'भगव्या रंगाच्या चपलांवरून गोवा पोलिसांनी त्या खून्याला अखेर पकडलेच!

भगव्या रंगाच्या चपलांवरून गोवा पोलिसांनी त्या खून्याला अखेर पकडलेच!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

होय…!! एखाद्या चित्रपटाची कथा शोभेल अशीच ही घटना आहे! बारा वर्षापूर्वी २००८ मधे गोव्याच्या प्रसिद्ध अंजूना बीचवर स्कार्लेट नावाच्या एका ब्रिटीश तरुणीचा मृतदेह आढळून आला होता.

अकरा वर्षानंतर या तरुणीचा खून करणाऱ्या सॅमसन डिसुझा नावाच्या व्यक्तीस मुंबई हायकोर्टाने १० वर्षांची कैद आणि २.६ लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.

खुन्याने घातलेल्या भगव्या चपलांच्या जोडीमुळेच खुनाच कोडं उलगडलं आणि तब्बल अकरा वर्षांनंतर  केसचा तपास पूर्ण झाला.

१७ फेब्रुवारी २००८ मधे सकाळी 6:१५ वाजता गोव्याच्या अंजूना बीचवर स्कार्लेट कीलींग नावाच्या एका १५ वर्षीय ब्रिटीश तरुणीचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आला होता.

 

scarlet keeling
the telegraph

 

खून करण्याच्या आधी तिला ड्रग देण्यात आले होते आणि तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. खून होण्याच्या दोन तास आधी तिला सॅमसन डिसुझा आणि प्लेसिदो कारवाल्हो या दोघांसोबत पाहण्यात आले होते. दोघांपैकी प्लेसिदोची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

आरोपी सॅमसन डिसुझाचे म्हणणे आहे की ही केस त्याच्यावर चुकीच्या पद्धतीने लादण्यात आली आहे आणि पुरावे देखील चुकीच्या पद्धतीने फ्रेम करण्यात आले आहेत.सॅमसनचे वकील या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील करणार आहेत.

हा खून घडला त्या ठिकाणापासून २ ते ३ मीटर अंतरावर एक भगव्या चपलांची जोड आढळून आली. पोलिस कॉन्स्टेबल गुरुनाथ नाईक यांनी त्याची पंचनाम्यात नोंद देखील करून घेतली. परंतु याचा खुनाशी काही संबंध असेल असे त्यांना वाटले नाही.

त्यामुळे त्या चपला त्यांनी तशाच सोडून दिल्या. कॉन्स्टेबल नाईक यांच्यानंतर आणखी चार जणांनी त्याच चपला तिथे पहिल्या.स्कार्लेटचा मृतदेह पंचनाम्यासाठी घेऊन गेल्यानंतरदेखील त्या चपला तिथे बीचवरील वाळूत तशाच पडून होत्या.

 

samson 3 inmarathi
social news XYZ

 

त्यानंतर संध्याकाळी जेव्हा शेक कामगार सॅमसन शेकवर परत आला आणि माझ्या हरवलेल्या चपला कोणी पहिल्यात का अस विचारू लागला तेव्हा शेकच्या मालकाने त्याच्या भगव्या चपला स्कार्लेटच्या मृतदेहाजवळ सापडल्याचे सांगितले.

तेव्हा सॅमसन म्हणाला की त्या चपला रात्रीपासूनच गायब होत्या.

या घटनेवर कोर्टाचे असे म्हणणे आहे की जेव्हा सॅमसनच्या मालकाने सॅमसनच्या चपला मृतदेहाजवळ सापडल्या आहेत असे सांगितले तेव्हा सॅमसन म्हणाला की तो रात्रीपासूनच या चपलांचा शोध घेत होता परंतु त्याला त्या सापडल्या नाहीत.

याचाच अर्थ या त्याच चपला आहेत ज्या त्याने विक्टिम अर्थात स्कार्लेट बरोबर असताना घातल्या होत्या.

दुसरा एक शेतकामगार चंद्रू चव्हाण ज्याने त्या चपला तिथे मृतदेहाजवळ पहिल्या होत्या. त्याने त्याबद्दल सॅमसनला सांगितले. परंतु सॅमसनने स्वतः जाऊन त्या चपला आणण्याऐवजी चंद्रुलाच त्या आणायला सांगितल्या.

चंद्रूने त्या चपला आणण्यास नकार दिला. त्यानंतर चंद्रूने शेकच्या मालकाकडे काऊंतिनोकडे एक दिवसाची रजा मागितली, मालकाने त्याला परवानगीसाठी सॅमसनकडे पाठवले.सॅमसन म्हणाला की मी तुला एकाच अटीवर परवानगी देऊ शकतो, माझी ती बीचवरची भगवी चप्पल मला आणून द्यायची.

चंद्रूने ती चप्पल शेवटी सॅमसनला आणून दिली. त्यानंतर त्या चपला कोणी बघितल्या नाही. ते शेवटचे दर्शन होते.

