' शरद पवारांनी गळ टाकला आणि छगन भुजबळांनी ठोकला शिवसेनेला रामराम! – InMarathi

शरद पवारांनी गळ टाकला आणि छगन भुजबळांनी ठोकला शिवसेनेला रामराम!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

राजकारणात रोज काहीतरी घडामोडी होत असतातच. त्यात पक्ष बदलणं हे काही नवीन नाही. फार क्वचितच एखादा नेता अनेक वर्षं एकाच पक्षात राहिलाय असं दिसून येतं.

अरविंद जगताप यांनी लिहिलेलं ‘जगण्याच्या वारीत मिळेना वाट, साचले मोहाचे धुके घनदाट… विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती?’ या गाण्यातून पक्ष बदलणार्‍या नेत्यांच्या हाताखाली असणार्‍या कार्यकर्त्यांची फरफट छान शब्दांत मांडली आहे.

मध्यंतरी तर पक्ष बदलण्याची जणू चढाओढच लागली होती. त्यावरून विनोदसुद्धा आले होते की, कार्यकर्त्यांनी सकाळी उठल्यावर, “आपला नेता त्याच पक्षात आहे ना?” याची खात्री करून मगच प्रचार करावा.

तर सांगायचं कारण, इतकी अनिश्‍चितता इथे आहे.

 

Chhagan Bhujbal Inmarathi
Maharashtra Times

 

असेच एक ज्येष्ठ नेते आहेत छगन भुजबळ. त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पाहुया त्याची कारणं..

छगन भुजबळ यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९४७ साली झाला. म्हणजेच, स्वातंत्र्यदिनानंतर बरोबर दोन महिन्यांनी. सध्या ते भारतातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते आहेत.

भुजबळांनी आपल्या जीवनाची राजकीय सुरुवात १९६० साली शिवसेना या राजकीय पक्षातून केली. मुंबई महानगरपालिकेत त्यांना मोठा सन्मान मिळाला.

१९७३ साली ते मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. १९७३ ते ८४ या काळात ते महापालिकेत विरोधी पक्षनेता झाले, तर १९८५ मध्ये महापौर झाले.

१९९१ मध्ये ते दुसर्‍यांदा महापालिकेत मुंबईचे महापौर झाले. छगन भुजबळ २५ वर्षं शिवसेनेत राहिले, पण बाळासाहेब ठाकरे आणि छगन भुजबळ यांच्यात टोकाचे मतभेद झाले आणि शेवटी छगन भुजबळ यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ म्हटले.

याचं मुख्य कारण होते “शरद पवार”. शरद पवारांनी भुजबळांना आपल्या बाजूने वळवलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा हा धक्काच होता, जेव्हा शरद पवारांच्या संगनमतानं भुजबळांनी शिवसनेची साथ सोडली.

 

Pawar at NCP workers meet Inmarathi
Mumbai:

 

शरद पवार हे त्यावेळी काँग्रेसमध्ये होते. शरद पवार आणि भुजबळ यांच्यासाठी सुद्धा हे खूप मोठं धाडस होतं, कारण बाळासाहेब ठाकरे यांना पक्षबदल अजिबात मान्य नव्हता.

बाळासाहेब ठाकरे यांनासुद्धा खूप आश्‍चर्य वाटलं, कारण शरद पवार हे त्यांचे मित्र होते. राजकारण हा विषय वेगळा ठेऊन त्यांच्यात एक वेगळीच मैत्री होती. ती खूप जुनी होती.

पण राजकीय व्यवहार्यता म्हणून बाळासाहेबांनी शेवटी हे मान्य केलं. पण आपल्यातील चांगला कार्यकर्ता शरद पवारांनी फोडला याचं त्यांना वाईट वाटलं.

शिवसेना व काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या विचारधारा वेगळ्या होत्या. त्यांच्यात एक वेगळंच बाँडींग होतं. शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात काँग्रेसने त्यांना पाठिंबा दिला होता.

त्यांनी खूप चतुराईने साम्यवादाचा द्वेष केला होता आणि हिंसेलासुद्धा विरोध केला होता. १९६० च्या दशकात “कम्युनिस्ट इंडिया पार्टी” कमजोर झाली होती, जी कामगार संघटनांना पाठिंबा द्यायची. त्यांच्यात जो हिंसाचार चालला होता त्याला सुद्धा त्यांचा विरोध होता.

जेव्हा सीपीआयच्या कृष्णा देसाई यांचा खून झाला, तेव्हा कामगार संघटना चळवळ अस्थिर झाली होती.

 

Krushna desai Inmarathi
Site Title – WordPress.com

 

भुजबळांच्या शिवसेना सोडण्याच्या निर्णयाने ठाकरे यांनी खूप आगपाखड केली. शिवसेनेचे स्वयंस्फूर्त कार्यकर्ते जमावाने भुजबळांच्या घराबाहेर जमले.

