' फक्त मैदानावरच नाही, खऱ्या आयुष्यातही त्याचा संघर्ष तितकाच खडतर आहे!

फक्त मैदानावरच नाही, खऱ्या आयुष्यातही त्याचा संघर्ष तितकाच खडतर आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

आपले ध्येय साध्य करण्यासाठी केलेली कठोर मेहनत आपल्याला काय देऊ शकते ह्याचे उत्तम उदाहरण दाखवणारा आजचा हा लेख खास क्रिकेट प्रेमींसाठी.

एका मध्यमवर्गीय राजपूत कुटुंबात जन्मलेल्या त्याला आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे अनेक सुखसोयीना मुकावं लागलं.

त्याचे वडील वॉचमन होते, आई तो लहान असतानाच देवाघरी निघून गेलेली… आणि एक मोठी बहीण. त्याची बहीण केवळ १७ वर्षांची होती जेव्हा त्याची आई त्यांना सोडून गेली.

आईच्या माघारी बहिणीनेच त्याला आईचे प्रेम दिले आणि आपल्या कुटुंबाचा आधार म्हणून भक्कम उभी राहिली. नंतर आपल्या मेहनतीने तिने आपल्या आईची नर्स ची नोकरी देखील मिळवली आणि इकडे भावा बहिणीचं जग फुलत राहीलं.

 

jadeja sister inmarathi

नात्याची वीण दिवसेंदिवस घट्ट होत गेली. आजही तो आपल्या बहिणीच्या खूप जवळ आहे केवळ तिला आणि तिलाच तो आपल्या आयुष्यातली एकूण एक गोष्ट सांगतो.

आम्ही बोलतोय भारतीय क्रिकेट टीम चा स्टार ऑलराउंडर रवींद्र अनिरुद्ध जडेजा बद्दल. ज्याला वॉचमनचा मुलगा म्हणून सोबतची मुलं हिणवायचे, त्रास द्यायचे तो आज भारतीय संघातला सर्वश्रेष्ठ ऑल राऊंडर आहे.

रवींद्रचा जन्म ६ डिसेंबर १९८८ साली गुजरातच्या नवगाम येथे झाला. त्याची आई लता ही सरकारी दवाखान्यात नर्स होती.

चार जणांच्या कुटुंबाला राहायला केवळ एका खोलीचे घर होते. ज्या काळी त्यांच्या गावातल्या स्त्रीया घराबाहेरही पडत नसत त्या काळी त्याच्या आईने नोकरी करणे ही त्यांच्या समाजासाठी खूपच मोठी गोष्ट होती.

त्याच्या वडिलांच्या नोकर्‍या सतत बदलत्या, त्यामुळे आर्थिक भार आईवर अधिकच पडायचा. मात्र आर्थिक परिस्थिति इतकी नाजुक असताना देखील रविंद्रने शाळा सोडली नाही. त्याने आपले शिक्षण सुरूच ठेवले.

 

ravindra inmarathi
photoartinc.com

इतर लहान मुलांप्रमाणे त्यालाही खेळाची भारी आवड. मात्र त्याची ही आवड तात्पुरती नव्हती. वयाच्या दहाव्या वर्षापासूनच त्याने खेळात सहभागी व्हायला सुरुवात केली होती.

लहानपणी खेळताना त्याला मैदानावरच्या मोठ्या मुलांचा फार राग याचा कारण ती मुलं रवींद्रला बॅटिंग करायची संधीच देत नसत.

त्याचा त्याला इतका त्रास व्हायचा की त्याला रोज रात्री झोपताना हे आठवायचं आणि मग तो रडायचा. त्यावेळी त्याच्या आयुष्यात एक माणूस आला ज्याने रवींद्रचे क्रिकेट जीवनच बदलून टाकलं. त्यांचं नाव होतं महेंद्रसिंह चौहान.

 

mahendr sigh chauhan inmarathi

पोलिस दलात काम करणारे महेंद्रसिंह चौहान हे एक चांगले क्रिकेटर देखील होते. क्रिकेट बंगला नावाच्या मैदानावर ते तरुणांना क्रिकेट शिकवत.

पिचच्या मधोमध एका मुलाला उभे करून स्पिन बॉलर्सना उसळते बॉलिंग शिकवण्याची आगळीच टेक्निक त्यांना अवगत होती. ते मुलांना त्यांच्या डोक्यावरून बॉलिंग करायला सांगत.

ते शिस्तीचे फार कडक होते. त्याच शिस्तीचा उपयोग रवींद्रला आपल्या आयुष्यात देखील झाला. त्याला झोपेत चालायची सवय होती ती मोडली. त्यांना जे पटले नाही त्यासाठी ते मागेपुढे न पाहता सरळ विद्यार्थ्यांच्या कानाखाली लावत.

