'वैज्ञानिकांना सापडला तब्बल ११ अब्ज वर्षे जुना तारा!

वैज्ञानिकांना सापडला तब्बल ११ अब्ज वर्षे जुना तारा!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

 

आपलं विश्व आहेच मुळी असं की कित्येक अनुत्तरीत प्रश्नांचं जणू पांघरून ओढून बसलंय. याच अंतराळातील असंख्य ताऱ्यांकडे नुसतं पाहिलं तरी मनात प्रश्नांचं अगदी वादळ उठतं. पृथ्वीवरून इवलुशे दिसणारे, लुकलुकणारे तारे प्रत्यक्षात मात्र इतके दूर असतात असतात की त्यांच्या पर्यंत पोचायचं म्हटलं तरी पुरा जन्म पुरणार नाही. अश्या असंख्य ताऱ्यांच्या घोळक्यात एक असा तारा दडून बसला होता जो तब्बल ११ अब्ज वर्षे जुना आहे. पण आपल्या शास्त्रज्ञांनी अखेर या ताऱ्याला शोधून काढलेचं!

11-Billion-Years-Old-Star-marathipizza00

स्रोत

व्हिस्कॉन्सिन-मिलवौकी विद्यापीठातील प्राध्यापक डेव्हिड काप्लान आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या हिऱ्याचा शोध लावला आहे. नॅशनल रेडिओ अॅस्ट्रॉनॉमी ऑब्झर्व्हेटरी (एनएआरओ), ग्रीन बँक टेलिस्कोप (जीबीटी); तसेच बेसलाइन अॅरे (व्हीएलबीए) यांच्याद्वारे केलेल्या निरीक्षणांतून हा शोध लागला आहे.

11-Billion-Years-Old-Star-marathipizza02

स्रोत

खगोलशास्त्रज्ञांना सुमारे ९०० प्रकाशवर्ष अंतरावर अवकाशात पृथ्वीच्या आकाराचा ‘हिरा’ सापडला आहे. हा थंड तसेच सफेद तारा असण्याची शक्यता आहे. थंडपणामुळे या ताऱ्यावरील कार्बनचे स्फटिकांमध्ये रूपांतर झाले आहे. त्यामुळे हा अवकाशातील पृथ्वीच्या आकाराचा हिरा असल्याचा भास होत आहे. लहान आकारातील या ताऱ्याचे वय ‘मिल्की वे’ आकाशगंगेइतकेच सुमारे ११ अब्ज वर्षे आहे, असे संशोधकांचे मत आहे.

11-Billion-Years-Old-Star-marathipizza01

स्रोत

लहान आकारातील हे तारे प्रामुख्याने कार्बन आणि ऑक्सिजनपासून तयार झालेले हे तारे अब्जावधी वर्षांपासून हळूहळू थंडावत जाऊन फिके पडतात. टेलिस्कोपद्वारे केलेल्या निरीक्षणांच्या आधारे या ताऱ्याचे अंतर पृथ्वीपासून ९०० प्रकाशवर्ष असल्याचा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे.

११ अब्ज वर्षे जुन्या ताऱ्याचा शोध लागल्याने त्याहीपेक्षा जुने तारे आहेत का याबद्दल जगाचे कुतूहल वाढीस लागले आहे !

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?