' भारताचा पहिलावहिला 'ऑस्कर' - श्रेय जाते या मराठी महिलेला!

भारताचा पहिलावहिला ‘ऑस्कर’ – श्रेय जाते या मराठी महिलेला!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मंडळी, बक्षीस म्हटलं की आपण नेहमीच खूश असतो. त्या त्या क्षेत्रातलं उच्च पुरस्कार मिळाला की, त्याचा आनंद अवर्णनीयच असतो. फिल्म इंडस्ट्रीतील सगळ्यात उच्च पुरस्कार म्हणजे ऑस्कर पुरस्कार.

ज्याचं नुसतं नामांकन झालं तरी लोक खूष होतात, बक्षीस मिळालं नाही तरी नुसतं नामांकन होणं सुद्धा खूप कठीण काम असतं. फिल्म इंडस्ट्रीतील चांगले कलाकार आणि चांगले तंत्रज्ञ यांना हे अ‍ॅवॉर्ड देण्यात येतं.

त्यामुळे हा पुरस्कार मिळावा ही चित्रपट क्षेत्रातील सर्वांचीच जबरदस्त इच्छा असते. हा पुरस्कार देशाला पहिल्यांदा एका महिलेने दिला आहे. त्या महिलेचं नाव आहे…

अहो थांबा, थांबा! नाव सांगण्याच्या आधी त्या व्यक्तीने गाजवलेले पिक्चर्स कोणते ते बघू.

१९४२ लव स्टोरी, लगान, स्वदेस, सत्यम शिवम सुंदरम, राम तेरी गंगा मैली, अमिताभचा अग्निपथ, श्रीदेवीचा चांदनी आणि अशा असंख्य सुपरहिट हिंदी चित्रपटांसाठी नायक- नायिकांचे देखणेपण अथवा चित्रपटाला आवश्यक असणारी व्यक्तिरेखा ठळकपणे अधोरेखित करण्यामागे चक्क एक मराठी व्यक्ती आहे…
ती म्हणजे भानु अथैया!

भानू अथैय्या यांना १९८२ मध्ये रिजर्ड एटनबरो दिग्दर्शित ‘गांधी’ या चित्रपटासाठी ‘बेस्ट कॉश्‍चूम डिझायनर’ चा पुरस्कार मिळाला.

भानू अथय्या या महाराष्ट्रीय आहेत. त्यांचा जन्म २८ एप्रिल १९२९ ला कोल्हापूरमध्ये झाला. त्यांचं खरं नाव आहे भानुमती अण्णासाहेब राजोपाध्ये. गेल्याच वर्षी त्यांचे निधन झाले.

 

bhanu athaiya 3 InMarathi

 

कोल्हापूर ही कलाकारांची नगरी आहे. बरेचसे मराठी कलाकार कोल्हापुरातले आहेत. चित्रपटसृष्टी आणि कोल्हापूर यांचे जवळचे नाते. अशा या कोल्हापुरात जन्म झालेल्या एका महिलेला ऑस्कर अ‍ॅवॉर्ड मिळाले आहे ही खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे.

पण त्यांनी हा पुरस्कार परत दिला.

हा पुरस्कार मिळवणारा अतिशय भाग्यशाली आणि कर्तृत्ववान समजला जातो, त्यातून हा भारतातील पहिलाच पुरस्कार होता. त्यामुळे एवढं मोठं यश मिळालेलं असताना त्यांनी हा का बरं परत केला असेल? तर पाहुया भानू अथय्या यांची गोष्ट.

.

bhanu athaiya 5 InMarathi

 

सात बहीण-भावंडात भानू अथय्या यांचा नंबर तिसरा होता. लहानपणापासून त्यांना रेखाचित्र काढण्याची प्रचंड आवड होती. त्यामुळे त्यांनी येथील जे. जे. स्कूल ऑफ आर्टसमध्ये प्रवेश घेतला व गोल्ड मेडल घेऊन पदवी मिळवली.

सर्व मासिकांमध्ये त्या फॅशन इलेस्ट्रेटर म्हणून स्वतंत्रपणे काम करत होत्या. मॅगेझिन एडिटरच्या सूचनेवरून, त्यांनी चित्रपट पोशाख डिझायनिंग सुरू केले. १९५२ च्या सीआयडी चित्रपटामध्ये प्रथमच भानूंना कॉश्‍चूम डिझायनर म्हणून संधी मिळाली.

 

bhanu athaiya 4 InMarathi

हे ही वाचा – एक असा मराठी माणूस जो सर्वात जास्त शिकलेला व्यक्ती म्हणून ओळखला जातो!

 

जी १९५२ मध्ये रिलीज झाली होती. या काळात त्यांनी पियासा, साहेब बिवी आणि गुलाम, हेरा फेरी आणि श्री नटवरलाल यांसार‘या चित्रपटात काम केले. नंतर हिंदी चित्रपटाचे गीतकार व कवी सत्येन्द्र अथय्या यांच्याबरोबर लग्न झाले व भानुमती राजोपाध्येच्या मा. भानू अथय्या झाल्या.

जेव्हा हॉलीवूडचा दिग्दर्शक रिचर्ड एटनबरो ‘गांधी’ चित्रपट बनवण्यासाठी भारतात आले तेव्हा ते एक पोशाख डिझायनर शोधत होते त्यांना अशी व्यक्ती हवी होती जी महात्मा गांधींच्या विस्तृत जीवनशैलीचा प्रवास लक्षात घेऊन चित्रपटातील सर्व पात्रांचा योग्य पोशाख करेल.

 

Gaandhi movie

 

भानू अथय्या त्यांना भेटल्या आणि त्यांचे समाधान झाले. विशेष म्हणजे भानू अथय्या यांना लहानपणापासून गांधीजींचे रेखाचित्र काढण्याची प्रचंड आवड होती.

