' "माझ्याबरोबर जगभर प्रवास करा - २६ लाख रुपये मिळवा"- करोडपती तरुणाची अजब ऑफर!

“माझ्याबरोबर जगभर प्रवास करा – २६ लाख रुपये मिळवा”- करोडपती तरुणाची अजब ऑफर!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

प्रवास करणे आवडत नाही अशी माणसे विरळाच! मस्त जगभर फिरावे, नव्या जागा बघाव्या, नव्या लोकांना भेटावे, नवनवीन ठिकाणांची माहिती घ्यावी, जगातील प्रसिद्ध स्थळांना एकदा तरी भेट द्यावी, विविध देशांत जाऊन तिथला इतिहास जाणून घ्यावा.

तिथल्या लोकांशी मैत्री करावी, तिथली संस्कृती जाणून घ्यावी ,तिथले खास पदार्थ चाखावे म्हणजेच थोडक्यात मनमौजी सारखा जगप्रवास करावा असे अनेकांना वाटते.

परदेशात फिरण्याचे अनेकांचे स्वप्न असते. त्यासाठी लोक आयुष्यभर पैसे साठवतात.

 

matthew 1 InMarathi

 

अनेकांचे हे स्वप्न पूर्ण होते पण अनेकांचे हे स्वप्न पूर्ण होत नाही. काहींची शारीरिक क्षमता नसते तर बऱ्याच लोकांकडे व्हिटॅमिन एम म्हणजेच पैश्यांची कमतरता असते.

फिरायला जायचे तर आहे पण पैसेच नाहीत, बजेट नाही अशी आपल्यापैकी अनेकांची परिस्थिती असते.

अनेकांची अशी इच्छा असते की “शामें मलंग सी ,रातें सुरंग सी…बागही उड़ान पे ही ना जाने क्यूँ… इलाही मेरा जी आये आये…” म्हणत ये जवानी है दिवानी मधल्या रणबीर कपूरसारखे काम करता करता देशविदेशात फिरायला मिळावे.

 

YJHD Ilahi Inmarathi
Twitter

त्यातून मस्तपैकी पैसे देखील कमावता यावेत. काही ट्रॅव्हल जर्नालिस्ट लोकांचे हे स्वप्न पूर्ण देखील होते. सर्वसामान्य माणसाला मात्र असे देशविदेशात फिरणे स्वप्नांपुरतेच मर्यादित ठेवावे लागते.

पण आता एका कोट्याधीश तरुणाने जगभरातील लोकांना अशी एक ऑफर दिली आहे ज्यामुळे तुमचे जग फिरता फिरता पैसे कमावण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. हा तरुण म्हणतोय, माझ्याबरोबर जग भर प्रवास करा आणि त्या बदल्यात २६ लाख रुपये मिळवा.

 

matthew InMarathi

 

ऑस्ट्रेलियामधील सिडनी येथील मॅथ्यू लेप्रे हा सव्वीस वर्षीय तरुण आज कोट्याधीश आहे. इ कॉमर्समध्ये व्यवसाय करणारा मॅथ्यू हा आज चार कंपन्यांचा मालक आहे. कॉलेज ड्रॉपआउट असलेल्या मॅथ्यूने व्यवसाय सुरु केला आणि थोड्याच काळात तो करोडपती बनला.

आज तो जगातील लोकांना अशी ऑफर करतोय की त्याच्याबरोबर त्याचा असिस्टंट म्हणून जगभर प्रवास करा आणि त्याबदल्यात तो तुम्हाला थोडेथोडके नाही तर २६ लाख रुपये इतका पगार देईल.

 

this millinior will pay 26 lacks to travel Inmarathi
Marketing Mind

गेल्या सहा महिन्यांपूर्वी करोडपती झालेल्या मॅथ्यूला त्याचा व्यवसाय जगभरात सगळीकडे वाढवण्याची इच्छा आहे. ते त्याचे ध्येय आहे. म्हणूनच जगभर फिरून विविध देशांतील मार्केटचा आढावा घेण्याची त्याची योजना आहे.

