' अनिल कुंबळेच्या आधी या गोलंदाजाने कसोटीच्या एका डावात १० बळींचा विक्रम केला होता...

अनिल कुंबळेच्या आधी या गोलंदाजाने कसोटीच्या एका डावात १० बळींचा विक्रम केला होता…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

क्रिकेट हा खेळ जगभरात विशेष लोकप्रिय आहे आणि भारतातल्या लोकांविषयी बोलायचं झालं तर क्रिकेट हा सर्वच जनतेचा क्रिकेट हा श्‍वास आहे. क्रिकेटवर सगळ्यात जास्त सट्टा लावला जातो. जिथे लोक कोटी रुपयांचे पैसे लावतात.

जगभरात आवडीने बघितला जाणारा हा एकच खेळ असावा. जेव्हा कोणतीही फायनल असते तेव्हा अगदी रस्त्यावरसुद्धा शुकशुकाट असतो इतका हा खेळ जगभरात प्रसिद्ध आहे.

क्रिकेटमध्ये कोणतीही भविष्यवाणी करणे मुश्कील असते. अशा तर्‍हेने क्रिकेटमध्ये खूप सारे रेकॉर्ड होतात आणि खूप सारे रेकॉर्ड प्रत्येक मॅचमध्ये मोडले पण जातात, पण काही असे रेकॉर्ड असतात की जे वर्षानुवर्षे तसेच राहतात.

 

Cricket
Rajat Gupta Photography

असंच एक रेकॉर्ड आहे की जे अजून कोणी मोडू शकलं नाही. ६२ वर्षांपूर्वी एका स्पिनरने एकट्याने पूर्णच्या पूर्ण संघाला आउट केलं.

म्हणजेच ऑल आऊट! असा अविश्‍वसनीय पराक्रम आत्तापर्यंत फक्त दोनदा झालं होतं पाहुया कोणी कोणी केला आहे हा अविश्‍वसनीय पराक्रम!

क्रिकेटमधील विविध फॉरमॅटपैकी टेस्ट क्रिकेट हा एक फॉरमॅट आहे. वन डे, टी ट्वेंटी यापूर्वी हा खेळ टेस्ट क्रिकेट या एकाच फॉरमॅटमध्ये खेळला जायचा.

टेस्ट क्रिकेटमध्ये चार दिवस एक सामना खेळला जातो आणि अशावेळी कधीकधी फलंदाजीपेक्षा गोलंदाजीच निर्णायक ठरते.

जास्तीतजास्त बळी मिळवणे व समोरच्या संघाला लवकरात लवकर रवाना करणे हे अत्यंत महत्त्वाचे असते आणि गोलंदाजांचे खरे कसब पणाला लागते.

 

Test Cricket
ABC

अन्य खेळांप्रमाणे क्रिकेट हासुद्धा एक असा खेळ आहे की कधीही काहीही होऊ शकते.

मॅच हातातून गेलीच असे वाटत असताना पुढच्याच ओव्हरला मॅच फिरणे किंवा अगदी जिंकत आलेली मॅच अचानकपणे हरणे यासारख्या गोष्टी सातत्याने घडतच असतात, परंतु खेळामध्ये काही अशा घटना घडतात ज्या विसरणे क्रिकेटप्रेमींना शक्यच नाही.

अशीच घटना जिम लेकर यांची.. पाहुया काय कामगिरी केली या खेळाडूने.

क्रिकेट टीममधील अकरा खेळाडू असतात. आता विचार करा की यातले दहा खेळाडू जर आउट झाले तर मॅचच संपली. अशीच काहीशी घटना घडली जेव्हा इंग्लंडचे जिम लेकरने विरुद्ध पक्षाच्या टीममधील खेळाडूंना एकट्यानेच आउट करून टाकलं.

ही १९५६ सालातील गोष्ट आहे. त्या वर्षी ३१ जुलैला जिम लेकरने ही अपूर्व कामगिरी केली.

विचार करा एकाच बॉलरने सगळा डावच संपवून टाकला. म्हणजे त्याच्या एकट्याच्या जिवावर पूर्ण मॅच जिंकली. क्रिकेटच्या भाषेत बोलायचं झालं तर धुवाधार कामगिरी केली.

 

Jim Laker
Wisden

जर तुम्हाला वाटत असेल की, हे रेकॉर्ड त्यांनी त्यांच्या नशिबामुळे मिळवलं तर ते चूक आहे. कारण याच बॉलरने अप्रतिम कामगिरी केल्यामुळे १९ कसोटीत १९ विकेट घेतल्या. म्हणजेच प्रत्येक खेळातच ते फार उत्कृष्ट कामगिरी करत होते.

पण एका खेळात त्यांनी कमालच केली. एकट्यानेच सर्व डाव संपवण्याची कामगिरी जिम लेकरने इंग्लंड ऑस्ट्रेलिया सिरीज मध्ये केले होते.

