' या देशात फक्त २७ लोक राहतात! – InMarathi

या देशात फक्त २७ लोक राहतात!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

देश म्हटला की आपण विचार करतो की त्यात कमीत कमी १०० शहर तरी असावीत आणि लाखांच्या घरामध्ये लोकसंख्या असावी. आता आपलाच भारत देश घ्या! किती मोठ्ठा आहे. लोकसंख्या तर विचारायची सोय नाही. त्यामुळे आपल्याला कोणी म्हटले की तुम्हाला असा देश माहिती आहे का जिथे केवळ २७ लोक राहतात तर??? आपला विश्वास बसणं मुश्कील! आपल्यापैकी बरेच जण म्हणतील आमच्या एका कुटुंबात ५० लोक राहतात. बरं गमतीचा भाग सोडला तर खरंच जगामध्ये असा देश आहे ज्याची लोकसंख्या केवळ २७ इतकी आहे.

sealand-marathipizza00

स्रोत

इंग्लंडच्या समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या या देशाचे नाव सीलँड आहे. इंग्लंडच्या सफोल्ड या समुद्रकिनाऱ्यापासून फक्त १० किलोमीटर अंतरावर असलेल्या सीलँड किल्ल्यावर हा देश वसला आहे. दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडनं या देशाची निर्मिती केली होती. मात्र त्यानंतर त्या देशाला खाली करण्यात आलं. सीलँडवर आतापर्यंत वेगवेगळ्या लोकांनी राज्य केलं आहे.

sealand-marathipizza01

स्रोत

९ ऑक्टोबर २०१२ रोजी रॉय बेट्स नावाच्या व्यक्तीला सीलँडचा राजा घोषित करण्यात आलं होतं. रॉय यांच्या मृत्यूपश्चात त्यांचा मुलगा मायकल यांनी राज्य केलं. ज्या देशांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळालेली नसते त्यांना छोटे देश म्हणून संबोधण्यात येते. सीलँड या देशाचे क्षेत्रफळ ०.२५ किलोमीटर इतकेच आहे. भकास अवस्थेत असलेल्या या किल्ल्याला सीलँडसोबत रफ फोर्ट म्हणूनही ओळखले जाते.

sealand-marathipizza02स्रोत

या देशाची अर्थव्यवस्था देणग्यांवर चालते आहे. अनेकांना या देशाची माहिती सोशल मीडियावरूनच झाली आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून या देशाला अनेक देणग्याही प्राप्त झाल्या आहेत. मात्र सीलँड या देशाला अधिकृतरीत्या मान्यता न मिळाल्यानं सर्वात छोटा देश म्हणून व्हेटिकन सिटी ओळखला जातो. व्हॅटिकन सिटी क्षेत्रफळ ०.४४ वर्ग किलोमीटर आहे. व्हॅटिकन सिटी या देशाची लोकसंख्या केवळ ८०० च्या घरात आहे.

sealand-marathipizza03

स्रोत

जगातील अजून एक अविश्वसनीय आणि विचित्र सत्य !

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?