यावर मनोहर जोशींनी हा पैसा बँक आणि खाजगी गुंतवणूकदारांकडून उभा केला असल्याचे उत्तर दिले होते. एप्रिलच्या दरम्यान मातोश्री या प्रोजेक्ट मधून बाहेर पडली तेंव्हा कंपनीची जागा आणि इमारत धरून १,०५० कोटी रुपयांची मालमत्ता होती.

तिन्हीपैकी प्रत्येक पार्टनरचा समान म्हणजे एक तृतीयांश हिस्सा होता. मातोश्रीने एक तृतीयांश हिश्यावर दावा केला असल्यास ४२१ कोटी चा तिसरा हिस्सा आम्ही वरचे मर्जीन मिळून नक्कीच ही रक्कम ६२ कोटींपेक्षा जास्त होते.

मातोश्री या ग्रुपमधून बाहेर का गेली हे सांगत असताना, शिरोडकर म्हणाले, “आम्ही मॉल बांधण्याचा प्लॅन केला होता पण, नंतर आम्हाला जाणवलं की ते सत्यात उतरू शकत नाही.

कारण, भाड्याने देण्याच्या किंमती अचानक कमी झाल्या होत्या. २०० स्क्वे.फुट पेक्षा खाली जागा असेल तर, त्याला ६००रु.प्रती स्क्वे.फुट भाडे लावण्यात आले. पहिला मजाला बांधून झाल्यावर आमच्या लक्षात आले की, इतक्या कमी भाड्यात मॉलसाठी जागा देणे परवडत नाही.

अचानक नियोजन बदलल्याने बांधकाम अर्धवट स्थितीच थांबलेले आहे. आत्ता त्याच जागी एक सिंगल कमर्शिअल टॉवर बांधण्याचे नियोजन सुरु असल्याची माहिती कोहिनूर ग्रुपचे उन्मेष जोशी यांनी दिली.

मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी मात्र भाजपवर सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. “लोकसभा निवडणुका होण्यापूर्वी आणि निवडणुकी दरम्यान देखील राज ठाकरे सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका करत होते.

 

Unmesh Joshi Inmarathi
Pudhari

भाजपच्या विरोधात आवाज उठवणारे ते एकमेव विरोधक आहे. त्यांना आवाज दाबण्यासाठीच हा प्रयत्न करण्यात आला आहे. दुसरे काही नसून हे भाजपचे सुडाचे राजकारण आहे,” असे ते म्हणाले.

शेतकऱ्यांचे नेते आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी म्हणाले,

“राज ठाकरे यांनी भाजप विरोधात आवाज उठवला होता आणि त्यांनी भाजपशी वैर घेतले होते. सध्या ते इव्हीएमच्या घोटाळ्याबद्दल ही आवाज उठवत आहेत. इव्हिएम हटाव मोहिमेचे नेतृत्व करत आहेत. म्हणूनच सरकारने त्यांना लक्ष केले आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?