त्यांनी ते काम चोख केले आणि त्यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला. तो भारतातील पहिला ऑस्कर पुरस्कार होता म्हणून तो पुरस्कार आणखीनच विशेष ठरला.

 

bhanu athaiya 7 InMarathi

 

१९८३ च्या ऑस्कर उत्सवाची आठवणी सांगताना भानू म्हणतात, ‘‘समारंभाच्या वेळी त्या लेखक जॉनी बिलेल यांच्या बरोबर आल्या होत्या. ते म्हणाले की, तुम्हाला हा पुरस्कार नक्कीच मिळेल.

तसेच तिथे आलेले इतर डिझायनर देखील म्हणत होते की, तुम्हालाच हा पुरस्कार मिळेल.’’ त्यावर त्यांनाच आश्‍चर्य वाटलं की हे लोक इतक्या विश्‍वासाने असं कसं बोलू शकतात?

तेव्हा बाकीच्या डिझायनरनी उत्तर दिले की, ‘‘तुमच्या चित्रपटाची व्याप्ती इतकी मोठी आहे की, आम्ही त्याची बरोबरी करू शकत नाही.’’ १९८३ मध्ये ‘गांधी’ चित्रपटासाठी ऑस्कर मिळवल्यानंतर भानू अथय्या यांना ऑस्करसाठी नमांकित होणार्‍या चित्रपटांसाठी मतदान देण्याचा अधिकार पण मिळाला.

 

India Today

 

त्याच्या नंतर त्यांनी राम तेरी गंगा मैली, हिरो हिरालाल, अग्निपथ, चांदनी, लगान आणि स्वदेश या उत्कृष्ट चित्रपटांसाठी काम केलं.

 

chandni InMarathi

 

१९९१ मधील गुलजार निर्देशित चित्रपट ‘लेकीन’ आणि २००३ मध्ये आशुतोष गोवारिकर दिग्दर्शित ‘लगान’ साठी भानू अथय्या यांना ‘बेस्ट कॉश्‍च्युम डिझायनर साठी राष्ट्रीय पुरस्कार पण मिळाला होता.

 

त्यांनी एकूण १०० पेक्षा जास्त बॉलिवूड चित्रपटात कॉश्‍चूम डिझायनर म्हणून काम केले आहे. गुरुदत्त, यश चोपडा, राज कपूर, आशुतोष गोवारिकर, कॉनरेड रूक्स आणि रिचर्ड एटेनबरो यांच्याबरोबर काम केले आहे.

 

swadesh InMarathi

हे ही वाचा – मानहानीला कंटाळून अखेरिस ‘जातीचा दाखला’ काढणा-या मराठी अभिनेत्रीची दुर्दैवी कथा

‘सी. आई. डी.’, ‘प्यासा’, ‘चौदहवी का चाँद,’ आणि ‘साहब बीबी और गुलाम’, ‘रेशमा और शेरा’ या चित्रपटांनी भानू अथय्या यांना एक नवीन ओळख दिली.

भानू अथय्या यांनी ‘गाईड’मध्ये वहिदा रहमान, ‘बह्मचारी’ मध्ये मुमताज, सत्यम् शिवम सुंदरम् या चित्रपटातील झीनत अमान हिचाही कॉश्‍चूम डिझाइन केला होता.

 

satyam shivam sundaram InMarathi

 

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या चित्रटासाठी पण त्यांनी ड्रेस डिझायनरचे काम केले आहे. तसेच नाटक, सिरीयल्स यासाठीपण त्यांनी काम केले आहे. म्हणजे तंत्रज्ञानातील बदलाप्रमाणे त्या त्या तंत्रज्ञानात त्यांनी आपली कामगिरी चोख बजावली आहे.

भानू अथय्या यांनी आपल्या जीवनावर ‘द आर्ट ऑफ कॉश्‍चूम डिझाईन’ या नावाने एक पुस्तक पण लिहिले आहे. देशाला पहिला ऑस्कर मिळवून देणार्‍या भानू अथय्या यांचा ऑस्कर प्रवास थक्क करणारा आहे.

 

ram teri ganga InMarathi

 

भानू अथय्या या १९५१पासून भारतीय चित्रपटसृष्टीत काम करत आहे. त्यांनी कामिनी कौशल या अभिनेत्रीसाठी पहिल्यांदा पोशाख तयार केला होता. ‘श्री ४२०’ मधील अभिनेत्री नादिरा यांच्यासाठी ‘मुड-मुड के ना देख…’ या गाण्यासाठी केलेल्या गाऊनने नवीन ओळख दिली आहे.

अभिनेत्री साधना यांच्या सलवार कमीजचे डिझाईन हे भानू अथय्या यांचे असायचे. ज्याची जादू ७० व्या दशकात फॅशन म्हणून ओळखली गेली.
भानू अथय्या या ऑस्कर मिळवणार्‍या भारतातील पहिल्या व्यक्ती आहेत.

 

heena InMarathi

 

पण २०१२ मध्ये भानू अथय्या यांनी १९८३ मध्ये मिळालेला पुरस्कार परत देण्याची घोषणा केली. त्यांचा असा विश्‍वास होता की, त्यांचे कुटुंब आणि भारतीय सरकार त्यांचा अमूल्य पुरस्कार सुरक्षित ठेवतील की नाही याची त्यांना चिंता होती.

 

त्यामुळे हा पुरस्कार ‘ऑस्कर अ‍ॅवॉर्ड अकादमी’त सुरक्षित राहील. तर अशी आहे ही कथा भारतातल्या पहिल्या ऑस्कर पुरस्काराची व तो मिळवणार्‍या महिलेची म्हणजेच भानू अथय्या यांची.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?