' घरच्या घरी बनवलेल्या भारतीय बिअरच्या ब्रॅंडची ही यशस्वी घोडदौड अनेक उद्योजकांना प्रेरणा देणारी आहे

घरच्या घरी बनवलेल्या भारतीय बिअरच्या ब्रॅंडची ही यशस्वी घोडदौड अनेक उद्योजकांना प्रेरणा देणारी आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

=== 

मद्य हा आजही कित्येकांचा जिव्हाळ्याचा विषय! फक्त नाश करण्यासाठी म्हणून नव्हे तर या मद्याची अनोखी चव चाखणे कित्येकांना आवडते म्हणूनही काही मद्याचे चाहते असतात.

 

beer for car-inmarathi
thedailymeal.com

 

भारतातील अगदी पुराणातून देखील सुरा आणि मदिरेच्या जादूची सुरेख वर्णने वाचायला मिळतात.

मद्यपान करणे हा तर आज स्टेट्स सिम्बॉल बनला आहे. तरुणांपासून चक्क वृद्धांपर्यंत या मद्याचे हजारो शौकीन भेटतील.

मग अनेक लोकांचा हा शौकच एखाद्याला नवीन काही निर्माण करण्याची प्रेरणा देतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

जसे की प्रभातेज भाटीया या २७ वर्षाने केवळ भारतीयांना वेगवेगळ्या बिअरची चव कशी असते हे कळावे आणि त्याची मजा घेता यावी म्हणून स्वतःची बिअर कंपनी सुरु केली.

भारतातील बिअर मार्केट मध्ये आता, बिरा९१, सिंबा आणि व्हाईट ऱ्हिनो अशा देशी ब्रॅंड्सची चलती आहे. बिअर सारखी फॉरेन लिकर आता भारतात देखील बनवली जाते.

छत्तीसगढच्या दुर्ग सारख्या खेड्यात देशी बिअर बनवणारी पहिली भारतीय कंपनी सुरु झाली आणि पाहता पाहता हिचा व्याप इतका वाढला आहे की फक्त तीन वर्षांत या कंपनीमध्ये १२५ कोटींची उलाढाल सुरु आहे.

 

prabhatej bhatiya inmarathi
entrepreneur.com

 

सिंबा बिअर आता देशातील मोठमोठ्या शहरात सहज उपलब्ध होते. दिल्ली, मुंबई, गोवा, बेंगळूरू सारख्या शहरात देखील प्रत्येक बारच्या शेल्ववर ही बिअर दिसतेच.

छत्तीसगढचा रहिवासी असणाऱ्या २७ वर्षीय प्रभातेज सिंग भाटीयाने राज्यातच स्वतःचे मद्यपानगृह सुरु करण्याचे ठरवले. भाटीया कुटुंब १९४८ पासून दारूचा व्यवसायात काम करत आहे.

२०१६ साली कंपनीची सुरुवात झाली. सुरुवातीला ‘सिंबा स्ट्रॉंग’ ही एकमेव बिअर सुरु करण्यात आली. त्यांनतर कंपनीने लॅगर, वीट आणि स्टाउट अशी आणखी तीन वेगवेगळे बिअर प्रकार बाजारात आणले.

दुसऱ्याच वर्षी कंपनीने ७६ कोटी रुपयांचा नफा कमावला. तिसऱ्या वर्षांत तर कंपनीच्या प्रगतीची ट्रेन सुसाट निघाली.

२०१८-२०१९ मध्ये कंपनीने १२५ रुपयांचा नफा मिळवला. इतक्या कमी वेळेत कंपनीने घेतलेली झेप निव्वळ आश्चर्यजनक आहे.

simba beer inmarathi
discoverindore.wordpress.com

 

देशाच्या वेगवेगळ्या भागात सध्या हा ब्रॅंड पोचला आहेच पण, प्रभातेजचे समाधान एवढ्यावरच झालेले नाही छत्तीसगढ प्रमाणेच देशाच्या विविध भागात त्याला आपले हे मद्यपानगृह पोचवायचे आहे.

छत्तीसगढ नंतर आता त्याचे लक्ष्य आहे अरुणाचल प्रदेश.

भारताच्या पूर्व भागात तो सिंबाची पहिली ब्रांच सुरु करणार आहे. यांनतर हळूहळू त्याला संपूर्ण देशात हा व्यवसाय पोचवायचा आहे.

सध्या सिंबाला फक्त ‘बिरा९१‘ हा एकाच ब्रॅंडशी स्पर्धा करावी लागत आहे. सिंबा प्रमाणेच बिरा९१ देखील देशी ब्रॅंड आहे.

प्रभातेज सांगतो,

किमतीमध्ये आम्ही एकाच लेवलवर आहोत पण फक्त आमच्या क्वाटिंटीमध्ये थोडा फरक आहे. मला फक्त भौगोलिक व्याप वाढवणे एवढाच माझा उद्देश नाही. भारतात बिअरप्रेमीसाठी बिअरचे आणखी वेगवेगळे नमुने देणे हे देखील माझे स्वप्न आहे,” 

युकेतून पदवी घेतलेल्या प्रभातेजच्या हे लक्षात आले की, भारतात मद्यपान केले जाते पण, प्यायल्या जाणाऱ्या मद्याचा दर्जा अगदीच सुमार दर्जाचा आहे.