त्याविषयी बोलताना भुजबळांनी पत्रकारांना सांगितले, जेव्हा त्यांनी घराबाहेर पाहिले तेव्हा त्यांना त्यांचे माजी कार्यकर्ते जमलेले दिसले. त्यांना वाटलं, आपला शेवटचाच दिवस आहे.

कारण शिवसेना या पक्षाचा चांगलाच वचक होता. कार्यकर्ते पण नाराज झाले होते. अशावेळी त्यांनी कोणतंही पाऊल उचललं असतं, पण शिवसेना शांत झाली.

बाळासाहेब ठाकरे म्हणजेच शिवसेनाप्रमुख यांचा एक वेगळाच वचक समाजावर होता. 

मराठी माणसाला मान मिळाला तो बाळासाहेब ठाकर्‍यांमुळेच. ही गोष्ट कोणीच नाकारू शकत नाही. पण शेवटी राजकारणात या गोष्टी चालायच्याच असा विचार करून बाळासाहेब ठाकर्‍यांनी भुजबळ व शरद पवार यांच्याकडे राजकीय व्यवहार अशा दृष्टीनं पाहिलं.

काँग्रेसमध्ये आल्यावर १९९५ ते १९९९ अशा दोन वेळा मुंबईतील माझगावमधून विधानसभेवर त्यांची निवड झाली. ११९१ मध्ये महसूलमंत्री, गृहनिर्माण आणि झोपडपट्टी सुधारणा या खात्याचे १९९५ पर्यंत ते मंत्री होते.

एप्रिल १९९६ मध्ये विधान परिषदेत विरोधी पक्षनेते होते. १८ ऑक्टोबर १९९९ रोजी ते उपमुख्यमंत्री झाले. शिवाय गृह आणि पर्यटन ही दोन खाती सांभाळली.

 

Chhagan Bhujbal upmukhyamantri Inmarathi
Livemint

 

एप्रिल २००२ मध्ये विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली. २००२ ते २००३ मध्ये उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री ही खाती सांभाळली.

२००४ ते २००८ या कालावधीत सार्वजनिक बांधकाम मंत्री, २००८ ला ते महाराष्ट्राचे दुसर्‍यांदा उपमुख्यंमत्री झाले. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी महाराष्ट्राचे पहिले प्रदेशाध्यक्ष  झाले.

अशा रितीने काँग्रेसमध्ये आल्यावर ऑगस्ट २०१३ पर्यंत भुजबळांचे ग्रह चांगले होते. पण आम आदमी पार्टी (एएपी)च्या कार्यकारिणीचे माजी संयोजक अंजली दमानिया यांनी सांगितले की, भुजबळ यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांच्या कार्यकाळात किकबॅकच्या बदल्यात करार दिले होते.

यावरून काही प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा झाली असली तरी डिसेंबरमध्ये आपने मुंबई उच्च न्यायालयात सार्वजनिक हित याचिका दाखल केली.

या आधारावर न्या. मोहित शाह यांनी ईडी आणि भ्रष्टाचार विरोधी ब्यूरो यांच्या समावेशासह एक विशेष टीम नेमली. तपासणीत इडीने पुढाकार घेतला. भुजबळ यांच्या विरोधात केस उभी राहिली.

असंख्य कर्मचारी आणि इतर तक्रारींतून ती केस अधिक बळकट झाली. भारतीय जनतापार्टीचे (भाजपा) संसदेचे सदस्य किरीट सोमैय्या म्हणाले की, ‘महाराष्ट्र सदनच्या बांधकामासाठी करार देण्यात भ्रष्टाचार होता.’

 

Kirit_20Somaiya Inmarathi
eSakal

 

मुंबई एज्युकेशनल ट्रस्टचे संस्थापक ट्रस्टी सुनील कर्वे ज्याचे भुजबळ सहसंस्थापक आहेत त्यांनी धर्मादाय कमिशनरच्या कार्यालयात तक्रार दाखल केली की, भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबाने १३ कोटी रुपयांच्या ट्रस्टची फसवणूक केली आहे.

माजी खासदार समीर भुजबळ म्हणजे भुजबळांचा पुतण्या. त्यांचा पुतण्यावर खूप विश्‍वास होता.

समीर यांना फेब्रुवारी २०१६ मध्ये अटक करण्यात आली आणि समीर यांच्या स्पष्ट विधानामुळे भुजबळ यांना अटक झाली. भुजबळांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि सांगितले की, ‘त्यांचा पुतण्याच यामागील सूत्रधार आहे.’ पण तरीही त्यांना अटक झालीच.

भुजबळांच्या मालमत्तेत मुंबईतील कमीत कमी सहा ठिकाणी ठाणे, बेलापूर, लोणावळा आणि नाशिक यामध्ये फ्लॅट, बंगले, व्यावसायिक इमारती आहेत.

नाशिकमधील भुजबळ फार्मचे मूल्य १०० कोटी आहे. त्यांच्याकडे २२ कोटी रुपयांची घोषित मालमत्ता आहे.

तर मंडळी असा आहे छगन भुजबळ यांचा राजकीय प्रवास.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?