ही एैतिहासिक मॅच मॅनचेस्टरच्या ओल्ड ट्रेफर्ड मध्ये इंग्लंड-ऑस्ट्रेलिया सिरीज च्या चौथ्या टेस्टमध्ये झाली होती. त्या टेस्ट मॅचच्या पहिल्या डावात  ३७ रन आणि ९ विकेट त्याने घेतल्या होत्या.

 

record
ESPNcricinfo.com

तेव्हा जिम लेकर सगळ्या १० च्या १० विकेट घेऊ शकले नाहीत कारण एक विकेट टॉनी लॉकने घेतली होती. ३१ जुलैला टेस्टच्या शेवटच्या दिवशी खेळताना दुसर्‍या डावात ८४/२ स्कोरवरून परत खेळायला सुरुवात केली.

जिम लेकरने विकेट घेणं सुरूच ठेवलं. त्यांना ऑस्ट्रेलियाचा कोणताही खेळाडू थांबवू शकत नव्हता, लेन मेडॉक्स ची शेवटची विकेट एलबीडब्ल्यू झाला आणि त्याच बराबेर ५३ रन देऊन संघाचे १० च्या १० विकेट जिम लेकरच्या खात्यामध्ये गेले.

त्या टेस्ट मॅचमधील एकूण २० मधील १९ विकेट त्यांनी एकट्यांनी घेतले आणि इंग्लंडने एक डाव आणि १७० धावांनी विजय मिळवला.

हा सामना ३१ जुलै १९५६ रोजी संपला आणि त्यांचं रेकॉर्ड झालं. एकाच माणसाने ऑल आउट म्हणजे सर्व खेळाडूंची विकेट घेतली. तर जिम लेकर प्रमाणेच रेकॉर्ड एक नाही दोन नाही तर तब्बल ४३ वर्षांनंतर लेगस्पिनर अनिल कुंबळेने १९९९ साली केले.

एका भारतीय खेळाडूने. या रेकॉर्डमुळे त्या खेळाडूचं नाव जगभरातील तमाम क्रिकेटपटूंच्या हृदयावर कायमचे कोरले गेले.

खरेतर क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. त्यामुळे अर्थातच जबाबदारी सर्वांवर असते, पण कधीकधी संघातला एकच खेळाडू अशी काही कामगिरी करतो की, त्यामुळे पूर्ण संघ यशस्वी होतो.

ती घटना होती टेस्ट क्रिकेटच्या एका डावात दहा बळी घेण्याची.

 

10 Wickets
YouTube

भारत विरुद्ध पाकिस्तानच्या कसोटीत दिल्लीमध्ये एका डावात १० बळी घेण्याची नोंद केली. पाकिस्तानला ४२० धावा करायच्या होत्या. पाकिस्तान १०१ धावांची भागीदारी करून चांगली सुरुवात केली होती, कुंबळेने त्यांच्या विजयाच्या आशेवर पाणी फिरवले.

अनिल कुंबळेने दहाच्या दहा विकेट घेतल्या आणि त्याने ७४ रनसुद्धा केल्या होत्या. अनिल कुंबळेने असामान्य गोलंदाजी केली.

अशा १० च्या १० विकेट घेणारा अनिल कुंबळे हा दुसर्‍या क्रमांकाचा खेळाडू ठरला. त्याच्या या यशाचे सर्वत्र खूप कौतुक झाले व त्याच्या नावावर हे रेकॉर्ड नोंदवलं गेलं.

पण तरीही जिम लेकरचं रेकॉर्ड तसंच राहिलं कारण त्यांनी एकाच खेळामध्ये १९ विकेट घेतल्या. आज २६ वर्षं झाली तरी त्यांचं हे रेकॉर्ड कोणी मोडू शकलं नाही. आता पाहू हे रेकॉर्ड कोण मोडू शकेल?

१९८६ मध्ये जिम लेकरचा मृत्यू झाला. त्याने ४६ कसोटीत २१.२४ च्या सरासरीने १९३ विकेट घेतल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटचा विचार करताना ४५० मॅचमध्ये १८.४१ सरासरीने १९४४ विकेट घेतल्या.

 

bawling
CricketCountry.com

क्रिकेट किंवा कोणताही खेळ हा सांघिक असतो. दोन खेळाडूंच्या एकमेकांवरील विश्‍वासावर किंवा त्यांच्यातील अंडरस्टँडिंगवर खेळ अवलंबून असतो, पण कधीतरी एकच खेळाडू आपलं सारं कौशल्य पणाला लावतो व सर्व मॅचचा विजय आपल्याच खिशात घालतो आणि ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरतो.

ते एक शानदार रेकॉर्ड बनून राहते कोणीही न मोडण्यासाठी.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?