त्यासाठी त्याच्याबरोबर जगभर फिरून त्याचा व्यवसाय वाढवण्यात मदत करणाऱ्या असिस्टंटची त्याला गरज आहे.

मॅथ्यूने ही बातमी त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली. त्याच्या इंस्टाग्राम पेजवर तुम्ही ही सगळी माहिती वाचू शकता. त्याने असे लिहिलंय की तो त्याच्या असिस्टंटला बावन्न हजार डॉलर्स म्हणजेच अंदाजे २५. ७५ लाख रुपये इतके वेतन देणार आहे.

तसेच असिस्टंटच्या प्रवास व राहण्या खाण्याचा खर्च सुद्धा तोच करणार आहे. तसेच असिस्टंटला आरोग्यविम्याची सुविधा सुद्धा त्याच्याकडून मिळणार आहे. ह्याशिवाय अनेक सवलती सुद्धा मिळतील.

 

matthew 2 InMarathi

 

आजवर मॅथ्यूने जगातील बऱ्याच हवाई, दुबई ,जपान ह्यांसह जगातील मोठ्या मोठ्या शहरांना भेट दिली आहे. फक्त लॅपटॉपवर काम करून तो महिन्याला अंदाजे A$ १२०००० म्हणजेच ११५,४२७ डॉलर्स कमावतो. मॅथ्यूने त्याचा व्यवसाय पूर्णपणे स्वतःच्या बळावर उभा केला आहे.

त्यामुळे त्याच्या असिस्टंटची नोकरी मिळवण्यासाठी उमेदवार तितका पात्र असायला हवा. त्या व्यक्तीला मल्टीटास्किंग जमायला हवे. त्याला /तिला प्रवासाचे संपूर्ण नियोजन करणे जमायला हवे. प्रवासाचा संपूर्ण कार्यक्रम (ट्रॅव्हल आयटनररी) तयार करता यायला हवी.

 

matthew_1554804524 Inmarathi
Indiatimes.com

तसेच त्या व्यक्तीला सोशल मीडिया चॅनेल्सचे संपूर्ण ज्ञान असायला हवे आणि ते चॅनेल्स व्यवस्थितपणे हाताळण्याची क्षमता असायला हवी. कामासाठी त्या व्यक्तीने सतत दक्ष असायला हवे.

अतिशय बारकाईने काम करायला हवे व जे काम हाती घेतले आहे ते पूर्ण करण्यासाठी अंगात चिकाटी हवी. तसेच त्या व्यक्तीकडे पासपोर्ट असायला हवा जो कमीत कमी १२ महिन्यांसाठी वैध असेल.

युनिव्हर्सिटीत शिक्षण घेणाऱ्या मॅथ्यूने एकेकाळी शिक्षणासाठी कर्ज घेतले होते. त्याच्यावर चाळीस हजार ऑस्ट्रेलियन डॉलर्स इतके कर्ज होते. पण त्याने लवकरच त्याची पहिली इ कॉमर्स वेबसाईट सुरु केली आणि त्यात त्याने प्रचंड यश मिळवले.

 

matthew 3 InMarathi

 

मग त्याने उच्च शिक्षण सोडून त्याच्या व्यवसायावरच संपूर्ण लक्ष केंद्रित केले. आज तो चार कंपन्यांचा मालक आहे.

असा जॉब अनेकांचा ड्रीम जॉब असतो. अश्या संधी फार दुर्मिळ असतात. त्यामुळे कसला विचार करताय? पटापट तुमचा रिझ्युमे मॅथ्यूला मेल करा. त्याच्याकडे तुमच्या आधीच जवळजवळ चाळीस हजार लोकांनी ह्या नोकरीसाठी अर्ज पाठवले आहेत.

तसेच अनेक तरुणींनी त्याला पटापट लग्नाचे प्रस्ताव देखील पाठवले आहेत. आता ह्या हजारो लोकांमधून मॅथ्यू नेमकी कुणाची असिस्टंट म्हणून निवड करतो हे बघायचे! पण ज्याची किंवा जिची कुणाची निवड होईल, ती व्यक्ती प्रचंड नशीबवान असेल आणि तिचे स्वप्न सत्यात उतरेल हे नक्की!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?