'मराठी माणूस गुजराती लोकांसारखा, धंद्यात पुढे का जात नाही? प्लिज मनावर घ्या, मित्रालाही सांगा!

मराठी माणूस गुजराती लोकांसारखा, धंद्यात पुढे का जात नाही? प्लिज मनावर घ्या, मित्रालाही सांगा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

=== 

मराठी माणूस म्हणजे चाकोरीबाहेर न विचार करणारा अशीच आपली ओळख आहे. व्यवसाय करावा तो गुजराती, सिंधी ,मारवाडी माणसाने आणि मराठी माणसाने गप नोकरी करून सुरक्षित आयुष्य जगावे अशीच आपली वर्षानुवर्षांची धारणा आहे.

मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही, त्याच्याकडे ती धंद्याची हातोटीच नसते.मराठी घरांत सुरुवातीपासूनच मुलांना नोकरी करून चरितार्थ चालवण्याचीच शिदोरी दिली जाते.

भरपूर शिक्षण घेऊन चांगल्या पगाराची नोकरी मिळवून प्रमोशन मिळवून मोठ्या पोस्टवर रिटायर होऊन शांतपणे निवृत्तीनंतरचे आयुष्य मुलानातवंडांत घालवावे, हीच शिकवण मराठी घराघरात दिली जाते.

 

Family
RVCJ Media

ह्याउलट गुजराती घरात काय चित्र असते? त्यांच्या घरातील लहान मुलांच्या मनावर म्हणजेच पुढच्या पिढीच्या मनावर लहानपणापासूनच हे ठसवले जाते की पिढीजात व्यवसाय त्यांनाच पुढे सांभाळायचा आहे त्यामुळे त्यांना सुरुवातीपासूनच त्या प्रकारचे घरातूनच ट्रेनिंग दिले जाते.

गुजराती माणसाच्या रक्तातच व्यवसाय असतो असे काही उगाच म्हटले जात नाही!

हल्ली तरी मराठी समाजातील नवीन पिढी व्यवसायात पडू लागली आहे.

पण अजूनही मराठी घरात नोकरीलाच प्राधान्य दिले जाते आणि मराठी मुलाने व्यवसाय करतो म्हटले तर त्याला “उगाच का रिस्क घेतोस? त्यापेक्षा छानपैकी नोकरी करून सुरक्षित आयुष्य जग” असाच सल्ला देणारे अनेक भेटतात.

मराठी माणसाचा धंदा हा बुडण्यासाठीच असतो असाच समज आपल्या मनात कळत नकळत रुजवला जातो.

गुजराती समाजात कुणी खरंच गांभीर्याने व्यवसाय करतो म्हटलं तर त्यांच्या समाजातील लोक त्याला “करू नकोस!उगाच बुडलास तर?” असा सल्ला न देता “कर रे बिनधास्त! जमेल तुला..” असाच सल्ला देतात वर लागली तर आर्थिक मदत देखील करतात.

 

gujrathi family
YourStory

मराठी माणूस व्यवसाय का करू शकत नाही पण गुजराती माणूस व्यवसायात का यश मिळवतो ह्याची कारणे आपण मराठी माणसांनी समजून घेतली पाहिजेत.

त्या आधी एक गोष्ट वाचा.. ही गोष्ट आहे ऑलिदींना विश्राम नावाच्या व्यक्तीची. ते मूळचे कच्छचे होते आणि वयाच्या बाराव्या वर्षी १८६३ साली आफ्रिकेच्या पूर्व समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या झांझिबार (आताचे टांझानिया) येथे उतरले.

त्यावेळी त्यांच्याकडे खिशात एक दमडी सुद्धा नव्हती. त्यानंतर १४ वर्षांनी त्यांनी त्या ठिकाणी दुकान सुरु केले आणि थोड्याच वेळात त्यांना यशाची पुढील पायरी चढण्याची संधी मिळाली.

