' ‘सिंगल’ तरुणांनो, तुमचं “डस्टबिन” होतंय का? “गर्लफ्रेंड” पहा आणि खात्री करून घ्या! – InMarathi

‘सिंगल’ तरुणांनो, तुमचं “डस्टबिन” होतंय का? “गर्लफ्रेंड” पहा आणि खात्री करून घ्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

=== 

लेखक: मिहीर कुलकर्णी 

खरंतर जेव्हा पहिलं पोस्टर आलं तेव्हा उत्सुकता निर्माण झालीच होती. ट्रेलर आला तेव्हा मात्र हा सिनेमा बघायलाच पाहिजे हे मनाशी ठरवलं . खरंतर शुक्रवारीच बघायला हवा होता पण काही कारणाने शक्य नाही झालं.

वेळ मिळाला तसं थिएटर गाठलं पहिल्या रो मधली च तिकीट शिल्लक होती . वेळ दवडून चालणार नव्हता, तिकीट काढलं,पॉपकॉर्न घेतले आणि सीटवर स्थिरावलो.

 

girlfriend inmarathi
eSakal

टायटल सुरू झाले ,प्रोडक्शन हाऊसेस चे लोगो, टायटल पडलं आणि पहिल्याच सिन ला नचिकेत प्रधान म्हणजेच अमेय वाघ हा रात्रीचे बारा वाजलेत आणि फेसबुक स्क्रोल करत बसलाय .. मध्ये मध्ये मोबाईल सुद्धा चेक करतोय एकही मेसेज नाहीये .

इतक्यात त्याच्या फेसबुक वर एक नोटिफिकेशन पॉप होतं आणि त्याला समजत त्याला कोणत्या तरी मुलीने बर्थडे विष केलंय त्याला झालेला आनंद तो शेजारी असलेल्या आरशात बघून स्वतःला सांगतो.

कोणी विष केलंय हे बघायला जात असतानाच त्याला समजतं की त्याला ब्लॉक करण्यात आलंय आणि त्याच वेळी मी खिशातून मोबाईल काढतो आणि मित्राला मेसेज करून सांगतो, ” साल्या असशील तिथून निघ आणि कोणत्याही थिएटर ला जाऊन गर्लफ्रेंड बघ , आपल्यावर पहिल्यांदाच बायोपिक आलाय”..

आपल्यावर म्हणजे नक्की कोणावर ?? तर आपल्यावर म्हणजे या चित्रपटात वापरलेल्या डस्टबिन या संकल्पनेच्या लोकांवर.

आता ही डस्टबिन ही संकल्पना काय ?

तर मुलींना गुड बॉईज आवडत नाहीत,बॅड बॉईज आवडतात.

बॅड बॉईज ने केलेला आणि त्यांच्यामुळे झालेला सगळा कचरा मुली गुड बॉईज ना सांगत बसतात कारण त्यांचं ऐकणारे फक्त तेच असतात,अश्या लोकांना डस्टबिन म्हणतात.

 

girlfriend 1 inmarathi
The Indian Express

या डायलॉग ने तर चक्क मनात नक्की किती वेळा आपला डस्टबिन झालाय याचा विचार आपण नाही केला तरच ते नवल असेल..

आता जाणून घेऊया या सिनेमाबद्दल..

रॉम कॉम म्हणजेच रोमँटिक कॉमेडी या प्रकारात हा सिनेमा मोडतो. मराठीत या प्रकारचे सिनेमे खूप कमी बनतात. या आधीही जे सिनेमे बनलेत ते फारसे चांगले जमलेले नाहीत आणि लोकांनाही फारसे आवडलेले नाहीत .

रॉम कॉम जॉनर चे सिनेमे कोणाच्या ना कोणाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने दाखवले जातात. गर्लफ्रेंड हा सिनेमा आपल्याला याचा नायक नचिकेत प्रधान ( अमेय वाघ ) च्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने पहायला मिळतो.

नायकाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने दाखवला गेलेल्या सर्वोत्तम रॉम कॉम सिनेमांपैकी हा सिनेमा आहे असं म्हणायला हरकत नाही.

नचिकेत प्रधान (अमेय वाघ) ला गर्लफ्रेंड हवी आहे, त्याला सर्वजण त्यासाठी टोमणे मारतायेत आणि मग एके दिवशी त्याला गर्लफ्रेंड मिळते, या सगळ्यात गुंफलेली गोष्ट आहे ती सुखावणारी आहे. चित्रपटात मध्ये मध्ये  डोकावणारी गाणी फ्रेश आहेत जी कानाला सुखावतात .

चित्रपटाच्या बाबतीत अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे या चित्रपटातील संवाद..

या चित्रपटातील पात्रं बोल बच्चन किंवा उपदेश करत बसत नाहीत, ते मुद्द्याला हात घालतात आणि त्यांचं म्हणणं स्पष्टपणे मांडतात आणि त्यामुळेच पात्रांनी म्हणलेले संवाद आपल्याला डायरेक्ट भिडतात. संवाद सुद्धा अगदी आपल्या रोजच्या बोलीभाषेतील आहेत.

 

girlfriend 2 inmarathi
Times of India

चित्रपटातील सीन्स सुद्धा अगदी वास्तवाशी निगडित कसे ठेवता येतील याचा पुरेपूर विचार केला आहे. मग ते फ्रेम च कलर पॅलेट असो किंवा फ्रेम च कंपोझिशन. सिनेमाच्या एडिटिंग ने ही सिनेमात जान आणलीय असं म्हणायला हरकत नाही.

आता हा चित्रपट का बघावा ? आणि का बघू नये ?? याबद्दल बोलूया. तर सगळ्यात आधी हा चित्रपट का बघावा ?

१)अमेय वाघ आणि सई ताम्हणकर या फ्रेश जोडीची केमिस्ट्री पहायची असेल, तर नक्की बघावा.

२)निखळ मनोरंजनासाठी काहीतरी बघायची इच्छा असेल तरी एकदा बघायला हरकत नाही.

३)इतर पात्रांची कामं देखील उत्तम झाली आहेत , त्याने सुद्धा चित्रपटाला चार चांद लागतात.

४) सर्व बाजू उत्तम आणि योग्य प्रकारे जुळून फार कमी वेळेला येतात ,त्या यावेळी आल्या आहेत म्हणून सुद्धा पहावा.

५)आणि सर्वात महत्वाचा ,तुमचा कधी डस्टबिन झाला असेल तरी नक्की बघावा

 

girlfriend 3 inmarathi
Gulflance

का पाहू नये ?

याची कारणं तशी फार नाहीयेत ..

१)अश्या धाटणीचे सिनेमे आवडत नसतील ,तर नक्कीच बघू नये

बाकी कारणं फारशी नाहीत..

तेव्हा जर तुम्ही सिंगल असाल तर मात्र हा सिनेमा नक्की चुकवू नका. कदाचित त्यामुळे तुम्हाला समजू शकतं की नक्की तुमचा डस्टबिन होतोय की नाही ? नसेल होत तर चांगलंच आहे आणि होत असेल तर मात्र काळजी घेता येईल.

 

girlfriend 4 inmarathi
Cinestaan

या व्यतिरिक्त अजून एक फायदा म्हणजे तुम्ही कुठे चुकटाय हे ही समजु शकत. म्हणूनच पुन्हा एकदा म्हणावसं वाटतंय, मित्रानो “आपल्या लोकांवर पहिल्यांदा बायोपिक आलाय” म्हणून शक्यतो चुकवू नका. किमान एकदा तरी बघायला हरकत नाही…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?