' या शहरात मृतदेहांना दफन करण्याला मनाई का आहे? वाचा वैज्ञानिक कारण – InMarathi

या शहरात मृतदेहांना दफन करण्याला मनाई का आहे? वाचा वैज्ञानिक कारण

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मरण काही सांगून येतं का? प्रत्येकाच्या नशिबी जो मृत्यू दिवस असेल त्या दिवशी तो माणूस मरणारच! मरणाला आपण तर काही थांबवू शकत नाही. पण समजा कोणी मरणावर बंदी घातली तर?? तुम्ही म्हणाल, इतर गोष्टींवर ठीक आहे , पण जी गोष्ट आपल्या नियंत्रणात नाही ती गोष्ट घडायची तेव्हाच घडणार.

खरंतर मरणावर बंदी वगैरे हा आपल्या लोकांना निव्वळ मूर्खपणा वाटेल. पण जगामध्ये एक असं ठिकाण आहे जेथे मरणावर बंदी आहे. बंदी म्हणजे असं समजा की इथे नियमचं लागू आहे की कोणी या प्रदेशात मरायचं नाही. काय म्हणता? अजून विश्वास बसतं नाही? मग हे चित्रविचित्र गौडबंगाल तुम्ही जाणून घ्यायलाचं हवं !

longyearbyen-marathipizza00

स्रोत

नॉर्वे देशामधील लाँगेयरबेन या शहरामध्ये असा विचित्र नियम असून येथील लोकांना चक्क मरण्यास मनाई आहे. १९०६ साली खाणकामासाठी वसवण्यात आलेले लाँगेयरबेन हे शहर आता पर्यटन केंद्र बनले आहे.

longyearbyen-marathipizza01

स्रोत

उत्तर ध्रुवावर वसलेलं हे शहर आपल्या वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे. कडाक्याची थंडी आणि अवघी दोन हजार लोकवस्ती असलेल्या या शहरात ध्रुवीय अस्वलांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे येथे प्रत्येकाने बंदुक बाळगणे अनिवार्य मानले जाते.

longyearbyen-marathipizza02स्रोत

ध्रुवीय प्रदेश असल्याने इथे चार महिने सूर्यही उगवत नाही. अशी खासियत असलेल्या या शहरात मरण्यास मात्र मनाई आहे.
इथे कुणी गंभीर आजारी असेल किंवा मरणपंथाला लागले असेल तर त्याला शेवटच्या दिवसांमध्ये विमानाने किंवा जहाजातून नॉर्वेच्या अन्य भागात हलवले जाते.

longyearbyen-marathipizza03

स्रोत

याचं कारण असं सांगितलं जातं की या शहरातील दफनभूमी खूपच लहान असून, गेल्या ७० वर्षांपासून इथे कुणालाही दफन करण्यात आलेले नाही.

तसंच अतिथंड वातावरणामुळे इथे दफन करण्यात आलेल्या मृतदेहांचे विघटन होत नाही. शास्त्रज्ञांना अशा विघटन न झालेल्या मृतदेहांमध्ये इन्फ्लुएंझाचे विषाणू आढऴल्यापासून इथे नो डेथ पॉलिसी लागू करण्यात आली आहे.

longyearbyen-marathipizza04

स्रोत

हे एक जागतिक आश्चर्य म्हणून घोषित करण्यास हरकत नाही !

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?