' तरुणांना म्हातारं दाखवणाऱ्या ' फेस ऍप' वरून गंमत करणाऱ्यांनो : सावधान!

तरुणांना म्हातारं दाखवणाऱ्या ‘ फेस ऍप’ वरून गंमत करणाऱ्यांनो : सावधान!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

आपल्याकडे म्हणजे जगात सगळीकडेच नादिष्ट माणसांची कमतरता नाही. कुठलीही लाट आली तरी त्यात वाहवत जाणाऱ्यांची संख्या जगात सगळीकडेच प्रचंड आहे. रोज कुठले ना कुठले फॅड येते आणि लोक त्यात वाहवत जातात.

मध्यंतरी स्नॅपचॅटवर एक फिल्टर आले होते ज्यात मोठी माणसं लहानपणी कशी दिसत असतील असा फोटो तयार व्हायचा.

झालं! हे फिल्टर जगात इतकं व्हायरल झालं की सिने नट नट्या म्हणू नका, नेते म्हणू नका, खेळाडू म्हणू नका, अगदी बहुतांश प्रसिद्ध लोकांचे लहानपणीचे अवतार लोकांनी नेटवर फिल्टर करून टाकले.

त्यानंतर आता फेस ऍप नावाचे नवीन फॅड सध्या सगळीकडे आले आहे.

जिथे म्हातारी माणसे आपले केस रंगवून, सुरकुत्या कमीत कमी दिसाव्या आणि आपले वय झाले असे दिसू नये ह्या प्रयत्नात असतात तिथे तरुण माणसे मात्र ह्या फेस ऍपच्या लाटेत वाहवत जात आहेत.

 

faceapp-john-buysse-1

 

आपण म्हातारपणी कसे दिसू ह्या उत्सुकतेपोटी हे ऍप डाउनलोड करत आहेत आणि त्यात आपला फोटो किंवा त्यांच्याकडे असणारे दुसऱ्यांचे फोटो टाकून म्हातारपणी आपण कसे दिसणार ह्याची मजा घेत आहेत.

नेटवर तर लगेच सध्या तरुण असलेल्या सिनेनट आणि नट्या ,खेळाडू ह्यांचे देखील म्हातारपणाचे रूप बघायला मिळते आहे. पण ही गंमत उद्या आपल्यावरच बेतू शकेल ह्याचा साधा विचार देखील कुणाच्या डोक्यात येत नाहीये.

म्हणून हा लेखप्रपंच की ह्या डेटा चोरीच्या जमान्यात तुमचा अत्यंत महत्वाचा आणि खाजगी डेटा तुम्ही ह्या फेस ऍपच्या माध्यमातून कंपनीच्या हवाली अगदी सहज करत आहात.

ह्या डेटाचा पुढे गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कुठलेही सॉफ्टवेअर डाउनलोड करताना किंवा ऍप इन्स्टॉल करताना आपण “आय ऍग्री टू ऑल द टर्म्स अँड कंडिशन्स” ह्या पर्यायावर आंधळेपणाने आय ऍग्री म्हणून न वाचता क्लिक करतो.

पण असे करताना आपण आपला खाजगी डेटा त्या कंपनीच्या हवाली करत असतो, त्यांना आपल्या डिव्हाईसमधील डेटा ,कॉन्टॅक्टस, फोटोस, गॅलरी, कॅमेरा ऍक्सेस करू देण्याची सहज परवानगी देत असतो.

 

the-home-screen-of-faceapp-once-you-download-it
Inverse

आपल्या मोबाईल किंवा कम्प्युटरमध्ये आपली अत्यंत महत्वाची आणि खाजगी माहिती असते. तीच “आय ऍग्री” म्हणून आपण अनावधानाने म्हणा किंवा अज्ञाननामुळे म्हणा, दुसऱ्याला वापरण्याची परवानगी देत असतो. आणि त्याचे परिणाम काही चांगले होत नाहीत.

हल्ली जग ज्या प्रकारे चालले आहे ते बघून आपला डेटा चांगल्या कामासाठी वापरला न जाता वाईट कामासाठीच किंवा स्वार्थासाठी, फसवणूक करण्यासाठी वापरला जाण्याचीच शक्यता अधिक आहे.

ह्याचेच उदाहरण आठवण्यासाठी फार मागे जाण्याची गरज नाही. केम्ब्रिज ऍनॅलॅटिकाची केस ही अशीच डेटा चोरी आहे.

सध्या सगळीकडे व्हायरल झालेले हे फेस ऍप हे गेल्या अनेक वर्षांपासून लोकांना त्यांच्या फोटोतील हावभाव बदलण्यासाठी, लूक बदलण्यासाठी विविध फिल्टर्स आणि एडिटिंगची सुविधा देत आहे.

आता ह्या ऍपने चक्क लोकांना त्यांचे वय बदलण्याची सुविधा देखील उपलब्ध करून दिली आहे.

माणसाला नेहमीच भविष्याविषयी आकर्षण असते. आपण भविष्यात कुठे असू, काय करत असू, कसे दिसत असू ह्याची उत्सुकता जवळजवळ सगळ्यांनाच असते.

 

nick jonas
ABC13 Houston

लोकांची हीच कमजोरी ध्यानात ठेवून ते ऍप्स बनवले जातात आणि ते प्रचंड लोकप्रिय होतात.

फेसबुक वर असणारे “हू इज युअर सोलमेट”, “व्हेन यु विल डाय”, “व्हॉट काईन्ड ऑफ चीज आर यु”, “विच गेम ऑफ थ्रोन कॅरॅक्टर आर यु” असे जे गेम्स असतात ते ह्याच प्रकारातले असतात जे आपल्या नकळत आपल्याकडून आपला खाजगी डेटा काढून घेतात.