 

samson 2 inmarathi
the logical india

 

हायकोर्टाचे न्यायमूर्ती आर डी धनुका आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण म्हणतात, “सर्वसामान्य परिस्थितीत सॅमसनने ती चप्पल स्वतः जाऊन आणली असती, पण त्याने तसे केले नाही. यावरून त्याच्या मानसिक स्थितीचा अंदाज येऊ शकतो.

मनातील अपराधीपणाची भावनाच त्याला तिथे जाऊ देत नव्हती. गुन्हा घडल्यानंतर सॅमसनचे विचित्र वागणं आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणे यातूनच सॅमसनचा गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट होतो.”

“स्कार्लेटचा मृत्यू नैसर्गिक नव्हता हे सॅमसनला माहित होत, म्हणूनच त्याने चंद्रुला ती चप्पल आणायला सांगितली. नाहीतर त्याने ती स्वतः जाऊन आणली असती.” असेही जजनी सांगितलं.

हायकोर्टाला असेही आढळून आले की मृत्यूपूर्वी स्कार्लेट आणि सॅमसन बीचवर नाचगाणे करत होते. स्कार्लेट शेवटची सॅमसनबरोबर दिसली होती त्यामुळे ती बीचवर अर्धनग्न अवस्थेत कशी काय सापडली याचे समाधानकारक उत्तर सॅमसनला देता आले नाही.

“स्कार्लेटचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे असच पोलिस सुरुवातीला म्हणत होते. परंतु माझा यावर विश्वास नव्हता. मला माहित होत तिचा मृत्यू पाण्यात बुडून झाला नाही.त्यामुळे आम्ही त्यांना वकिलामार्फत दुसऱ्यांदा शवविच्छेदन करायला लावलं.”स्कार्लेटच्या आई फिओना सांगत होत्या.

 

scarlett-mother-pti
DNA India

 

दुसऱ्या शवविच्छेदनानंतर स्कार्लेटचा खून झाला होता हे स्पष्ट झालं.फिओना यांचे वकील विक्रम वर्मा यांनी शवविच्छेदन करणाऱ्या pathologist ला बोलून स्कार्लेटच्या शरीराचे काही फोटो घेतले.

त्यामुळे तिच्या शरीरावर हल्ला केलेल्या जखमा होत्या हे सिद्ध झाले. नंतर आलेल्या शवविच्छेदन अहवालात स्कार्लेटच्या शरीरात कोकेन आणि एलएसडी चे प्रमाण अढळून आले. तिच्यावर अत्याचार झाले होते आणि शरीरावर ५० पेक्षा जास्त जखमा आणि व्रण होते.

या सगळ्यात स्कार्लेटच्या आई फिओना यांना खूप त्रास सहन करावा लागला. स्कार्लेटची बॉडी मिळवण्यासाठीच त्यांना साडेचार वर्षे लागली.

 

scarlett murder imarathi
hindustan times

 

स्कार्लेटच्या खूनाने जगभरातील मीडियाचे लक्ष आकर्षून घेतले होते. स्थानिक मीडियाला केवळ सत्य जाणून घ्यायचे होते त्यामुळे त्यांची मला मदत झाली परंतु इंग्लंड मधील मीडियाने मला मदत करण्याऐवजी तुम्ही स्कार्लेटला बीचवर एकट कसं काय सोडलत?

अशा प्रकारचे प्रश्न विचारले ,असं फिओना सांगतात.

 

postmartum
Index of

 

स्कार्लेटच्या ड्रग्स आणि सेक्स लाईफबद्दल मीडियाने पसरवलेल्या अनेक गोष्टी फिओना यांना सहन कराव्या लागल्या.फिओना यांची परवानगी न घेता बॉलिवूड मधे या घटनेवर आधारित एक चित्रपट देखील तयार झाला आहे.

सीबीआयने अपील केल्यामुळे सर्वकाही लवकर होईल असे फिओना यांना वाटले परंतु त्यात देखील अनेक वर्षे निघून गेली. या केस मुळे आपण किती वेळा गोव्यात येऊन गेलो याची गणतीच नाही असं त्या सांगतात.

प्रत्येकवेळी त्या गोव्याला गेल्या की त्यांच्या मुलांना भीती वाटत राहायची. त्यांची सात मुले आता ही दुःखद घटना विसरून आयुष्य आनंदात जगण्याचा प्रयत्न करीत आहेत.

असं कधी होईल हे आम्हाला स्वप्नात देखील वाटल नव्हत. परंतु ते झाल. आता एक कुटुंब म्हणून आमचा यातील भाग संपला असं फिओना यांना वाटतं. गोव्यात घडलेल्या अशा केसेस मधे ज्यांना न्याय मिळण्याची अपेक्षा आहे त्यांना मी नेहमी मदत करीत राहीन असेही त्या म्हणाल्या

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?