या देशात सर्वसामान्य लोकांना दिला आहे गुन्हेगारांना ठार मारण्याचा अधिकार!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

समाजात गुन्हेगारी प्रवृत्ती मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. खून, दरोडे आणि बलात्कार यांच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. जणू या गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेलाच नाही. ज्या गुन्हेगारांना कायद्याच्या चौकटीत उभे केले जाते ते देखील कधीकधी पुराव्यांअभावी किंवा निकृष्ट यंत्रणेमुळे मोकाट सुटतात. अश्या कारणांमुळे सामान्य जनतेचा कायद्यावर विश्वास राहिलेला नाही. बलात्कारा सारख्या गंभीर गुन्ह्यासाठी मृत्युदंडाचीचं शिक्षा द्यावी असे जनतेचे मत असताना अनेक बलात्कारी केवळ तुरुंगवास भोगून बाहेर पडतात. अश्यावेळेस पिडीत आणि सामन्य जनतेच्या अंगाचा तिळपापड होतो. या गुन्हेगाराला कायद्याच्या हवाली करण्यापेक्षा लोकांनीच शिक्षा द्यावी अशी भाषा जनतेच्या तोंडून निघते.

आपल्या भारतात तरी असं घडणं शक्य नसलं तरी जगाच्या पाठीवर एक असा देश आहे जेथे सर्वसामान्य नागरिक एखाद्या गुन्हेगाराला शिक्षा देऊ शकतात. तसा त्यांचा अधिकारचं आहे म्हणा ना!

philippines-law-marathipizza

स्रोत

फिलिपिन्स देशाचे नाव तुम्ही ऐकून असालच, या देशामध्ये असा आगळावेगळा कायदा आहे. या कायद्यानुसार फिलिपिन्समध्ये पोलीस आणि सर्वसामान्यांना गुन्हेगारांना ठार मारण्याचा खास अधिकार मिळतो.

philippines-law-marathipizza01

स्रोत

एखाद्या गुन्हेगाराने गंभीर गुन्हा केला आणि त्या गुन्ह्यातील पिडीताने किंवा अन्य व्यक्तीने गुन्हेगाराची हत्या केल्यास त्याच्यावर कुठलाही खटला चालत नाही उलट गुन्हेगाराला ठार मारणाऱ्या व्यक्तीला बक्षिस देण्यात येते.

philippines-law-marathipizza03

स्रोत

फिलिपिन्सचे राष्ट्रपती रॉड्रिग्स दुतेर्तो यांनी काहीच महिन्यांपूर्वी देशात अंमली पदार्थांच्या तस्करांची हत्या केल्यास १०० डॉलर रोख बक्षीस दिले जातील अशी घोषणा केलेली आहे.

philippines-law-marathipizza04

स्रोत

तेव्हापासून पोलीस आणि सामान्य नागरिकांनी सुमारे सहा हजार अंमली पदार्थांच्या तस्करांना ठार मारले आहे. तर मृत्युच्या भीतीने सुमारे एक लाख तस्कर पोलिसांना शरण गेले आहेत.

philippines-law-marathipizza02

स्रोत

शिक्षा करण्याचा अधिकार सर्वसामान्यांना देणे हे फिलिपिन्स सरकारचे एक “क्रांतिकारी” पाऊलचं म्हटले पाहिजे की अनैतिक?! ह्या कायद्यावर सरकारने बंधन घालणे गरजेचे आहे. अन्यथा सर्वसामान्यांमधून गुन्हेगारी उदयास येण्यास वेळ लागणार नाही!

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?