त्यांनी १९०० च्या सुरुवातीला केनिया ते युगांडा दरम्यान जे जे रेल्वे स्टेशन्स आहेत त्या त्या स्टेशन्सवर त्यांनी दुकानं सुरु केली. त्यांनी लेक व्हिक्टोरिया येथेही दुकान सुरु केले. ह्या व्यवसायात त्यांना प्रचंड यश मिळाले.

 

vishram inmarathi
Daily Monitor

नंतर त्यांना विठ्ठलदास हरिदासनावाचे आणखी एक गुजराती गृहस्थ येऊन मिळाले. ते १८९३ साली आफ्रिकेत आले आणि त्यांनी त्यांच्या गुरूंपेक्षाही जास्त मोठा व्यवसाय उभा केला.

गुजराती लोकांना व्यवसायासाठी कुठेही आणि कसल्याही वातावरणात जावे लागले तरी त्यासाठी ते त्यांचा सगळा कम्फर्ट सोडून जातात. व्यवसायासाठी जगाच्या पाठीवर कुठेही जायची त्यांची तयारी असते.

आज न्यूझीलंडपासून फिजी, ब्रिटन, म्यानमार ,युगांडा ते कॅनडापर्यंत सगळीकडे गुजराती लोकांनी आपले बस्तान बसवले आहे.आणि त्यांचे व्यवसाय यशस्वीपणे सुरु आहेत.

भारतात तर सगळीकडे साध्या कोपऱ्यावरच्या दुकानापासून , टेक स्टार्टअप्स , हॉटेल्स आणि मोठमोठ्या व्यवसायापर्यंत सगळीकडे गुजराती लोक व्यवसाय करीत आहेत.

 

small business
Arab News

ज्यू, चायनीज. इंग्लिश, स्कॉट आणि लेबनीझ लोकांप्रमाणे त्यांचे आंतरराष्ट्रीय कमर्शियल नेटवर्क त्यांनी उभे केले आहे. आणि त्यांच्या लोकसंख्येच्या हिशोबाने बघायचे झाल्यास ते जगातील सर्वात यशस्वी लोकांपैकी एक आहेत.

काही देशांची अर्थव्यवस्था भारतीय व्यावसायीकांवर अवलंबून आहे असे म्हणायलाही हरकत नाही.

आता अमेरिकेचेच बघा, गुजराथी लोकांनी अमेरिकेत जाण्यास सुरुवात केली ती १९६० च्या दशकात! आणि आता बघितले तर असे दिसते की अमेरिकेतील एकतृतीयांश हॉटेल्स आणि मॉटेल्स हे गुजराथी लोकांच्या मालकीचे आहेत.

सर्वात महत्वाची बाब म्हणजे अमेरिकेत स्थायिक असलेल्या पटेल समाजाच्या लोकांनी सर्वात जास्त प्रगती केलेली दिसून येते. हे पटेल लोक बडोदा आणि सुरत भागातील आहेत.

गुजराती समाजाच्या लोकांनी मेडिसिन आणि इंजिनियरिंग क्षेत्रात सुद्धा खूप प्रगती केली आहे. पण त्यांच्या रक्तातच व्यवसाय करणे आहे आणि म्हणूनच अमेरिका, ब्रिटन येथे अर्ध्या फार्मसीज गुजराती लोकांच्या मालकीच्या आहेत.

म्हणजेच थोडक्यात व्यवसाय करणे हा गुजराथ्यांच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. त्यांच्या समाजात कुठेतरी मिड लेव्हल मॅनेजमेंटला नोकरी करण्यापेक्षा एखादं स्वतःचं दुकान थाटणे जास्त चांगले समजले जाते.

आज भारतातले सर्वात श्रीमंत आणि यशस्वी व्यावसायिक मुकेश अंबानी, दिलीप संघवी आणि अझीम प्रेमजी हे गुजराथी लोक आहेत.

