' तुमच्या मेलवर दिसणारे “स्मॅप मेल” नक्की कुठून येतात हे वाचून हैराण व्हाल! – InMarathi

तुमच्या मेलवर दिसणारे “स्मॅप मेल” नक्की कुठून येतात हे वाचून हैराण व्हाल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

स्पॅम मेल्स हा दैनंदिन जीवनातला एक नको असलेला ताप! दर तासाला ३-४ स्पॅम मेल्स आपल्या इलेमच्या इनबॉक्समध्ये येऊन स्थिरावतात. बरं ते डिलीट मारून मारून देखील कंटाळा आलेला असतो, पण हे स्पॅम मेल्स काही कमी व्हायचं नाव घेत नाहीत.

न बोलावलेल्या पाहुण्यांप्रमाणे त्यांचं येणं सुरूच असतं. बरं तुम्हाला माहित आहे का हे स्पॅम मेल्स नेमके येतात कुठून? त्यांना आपला इमेस अॅड्रेस कसा मिळतो? चला तर आज या स्पॅम मेल्स बद्दल सगळं गौडबंगाल जाणून घेऊया.

 

spam-mails-marathipizzaoo

स्रोत

सर्वात प्रथम एक धक्कदायक गोष्ट तुम्ही जाणून घेतली पाहिजे ती म्हणजे – इंटरनेटवर येणारे जवळपास ५० टक्के स्पॅम मेल्स हे इंटरनेट सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांमार्फत पाठविले जात असतात.

हे स्पॅम मेल्स म्हणजे ग्राहकासाठी असे अनावश्यक ई-मेल्स असतात जे या इंटरनेट सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांकडून एकाचवेळी अनेक इंटरनेट ग्राहकांना पाठविले जातात.

एका संशोधनात हे देखील सिद्ध झालेलं आहे की, ५० टक्के स्पॅम मेल्स हे फिशिंग अटॅक्स आणि फसवणूक करणारे संदेश असतात आणि हे मेल्स इंटरनेट सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांच्या केवळ २० टक्के नेटवर्कसमधून येतात. यातील बहुतांश नेटवर्क भारत, व्हिएतनाम आणि ब्राझिल या देशांमध्ये कार्यरत आहे.

नायजेरियाचे ‘स्पेक्ट्रानेट’ हे इंटरनेटच्या नेटवर्कमधील गुन्ह्यांच्या यादीत सर्वात आघाडीवर आहे. या ISPच्या नियंत्रणात असणा-या ६० टक्के वेब अ‍ॅड्रेसमधून स्पॅम मेल्स पाठवले जातात.

 

spam-mails-marathipizza01

स्रोत

एका निरीक्षणामध्ये असे आढळून आले आहे की,

बोगस घटनांमध्ये सहभागी असणाऱ्या नेटवर्कस मार्फत पाठवल्या जाणाऱ्या मेल्सद्वारे, ग्राहकांना एका खास पद्धतीनं आपल्या जाळ्यात अडकवण्याचं प्रमाण सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ करत आहेत.

अशा प्रकारचे फिशिंगचे अटॅक्सचे प्रकार जास्त करून अमेरिकेतील ISPमधूनच केले जातात. त्याचं कारण हे आहे की या ‘स्पॅमर्स’गटाला आशियातील ISPसुद्धा सोयीच्या असतात.

अनेक सायबर गुन्हेगार लोकांच्या आय-पी अ‍ॅड्रेसचं हॅक करून किंवा कॉम्प्यूटर दुसऱ्या कॉर्पोरेट नेटवर्कला जोडून स्पॅम आणि खोटे, बोगस संदेश पाठवले जातात.

स्पॅम मेल्सद्वारे केले जाणारे सायबर गुन्हे रोखण्यासाठी सायबर सिक्युरिटीने नेटवर्कवर कंट्रोल ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे, कारण या सगळ्याचं मूळ हेच आहे.

हॉलंडमधील एका संशोधकाने हे सिद्ध करून दाखवलं होतं की प्रकरणांमध्ये ISPला स्पॅम आणि फिशिंगसारखे धोके वाढविण्यात नेटवर्कसचीचं जास्त मदत होते.

 

spam-mails-marathipizza02

स्रोत

स्पॅम मेल्सच्या फासामध्ये अडकायचे नसेल तर सर्वप्रथम ग्राहकांनी सतर्क होणे गरजेचे आहे. कोणताही मेल आल्यास त्यातील मजकूराला बळी न पडता कामा नये. बऱ्याच स्पॅम मेल्स मध्ये ग्राहकांना फसवणारी आमिषे दाखवली जातात. त्यांपासून दूर राहणेच आपल्या हिताचे आहे. 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?