' हुतात्मा औरंगजेबाच्या भावांनी जे केलंय त्याने प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल!

हुतात्मा औरंगजेबाच्या भावांनी जे केलंय त्याने प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

१४ फेब्रुवारी २०१९ हा अतिशय वाईट दिवस होता भारतीय लष्कराच्या इतिहासात. सीमेवर कर्तव्य बजावण्यासाठी निघालेल्या BSF च्या जवानांवर अतिरेक्यांनी हल्ला केला त्यात ४० जवानांचा बळी गेला.

त्याच्या बातम्यांनी, फोटोग्राफ्सनी देशात दुःखाची आणि संतापाची लाट उसळली. लोकांनी सढळ हस्ते सैनिकांच्या कुटुंबियांना मदत केली. पाकिस्तानी अतिरेक्यांना धडा शिकवा असा सूर सगळीकडेच उमटला.

पण आयुष्य चालू रहातं. आपण चार दिवस हळहळलो..पाचवे दिवशी क्षुधा दुःखम् दिने दिने या न्यायाने पुन्हा रोजचं आयुष्य सुरु केलं.

पुलवामाचा भ्याड अतिरेकी हल्ला झाला आणि सारा देश हळहळला..तरणीताठी पोरं लष्करात सीमेवर सेवा बजावायला जात असताना झालेल्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले.

 

PulwamaAttack-inmarathi
tfi.com

फेसबुक, व्हाॅटस्अॅप भावपूर्ण आदरांजली वाहीलेल्या पोस्टनी व्यापलं पण सगळेच लोक काही नुसते कागदी घोडे नाचवून धन्यता मानत नाहीत.

सैनिक हो तुमच्यासाठी म्हणत काही लोक हसत हसत मृत्यूला कवटाळणारं..सतत जन्म मरणाच्या सीमेवरचं खडतर आयुष्य स्वीकारतात..

कोण आहेत ते बहादूर लोक? वाचा आजची दोन भावांची खरीखुरी कहाणी..ज्यांनी आपला भाऊ या दहशतवादी हल्ल्यात गमावला पण उमेद नाही गमावली…

दक्षिण काश्मीर मधील शोपियन जिल्ह्यातील औरंगजेब या सैनिकांवर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून त्याची हत्त्या केली. आज १३ महीने उलटले आणि त्याच्या दोन भावांनी या हत्त्येचा सूड घ्यायचं ठरवलं. त्यांनी सूड घेतला पण वैधानिक मार्गाने.

 

aurangjeb brother inmarathi
jagran.com

आपल्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवून महंमद तारिक आणि महंमद शाबिर या दोन्ही भावांनी भारतीय लष्करात भरती होण्याचा निर्णय घेतला आणि १५६ इंफंट्री बटालियनचे खडतर आणि कठोर प्रशिक्षण पूर्ण केले.

राजौरी जिल्ह्यातील लष्कराच्या हेडक्वार्टरमध्ये ते परेड करणार आहेत.

हे दोघे भाऊ अतिरेक्यांविरुध्द आॅपरेशन आॅल आऊट या अभियानात सहभागी होणार आहेत आणि देशाच्या शत्रूच्या विरोधात लढणार आहेत. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी लष्करी सेवेचीच आहे.

त्यांचे वडील महंमद हनिफ हेही भारतीय लष्करात सेवा बजावत होते.त्यांना आपल्या दोन्ही मुलांच्या निर्णयाचा अभिमान वाटतो आहे.

आपली मुलं देशाची सेवा करणार आहेतच पण ज्या दहशतवादानं देशातील असंख्य निरपराध लोकांचे प्राण घेतले.. त्यांच्या एका मुलालाही खाल्लं त्या दहशतवादाला चिरडायला ही आपली दोन्ही मुलं सज्ज झाली आहेत याचा त्यांना अत्यंत अभिमान वाटतो.

 

 

aurangzeb kashmir army man killed inmarathi

ते म्हणतात, माझ्या दोन्ही मुलांना मी अभिमानाने देशासाठी कर्तव्य बजावण्यासाठी पाठवतो आहे. आपल्या निरपराध भावाच्या मृत्यूचा बदला घेण्याचा याहून उत्तम रस्ता दुसरा असूच शकत नाही.

त्यांनी दिलेली सेवा हीच माझ्या शहीद झालेल्या औरंगजेबला खरी आदरांजली आहे.

ईद साजरी करण्यासाठी औरंगजेब पूंछमधून घरी येत होता तेंव्हा पुलवामातून दहशतवाद्यांनी औरंगजेबचे अपहरण केले आणि नंतर त्याला ठार केले होते.

ती तारीख होती १४ जून २०१८. तो लष्करात रायफल मॅन होता.

भावाच्या मृत्युनंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. पण, त्यांच्या वडीलांची तीव्र इच्छा होती की आपल्या तरुण मुलाला ज्या दहशतवादानं विनाकारण मारलं त्या दहशतवादाला आपल्या मुलांनी चिरडून टाकावं आणि त्यासाठी लष्करात भरती होणं यासारखा दुसरा राजमार्ग नाही.

मग शाबिर आणि तारिक दोघांनीही हे मान्य केलं. अकरा हजार उमेदवारांनी या लष्कर भरतीसाठी अर्ज केला होता. यातून केवळ एकशे एक उमेदवार निवडले गेले. आणि पूंछ जिल्ह्यातील सुराणकोट येथे प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवले.

 

 

army-inmarathi
india.com

याच प्रशिक्षण केंद्रात त्यांचा मोठा भाऊ महंमद कासिम बारा वर्षांपूर्वी दाखल झाला होता.

त्यांचे वडील म्हणतात, माझा मुलगा देशाच्या कामी आला. त्याच्या मृत्यूचं मला दुःख नाही..मला दुःख आहे ते या भ्याड लोकांनी त्याला फसवून अपहरण करून मारल्याचं!

लष्करी प्रवक्त्यानं सांगितलं, “या नविन सैनिकांची परेड होणार आहे ती १५६ इंन्फंट्री बटालियन प्रादेशिक लष्कर पंजाब यांच्याकडून. या भरतीतील बहुतांश उमेदवार हे चांगल्या सभ्य सुसंस्कृत घरातून आलेले आहेत. आणि तरीही हे खडतर प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केलं आहे..”

आपलं दुःख बाजूला सारुन देशासाठी जीव पणाला लावणाऱ्या या जवानांना सलाम!!!!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

3 thoughts on “हुतात्मा औरंगजेबाच्या भावांनी जे केलंय त्याने प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल!

 • July 26, 2019 at 5:48 pm
  Permalink

  सलाम आहे तुमच्या जिद्दीला आणि तुमच्या देशप्रेमाला

  Reply
  • October 17, 2019 at 11:14 pm
   Permalink

   Really proud on u both bhrothers …u both r my Dada from my heart

   Reply
 • July 29, 2019 at 3:05 pm
  Permalink

  महमद

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?