 

jadeja inmarathi
YourStory.com

एका सामन्यात खेळताना जेंव्हा रवींद्र नीट खेळला नाही तेव्हा त्यांनी भर मैदानात रवींद्रच्या कानाखाली लावली होती. त्या सामन्यात नंतर रवींद्रने एकूण पाच विकेट घेतल्या होत्या.

महेंद्रसिंह चौहान ह्यांच्यासाठी क्रिकेट, घर आणि अभ्यास ह्या तीनच गोष्टी महत्वाच्या होत्या. ह्या व्यतिरिक्त त्यांना विद्यार्थी बाहेर फिरताना टवाळक्या करताना दिसले की मार ठरलेलाच असायचा.

पुढे रविंद्र्समोर दोन पर्याय होते, एक तर सैनिक शाळेत जाणे किंवा क्रिकेट बंगला. त्याने क्रिकेटची निवड केली आणि फास्ट बॉलर म्हणून खेळायला सुरुवात केली. पुढे चौहान ह्यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे तो डाव्या हाताचा प्रमुख स्पिनर बनला.

 

jadeja bowling action inmarathi

 

वयाच्या १६ व्या वर्षी जडेजाने २००५ साली भारतासाठी अंडर -१९ क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

तो २००८ सालच्या  अंडर -१९ क्रिकेट विश्वचषक जिंकणार्‍या भारतीय संघाचा उपकर्णधार देखील होता. त्याने २००६-७ च्या Duleep Trophy मध्ये दमदार पदार्पण केले होते ज्यात तो वेस्ट झोनकडून खेळला होता.

तो रणजी ट्रॉफी मध्ये सौराष्ट्रासाठीही खेळलेला आहे. २०१२ साली म्हणजे वयाच्या २३ वर्षी तो क्रिकेटच्या इतिहासातला आठवा खेळाडू बनला आणि पहिला भारतीय ज्याने डोमेस्टिक क्रिकेटमध्ये तीनदा तिहेरी शतक झळकवले आणि डॉन ब्रॅडमन, ब्रायन लारा, बिल पोंसफोर्ड, वाल्टर लेमंड सोबत, डब्ल्यूजी ग्रेस, ग्रीम हिक आणि माइक हसी ह्यांच्या पंक्तीत जाऊन बसला.

 

ravindra jadeja inmarathi
county.com

२००८-०९ च्या रणजी सीजन मध्ये ७३९ रन आणि ४२ विकेट घेतल्यानंतर त्याचा उत्तम खेळ पाहून त्याची अंतरराष्ट्रीय टीम साठी निवड झाली. त्याने श्रीलंका विरुद्ध एकदिवसीय सामन्यात नाबाद ६० धावा केल्या.

तेव्हापासून तो भारतीय संघाचा एक महत्वाचा खेळाडू बनला आहे आणि त्याने राष्ट्रीय टीम साठी एक कुशल ऑलराउंडर म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे.

२०१३ ची चैंपियंस ट्रॉफी जिंकून त्याने स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध केले. तो १२ विकेट घेतलेला टूर्नामेंट मधला सर्वात जास्त विकेट घेणारा बॉलर होता.

ऑगस्ट २०१३ पर्यन्त एकदिवसीय क्रिकेट मध्ये तो विश्वातला प्रथम क्रमांकाचा बॉलर होता. १९९६ मधल्या अनिल कुंबळेच्या विक्रमानंतर ह्या रेकॉर्डवर दावा करणारा तो एकमेव भारतीय होता.

त्यानंतर २००८ साली इंडियन प्रीमियर लीग (आईपीएल) च्या पहिल्या सिजनसाठी त्याला राजस्थान रॉयल्सच्या संघाकडून विकत घेतले गेले. 

 

Dhoni and Jadeja Inmarathi

२०१३ साली ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात त्याने असामान्य प्रदर्शन केले आणि तो सोशल मीडियाच्या नजरेत आला.

तिथे तो असा व्हायरल झाला की थेट रजनीकांतशी त्याची तुलना केली गेली. मात्र ह्यावर त्याने कोणातही प्रतिक्रिया न देता वेळ हसून साजरी केली.

त्यानंतर संघातले इतर खेळाडू जसे महेंद्र सिंग धोनी, सुरेश रैना आणि रविचंद्रन ह्यांनी देखील त्यावर मजेदार ट्विट्स केले होते. तेव्हापासून तो सोशल मीडिया वर जोक्स आणि मिम्स साठी प्रसिद्ध झालाय.

१७ एप्रिल, २०१६ ला तो रिवाबा सोलंकी हिच्याशी विवाहबद्ध झाला.

jadeja wedding inmarathi

 

शिस्तीसाठी आपल्या कोचकडुन मार खाण्यापासून क्रिकेट मध्ये भारताचा सर्वश्रेष्ठ ऑलराउंडर बनेपर्यंत त्याने एक मोठा पल्ला गाठला आहे.

येत्या काळातही तो असाच यशाचा एकेक टप्पा गाठत आपल्या सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करेल अशी अपेक्षा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?