तो वेळोवेळी ऍक्सेस करण्याची परवानगी सुद्धा आपणच त्यांच्या टर्म्स अँड कंडिशन्स न वाचता आंधळेपणाने “आय ऍग्री’ वर क्लिक करून त्यांना अगदी सहज देऊन टाकतो.

फेस ऍप बाबतीत सुद्धा आपण हेच करतो आहोत. आपला कॅमेरा, गॅलरी, कॉन्टॅक्टस ऍक्सेस करण्याची त्यांना परवानगी देऊन आपण त्यांना चक्क त्यांना आपले नाव आणि फोटो त्यांना वाटेल त्या कामासाठी आणि त्यांना हवे तितका काळ वापरण्याची परवानगी देत आहोत.

ह्या गोष्टीचे गांभीर्य किती जास्त आहे हे लक्षात घ्या नेटकऱ्यांनो!

केंब्रिज ऍनॅलॅटिकाच्या केस मधून आपण अजूनही धडा घेतलेला नाही असेच ह्यावरून दिसते. कुणीतरी काहीतरी नवीन फॅड काढतं आणि जग त्या लाटेत कुठल्याही परिणामांचा विचार न करता वाहवत जातं.

 

people are doing Faceapp
Hypebeast

आजपर्यंत १,००,००० मिलियन लोकांनी हे फेस ऍप गुगल प्ले वरून डाउनलोड केलं आहे. आणि ऍप ऍनीच्या माहितीनुसार १२१ देशांत फेस ऍप हे सध्या iOs ऍप स्टोअरवर टॉप रँक ऍप आहे.

फेस ऍपच्या “टर्म्स ऑफ सर्व्हिस” मध्ये असे लिहिले आहे की युझर्सच्या कन्टेन्टचे (नाव आणि चेहेरा) मालकी हक्क युझर्सकडेच आहेत पण कंपनीकडे हा डेटा कुठेही, कधीही, कसाही आणि कितीही काळापर्यंत आणि कुणाहीपुढे वापरण्याचे रॉयल्टी फ्री लायसन्स आहे.

जेव्हा तुम्ही फेस ऍप इन्स्टॉल करून ते वापरण्यासाठी आय ऍग्री असे क्लिक करता तेव्हा तुम्ही पुढील गोष्टींसाठी त्यांना परवानगी देत असता.

“You grant FaceApp a perpetual, irrevocable, nonexclusive, royalty-free, worldwide, fully-paid, transferable sub-licensable license to use, reproduce, modify, adapt, publish, translate, create derivative works from, distribute, publicly perform and display your User Content and any name, username or likeness provided in connection with your User Content in all media formats and channels now known or later developed, without compensation to you. When you post or otherwise share User Content on or through our Services, you understand that your User Content and any associated information (such as your [username], location or profile photo) will be visible to the public.”

ह्या त्यांच्या टर्म्स ऑफ सर्व्हिस आहेत.

 

terms and conditionsterms and conditions
BBC

आता हे कितपत गंभीर आहे हे येणारा काळच सांगू शकेल पण त्यांच्याकडे असलेल्या डेटाचे काहीही करण्याचा हक्क त्यांच्याकडे आहे. ह्या ऍपची पॅरेण्ट कंपनी वायरलेस लॅब्स ही एक रशियन कंपनी आहे.

तुमचे फोटो काही जाहिरातींसाठी वापरले जाऊ शकतात आणि तुमचा चेहेरा AI फेशियल रेकग्निशन अल्गोरिदमच्या ट्रेनिंगसाठी वापरला जाऊ शकतो.

अर्थात ह्याने तुम्हाला कितपत फरक पडतो हे प्रत्येकाच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे.

वर म्हटल्याप्रमाणे फेसबुक गेम्सचा माध्यमातून जो डेटा मिळवला जातो तो कशासाठी वापरला जाईल ह्याबद्दल कुणीच काही सांगू शकत नाही कारण हा डेटा प्रत्येक वेळेला सुरक्षित आणि खाजगी ठेवला जाईल ह्याची कुणीच ग्वाही देऊ शकत नाही.

जेव्हा तुम्ही क्लाउडवर कुठलीही गोष्ट अपलोड करता, तेव्हा त्या डेटावरचा कंट्रोल तुमच्या हातातून गेलेला असतो.

ह्याचा तुमचा डेटा वापरण्याची कायदेशीर परवानगी देण्याशी किंवा न देण्याशी काहीही संबंध नाही. म्हणूनच प्रायव्हसी सेन्सिटिव्ह ऍपल हे त्यांचे सगळे AI चे काम ऑन डिव्हाईस करते.

 

YouTube
YouTube

फेस ऍप वापरण्यासाठी तुम्हाला त्यांना तुमच्या सगळ्या फोटोजचा ऍक्सेस देण्याची परवानगी द्यावी लागते. पण त्याबरोबरच त्यांना आपण सिरी आणि सर्चचाही ऍक्सेस देतो आहोत.

बॅकग्राऊंडला सुद्धा त्यानं रिफ्रेश करण्याचा त्यांना ऍक्सेस मिळतो. म्हणजेच हे लक्षात घ्या की जरी तुम्ही फेस ऍप वापरत नसाल,तरी फेस ऍप मात्र तुमचा डेटा वापरत असते.

म्हणूनच तुम्ही जेव्हा कुठलेही ऍप किंवा सॉफ्टवेअर डाउनलोड करता, तेव्हा ते ऍप तुमचा डेटा /डिजिटल कन्टेन्ट वापरण्याची परवानगी आणि ऍक्सेस मागतं तेव्हा काळजी घेतलीच पाहिजे आणि हे गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?