' 'ऑपरेशन ककून' - विरप्पनचा खात्मा करणारा धाडसी आयपीएस ऑफिसर!

‘ऑपरेशन ककून’ – विरप्पनचा खात्मा करणारा धाडसी आयपीएस ऑफिसर!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

=== 

२०१४ मध्ये ‘ऑपरेशन ककून’च्या निमित्ताने के विजय कुमार हे नाव तामिळनाडू राज्यातच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात पोचले.

कुख्यात चंदर तस्कर आणि गुंड वीरप्पन आणि त्याच्या साथीदारांच्या उच्छादाने दक्षिण भारतात दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. या मोहिमेचे नियोजन आणि त्याची अंमलबजावणी ही के विजय कुमार यांच्याच मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली.

यापूर्वी आणि यानंतरही या धाडसी आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याने अनेक महत्वाच्या पदावर काम करत असताना स्वतःचा वेगळा ठसा उमटवला. अगदी सीआरपीएफचे संचालक म्हणून देखील त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.

 

Virappan Inmarathi
BBC.com

देशातील कोणताही भाग असो किंवा कोणतीही समस्या असो या निडर अधिकाऱ्याने कधीही आपल्या कर्तव्यात कसूर केली नाही. त्यांच्या या प्रामाणिक देशसेवेचा सन्मान म्हणूनच आत्ताच्या या कसोटीच्या काळातही केंद्र सरकारने त्यांना जम्मू-काश्मीरचच्या उपराज्यपाल पदी नेमण्याचा निर्णय घेतला आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपी आणि भाजप यांचे युती सरकार कोलमडल्यानंतर तिथे सध्या राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. एन एन व्होरा हे सध्या जम्मू-काश्मीरचे राज्यपाल आहेत.

त्यांनी आपल्या २०१८ मध्ये सल्लागारपदी निवृत्त आयपीएस अधिकारी के विजय कुमार यांची नियुक्ती केली होती . कुमार यांची नक्षलविरोधि तज्ञ अशी ओळख आहे. जंगलातील अनेक संघर्षापासून सुरक्षाविषयक तपशिलांची माहिती आहे.

कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनचा खात्मा करणाऱ्या टीमचे नेतृत्व देखील त्यांनी केले होते. सध्या के. विजय कुमार हे जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल पदाची सूत्रे हाती घेतील.

 

k-vijay-kumar-Inmarathi
Hindi News – इंडिया टीवी हिंदी – India TV

राज्याचे माजी मुख्य सचिव बी बी. व्यास हे राज्यपालांचे दुसरे सल्लागार असणार आहेत. त्यांचा ऐवजी छत्तीसगड केडरचे आयएएस अधिकारी बी व्ही आर सुब्रमण्यम यांची नियुक्ती राज्याच्या मुख्यसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपने “राष्ट्रीय हित” आणि राज्यात “कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न बिकट” होत असल्याचा मुद्द्यावरून पीडीपीशी असलेली युती तोडल्याच्या दुसर्याच दिवशी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली होती.

के विजय कुमार यांनी २०१४ मध्ये ‘ऑपरेशन ककून’चे नेतृत्व केले होते. या मोहिमेअंतर्गत त्यांनी कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनचा खात्मा करण्यात यश मिळवले होते.

कुख्यात गुंड वीरप्पनला कंठस्नान घातल्यानंतर कुमार विजय हे नाव तमिळनाडूमध्ये सर्व परिचित झाले होते.

या अवघड मोहिमेत यश मिळवल्यानंतर या धाडसी पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) महासंचालकपदी करण्यात आली.

 

k-vijay-kumar-inmarathi
india.com

१९७५ मध्ये ट्रीची येथून विजय कुमार यांनी सहाय्यक अधीक्षक म्हणून पोलीस खात्यातील कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी १९८२ ते १९८३ या काळात धर्मपुरी आणि १९८३ ते १९८५ या काळातसालेम येथे पोलीस अधीक्षक म्हणून देखील सेवा बजावली.

या काळात त्यांनी वॉल्टर देवराम यांचे सहाय्यक म्हणून देखील काम पहिले आहे.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सोबत त्यांनी एलिट स्पेशिअल प्रोटेक्शन ग्रुप (एसपीजी) मध्येही काम केले आहे.

१९९० मध्ये त्यांची बदली दिंडीगुल जिल्ह्यात एसपी म्हणून झाली यावेळी त्यांनी बस चालक आणि वाहक यांचा संप ज्या कौशल्यपूर्ण रीतीने हाताळला तो देखील सर्वपरिचित आहे.

१९९७ मध्ये समजूतदारपणाने जातीय दंगली हाताळण्याच्या त्यांचा वैशिष्ट्यामुळे त्यांची दक्षिण तमिळनाडूच्या’ इन्स्पेक्टर जनरल पदावर देखील नियुक्ती करण्यात आली होती.

१९९८ ते २००० या काळात काश्मीर खोर्यात बीएसएफ आणि दहशतवाद्यांमध्ये संघर्ष सुरु होता तेंव्हा देखील त्यांनी बीएसएफ जनरल पदी देखील काम केले आहे. २००१ मध्ये त्यांना चेन्नई शहराचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

 

Walter devram with K vijay kumar
Twitter

२०१० साली छत्तिसगढच्या दांतेवाडा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ७५ जवानांची हत्या घडवून आणल्यानंतर या धाडसी पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती सीआरपीएफच्या महासंचाल पदी निवड करण्यात आली होती.

के. विजय कुमार यांचा जन्म तमिळनाडुमध्येच झाला. त्यांचे वडील देखील पोलीस अधिकारी होते. त्यांनी मद्रास विद्यापीठातून कायद्याची पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यानंतर इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून (इग्नू) एमबीएची पदवी देखील संपादित केली आहे.

नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी, बंगलोर मधून त्यांनी बिझनेस लॉची देखील पदवी मिळवली आहे. अधिकारी असूनही त्यांच्याकडील शिक्षण आणि अभ्यासाच्या या भरभक्कम शिदोरीचा हेवा वाटतो.

भारत सरकारच्या गृहमंत्रालयाचे सल्लागार म्हणूनही त्यांनी काम पहिले आहे.

 

K Vijay Inmarathi
Hindustan

विराप्पनला कंठस्नान घालणाऱ्या पथकाचे प्रमुख के विजय कुमार हे जम्मू-काश्मीरचे नवनिर्वाचित उपराज्यपाल असतील, अशी चर्चा सुरु आहे.

विवेकी तारतम्य आणि धाडसी निर्णय या दोघांचा समन्वय असणारे हे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या या उपराज्यपाल पदाच्या कारकिर्दीतही जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी काही भरीव योगदान देण्याची आणि पृथ्वीवरील नंदनवन ही काश्मीरची ओळख कायम ठेवण्यासाठी काम करण्याची त्यांची इच्छा आहे.

यापुर्वी देखील त्यांनी बीएसएफचे जनरल म्हणून काश्मीर खोऱ्यात काम केलेले आहे. त्यामुळे काश्मीरचे ज्वलंत प्रश्न काय आहेत याचा त्यांना चांगलाच अभ्यास आहे.

प्रश्न हाताळण्याची आणि त्यांची उकल करण्याची त्यांची जी एक ठराविक शैली आहे त्याच्या लाभ उर्वरित भारत आणि जम्मू-काश्मीर दोघांनाही होऊ शकेल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?