' तब्बल १० वर्षे जंगली प्राण्यांसोबत काढणारी ही आहे रियल लाईफ मोगली !

तब्बल १० वर्षे जंगली प्राण्यांसोबत काढणारी ही आहे रियल लाईफ मोगली !

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

मोगली हा आपल्या सर्वांच्याच परिचयाचा आहे. लहानपणापासून पुस्तकातून टीव्ही सिरीयल आणि कार्टूनमधून आपण त्याला भेटत आलो. जंगलातील प्राण्यांसोबत राहून त्यांच्या चालीरीती आणि सवयी शिकून तो आपले जीवन व्यतीत करत असतो. जंगलातील त्याची धम्माल, नवनवीन किस्से, प्राण्यांचे त्याच्यावर असणारे प्रेम या सगळ्याच अफलातून गोष्टींमुळे मोगली आपल्या सगळ्यांचा लाडका झाला. मोगली आजही आपल्या सर्वांच्या मनामनात वसलेला आहे हे २०१६ मध्ये रिलीज झालेल्या ‘जंगल बुक’ या चित्रपटाच्या यशाने दाखवून दिले. तर अश्या या काल्पनिक मोगलीसारखी रियल लाईफ मधील मोगली आम्ही तुम्हाला दाखवली तर ??? काय म्हणता? असे होणे शक्य नाही? चला तर मग आता आवर्जून जाणून घ्या या रियल लाईफ मोगलीविषयी!

tippi-degre-marathipizza00

स्रोत

टिप्पी बेंजामिन ओकांती डेग्रे या मुलीने तब्बल १० वर्षे आफ्रीकेतील जंगलात हिंस्त्र प्राण्यांसोबत घालवली आहेत. त्यामुळेच जगभरात तिला रियल लाईफ मोगली या नावाने ओळखले जाते.

tippi-degre-marathipizza01

स्रोत

टिप्पी बेंजामिन ओकांती डेग्रे हिचे लहानपणीचे फोटोज काही वर्षांपूर्वी सोशल मिडीयावर वायरल  झाले आणि तिची अविश्वसनीय कहाणी पुढे आली.

tippi-degre-marathipizza03

स्रोत

टिप्पीचा जन्म नामिबिया मधला! तिचे आई वडील सिल्वी रॉबर्ट आणि अॅलन डिग्री हे दोघेही वाईल्ड लाईफ फोटोग्राफर होते. त्यान प्राण्यांचे प्रचंड वेड होते. त्यांनी प्रसिद्ध अॅक्ट्रेस टिप्पी हेड्रेनच्या नावावरून आपल्या मुलीचे नामकरण केले होते.

tippi-degre-marathipizza04

स्रोत

आई वडील वाईल्ड लाईफ फोटोग्राफर असल्याकारणाने तिने अफ्रिकेच्या जंगल सफारीदरम्यान वयाची पहिली १० वर्षे घालवली. या काळात तिने बोत्सवाना, झिंम्बाब्वे आणि दक्षिण अफ्रिकेसह अनेक देशांत प्रवास केला आणि तिचे देखील प्राण्यांवर प्रेम जडले.

tippi-degre-marathipizza05

स्रोत

तिने थेट हत्तीपासून ते सिंहापर्यंत सर्वच जंगली प्राण्यांना आपले मित्र बनवले होते. जंगलात राहणारा पाच टनाचा हत्ती तिचा भाऊ होता.

tippi-degre-marathipizza06

स्रोत

तर बिबट्या तिचा जिगरी दोस्त होता.

tippi-degre-marathipizza07

 

स्रोत

तर हे कमी की काय म्हणून ती शहामृगाची स्वारी देखील करायची.

tippi-degre-marathipizza08

स्रोत

या जंगलात ती प्राण्यांसमवेत खेळायची आणि आदिवासी लोकांसारखे कपडे घालून शिकार करायला देखील जायची.

tippi-degre-marathipizza09

स्रोत

१० वर्षे जंगलात राहिल्यानंतर टिप्पीला फ्रेंच स्टेट स्कूलमध्ये धाडण्यात आले. इथे गेल्यावर टिप्पीला मात्र शहरी वातावरणाची सवय लावून घेताना अनेक अडचणी आल्या. दोन वर्षानंतर तिची प्रगती पाहून तिच्या आई वडिलांनी तिला घरीच शिक्षण देण्यास सुरुवात केली. वयाच्या २३ व्या वर्षी टिप्पीने चित्रपट विषयक अभ्यासक्रम पूर्ण केला तसेच तिने टिप्पी ऑफ अफ्रिका नावाचे जगभरात गाजलेले पुस्तक देखील लिहिले आहे. आज टिप्पीचे वय २६ वर्षे असून ती फ्रान्समध्ये वास्तव्यास आहे.

tippi-degre-marathipizza10

स्रोत

पण आजही तिचे मन जंगलातल्या त्या बालपणीच्या आठवणीतचं गुंग आहे.

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?