 

Ambani, sanghavi, premji
The Hans India

गुजराथी लोकांना व्यवसायाचे बाळकडू घरातूनच मिळते आणि त्यासाठी आर्थिक मदत सुद्धा घरूनच मिळते. जर घरची परिस्थिती तेवढी चांगली नसेल तर त्यांच्या समाजातील मोठी माणसे व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांना आर्थिक मदतीचा हात देतात.

जर चुकून व्यवसायात नुकसान झाले तर नातेवाईक आणि कुटुंबीय ते नुकसान आपापसात सांभाळून घेतात.पूर्वीच्या काळी इंग्रजांच्या काळात त्यांनी इतर भारतीयांना जेव्हा कामासाठी परदेशात नेले.

तेव्हा त्यांना हव्या असलेल्या वस्तू मिळण्यासाठी दूरदृष्टी ठेवून गुजराथी लोकांनी तिथे दुकाने उघडली आणि व्यवसायात पाय रोवले. ह्याच कारणांमुळे आज गुजराथी समाज यशस्वी व्यावसायिकांचा समाज म्हणून ओळखला जातो.

आपण मराठी माणसे इथेच चुकतो. व्यवसाय करू इच्छिणाऱ्या एखाद्या व्यक्तीला घरातून, कुटुंब, नातेवाईक आणि समाजातून जो पाठिंबा आणि मदत मिळते ती मराठी व्यावसायिकाला मिळतच नाही.

 

support inmarathi
business.com

ते लोक एकमेकांना हात देऊन आपल्याबरोबर वर ओढून घेतात आणि आपण मात्र अजूनही एकमेकांचे पाय खेचत आणि एखादा माणूस कसा तोंडावर आपटतो ही मजा बघत बसलो आहोत.

Quora वर ह्याच विषयावर चर्चा झाली तेव्हा अनेकांनी हे ही सांगितले की गुजराथी माणसे आधीपासूनच मार्केट आणि शेअर्समध्ये पैसे गुंतवून रिस्क घेत व्यवसाय करीत आले आहेत.

पण मराठी माणसाला मात्र शेअर्स म्हणजे जुगार नव्हे हे समजायलाच कित्येक पिढ्या जाव्या लागल्या. तसेच तुम्ही गुजरातमध्ये व्यवसाय करत असाल तर तुमची कोणीही पैश्यासाठी अडवणूक करत नाही.

सर्व्हिस दिल्यावर पैश्यासाठी थांबावे लागत नाही. लोक तुमची देणी लगेच फेडून टाकतात. त्यासाठी तुम्हाला ताटकळत ठेवत नाहीत. तसेच ग्राहकाला वागवण्याची पद्धत सुद्धा महत्वाची ठरते.

 

customer service by Gujrathi Inmarathi

ग्राहक हा देव आहे असे समजून हे लोक व्यवहार करतात. म्हणूनच माऊथ पब्लिसिटीवर सुद्धा त्यांचे यश अवलंबून असल्याने ते आपली कीर्ती चांगलीच राहील ह्याची काळजी घेतात. वाटाघाटी करणे म्हणजे ह्या लोकांची हातोटी आहे.

असे सगळे गुण जात्याच त्यांच्या अंगी असल्याने ते कोणताही व्यवसाय अगदी यशस्वीपणे हाताळून त्यात यश मिळवू शकतात. आपल्या मराठी माणसांनी वरील सर्व बाबींकडे लक्ष दिले.

आपल्या मराठी माणसाला व्यवसाय करण्यात मदत केली, त्याचे पाय खेचले नाहीत तर आपण सुद्धा व्यवसाय यशस्वीपणे नक्कीच करू शकतो.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “मराठी माणूस गुजराती लोकांसारखा, धंद्यात पुढे का जात नाही? प्लिज मनावर घ्या, मित्रालाही सांगा!

  • July 15, 2019 at 5:25 pm
    Permalink

    गुजराती, सिंधी ,या लोकांचा व्यवसाय हा धर्म च आहे हे कधी ही तुम्हाला भारतीय सैन्यात दिसणार नाही देश हितासाठी कधी हुभे राहाणार नाही.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?