तेव्हा हा दर्जा सुधारण्यावरच आपण भर द्यावा असे त्याला वाटले. तसेच इथे बिअरचे वेगवेगळे प्रकार देखील मिळत नाहीत हे ही त्याने ओळखले.

 

prabhatej bhatiya 1 inmarathi
hungryforever.com/

“बिअर किंवा कोणतेही मद्य हे फक्त तुम्हाला नाश चढण्यासाठीच असते हा एकच समज इथे प्रचलित आहे. नाश चढल्यावर आपण हवेत असतो आणि हाच अनुभव घेण्यासाठी म्हणून फक्त काही जन मद्य पितात.

परंतु, आत्ताच्या तरुणांची पसंती बदलली आहे. मद्याची तीच ती चव त्यांना नको आहे. तरुणांना यातही वेगवेगळ्या चवी ट्राय करायला आवडतात. मित्रांसोबत पिताना वेगळी आणि चांगली अनुभूती आली पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो.” प्रभातेज सांगतो.

भाटीयाने ग्रॅजुएशनच्या पहिल्या वर्षात असताना २००९ साली त्याच्या लायसन्ससाठी अर्ज केला होता. जेव्हा २०१२ मध्ये त्याचे ग्रॅजुएशन पूर्ण झाले त्याचे लायसन्स त्याला मिळालेले होते.

 

prabhatej bhatiya 2 inmarathi
businesstoday.in

 

लायसन्स हातात आल्यावर त्याने आपल्या कंपनीसाठी जागा शोधायला सुरुवात केली. दुर्गच्या औद्योगिक भागात त्याने एक जागा निश्चित केली.

त्यांचे मद्यपान गृह सुरळीत होण्यासाठी तब्बल दीड वर्षांचा कालावधी तरी जावा लागला. परंतू, परफेक्ट बिअर कशी बनवतात हे अजूनही त्यांना माहित नव्हते.

बिअर कशी बनवतात हे आम्हाला शिकून घायचे होते. तसेच त्यासाठी लागणारे साहित्य किंवा मशिनरी यांची देखील आम्हाला माहिती नव्हती. सुरुवातीला फक्त शिकण्यासाठी म्हणून आम्ही सॅब मिल्लर कडून त्यांच्यासाठी बिअर बनवून देण्याचा कॉट्रँक्ट मिळवले.

त्यांच्यासाठी बिअर बनवता बनवता बऱ्याच गोष्टी आमच्या लक्षात आल्या. त्यासाठी कोणत्या सुविधा असायला हव्यात आणि क्वालिटीत सातत्य कसे टिकवायचे याचा देखील आम्हाला अंदाज आला, भाटीया सांगत होते.

मी २०१६ मध्ये आम्ही सिंबा स्ट्रॉंग छत्तीसगढ हा पहिला ब्रँड सुरु झाला. सुरुवातीला पॅकिंग चांगले होईल याकडे आम्ही जास्त लक्ष दिले कारण पुढचे ऑर्डर मिळवणे आणि ते टिकवणे जास्त आवश्यक होते. आमच्या नियोजनानुसार आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत गेला.

 

simba beer 1 inmarathi
talesoffroth.com

 

२०१७ साली त्यांनी उत्पादन दुपटीने वाढवले. २०१८ मध्ये आम्ही सॅब मिल्लर साठी काम करण्याचे थांबवले आणि स्वतःचा ब्रँड यशस्वी करून दाखवायचा असे ठरवून कामाला लागलो.

अल्पावधीतच या ब्रँडला भारतातल्या मोठमोठ्या शहरातून मागणी वाढू लागली. २०१६ मध्ये त्यांनी फक्त सिंबा स्ट्रॉंग हा एकच प्रकार सुरु केला यानंतर लागोपाठ आणखी काही वेगवेगळी चव असलेले दोन-तीन प्रकार सुरु केले.

सध्या या तिन्ही ब्रँडला देशभरातून चांगली मागणी आहे. याच क्षेत्रात राहून कंपनीला अजून उंचावर न्यायचे स्वप्न प्रभातेज पाहतोय. अवघ्या २७ व्या वर्षी सुरु केलेल्या कंपनीची उलाढाल त्याने १२५ कोटींवर नेऊन ठेवली.

 

simba beer 2 inmarathi
www.indulgexpress.com

 

त्याचे नियोजन, निर्णय क्षमता, आणि जिद्द यांचे कौतुक करण्यासारखे आहे. परदेशी शिक्षण घेतल्यावर तिथेच त्याला मोठ्या पॅकेजची नोकरी मिळवता आली असती.

पण, काही लोकांच्या स्वप्नाला एक वेगळी किनार असते. त्यांच्यात स्वतःला सिद्ध करण्याची प्रचंड जिद्द असते. अवघे तीन वर्षे वय असलेल्या या कंपनीमध्ये सध्या वर्षाला ८६.४ दशलक्ष मद्याच्या बाटल्या तयार केल्या जातात.

अर्थात मद्यविक्रीवर होणारा गदारोळ, शरीराची हानी यांसारख्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहेच, मात्र या व्यवसायातही भारतीय उद्योजकाची झेप नक्कीच वाखाणण्याजोगी आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “घरच्या घरी बनवलेल्या भारतीय बिअरच्या ब्रॅंडची ही यशस्वी घोडदौड अनेक उद्योजकांना प्रेरणा देणारी आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?