' विशीत पैसे वाचवण्यासाठी या ९ गोष्टी पाळा आणि चाळीशीतलं आयुष्य सुकर करा!

विशीत पैसे वाचवण्यासाठी या ९ गोष्टी पाळा आणि चाळीशीतलं आयुष्य सुकर करा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपण नोकरी करत असताना बचत करतो ती एवढ्यासाठी की म्हातारपणी आपल्यापाशी पुरेसा पैसे असावा,आपण कुठेतरी छान ठिकाणी रहायला जावे,आणि कधी आजारी पडलो तर पैशांसाठी कोणासमोर हात पसरावे लागू नयेत म्हणून.

शिवाय मुलां मुलींचे शिक्षण लग्न, म्हाताऱ्या आईवडील यांची जबादारी. या सर्वांसाठी पैसा लागतोच आणि घरात कितीही छान भरगच्च मनीप्लांट लावले तरी ते काही पैसे देत नाही.

म्हणजे आपल्याला स्वतःच या तरतुदी करून ठेवाव्या लागतात.

थोडक्यात काय आपण अगदी विशीत असतानाच पैसे वाचवायला शिकायला हवे.

आता जास्त टेन्शन नाही घ्यायचं. आहेत बरेच बचतीचे मार्ग. तुमच्याकडून खूप मोठी अपेक्षा नाही की तुम्ही लाखांमध्ये गुंतवणूक करावी म्हणून.

मुळात मार्केट मध्ये बचतीचे काय काय मार्ग उपलब्ध आहेत, त्यातून तुम्हाला कोणता मार्ग निवडायचा आहे हे तुम्हाला ठरवावे लागणार.

यात तुम्ही मोठ्यांचा सल्ला देखील घेऊ शकता.

 

share market inmarathi 2
DNA india

 

बँक डिपॉझिट, पोस्ट डिपॉझिट किंवा पोस्टच्या बऱ्याचशा चांगल्या व्याजदराच्या स्कीम्स, शेअर्स, म्युच्युअल फंडस,असे विविध मार्ग उपलब्ध आहेत.

मुळात आपल्याकडे विशीत नोकरी करणाऱ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे कारण मध्यमवर्गीय किंवा उच्चवर्गीय मुलांच्यात पदवीनंतर पुढील उच्च शिक्षणास प्राधान्य दिले जाते.

काही ठिकाणी पदव्युत्तर शिक्षणानंतर अप्रेंटीशीप करणे अनिवार्य असते अशावेळेस बहुतेक करून चोवीस ते पंचविसाव्या वर्षी नोकरी सुरू होते.

काही व्यावसायिक मुलाला पदवी घेत असतानाच किंवा पदवी मिळाल्या मिळाल्या आपल्या व्यवसायात घेतात. काही गरीब घरातील मुले लहानपणीच मोलमजुरीची कामे किंवा घरच्याच शेतीत राबून थोडेफार अर्थार्जन करत असतात.

 

indian guy at job inmarathi

 

एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जितक्या लवकर तुम्ही पैसे वाचवून गुंतवणूक सुरू कराल त्याचा फायदा सुरवातीला नाही दिसला तरी थोड्या काळाने दिसू शकतो कारण “थेंबे थेंबे तळे साचे”. याप्रमाणे बचत हळूहळू वाढू लागते.

बचत करण्याचे दोन मार्ग आहेत

एक म्हणजे तुम्ही जमेल तेवढे पैसे वाचवून बँकेत किंवा अन्य ठिकाणी बचत करा.तुम्ही स्वतः काम करून मिळवलेले असतील किंवा शिष्यवृत्ती किंवा अन्य मार्गाने पैसे मिळाले असतील तर त्यातून थोडे बाजूला काढून बचत करा.

दुसरा मार्ग म्हणजे तुम्ही अर्थार्जन करत नसाल तर तुम्हाला मिळणाऱ्या पॉकेट मनीतून थोडे पैसे वाचवा.

आता बघुया बचतीचे वेगवेगळे मार्ग.

 

(१) आर्थिक ध्येय निश्चित करा.

 

financial target inmarathi

 

जेव्हा तुम्ही काही न काही कमावत असता तेव्हा त्यातून येणाऱ्या पैशांतून तुम्ही काय करणार आहात हे आधी ठरवून घ्या.

जसे की हे पैसे तुम्ही कुटुंबाकरिता वापरणार आहात की स्वतःच्या कोणत्या कामासाठी?

कुटुंबाच्या नावाने वापरणार असाल तर उगाच थोडेथोडे त्यांना देण्याऐवजी तुम्ही ते बँकेत किंवा पोस्टात एक ठराविक रकमेत तसेच ठराविक कालावधीसाठी जमा करा विशेषतः रिकरिंगच्या स्वरूपात.

यामुळे समजा वर्षभराचा कालावधी धरला असेल आणि महिना एक हजार रुपयांची बचत करत असाल तर तुम्ही बाराहजार अधिक व्याज असे मिळून एक मोठी रक्कम देऊ शकता.

अगदी हेच स्वतःच्या बाबतीत देखील करू शकता.

साधारणपणे तुमच्या कमाईचा वीस टक्के भाग तुम्ही बाजूला काढलाच पाहिजे. सुरवातीला अवघड वाटेल जेव्हा कमाई कमी असते पण नंतर हीच आर्थिक शिस्त कामी येते.

कोणत्या गोष्टीसाठी पैसे साठवायचे ते आधी निश्चित करा आणि त्या प्रमाणे बचतीसाठी सुरवात करा.

 

savings inmarathi

 

(२) एक इमर्जन्सी अकौंट तुम्ही उघडू शकता.

असे खाते उघडून त्यात एक ठराविक रक्कम जमा करू शकता किंवा कधी जास्त पैसे जमा करू शकता. यामुळे कोणतीही अडचण उभी राहिल्यास यातून तुम्ही पैसे काढून गरज भागवू शकता.

 

(३) बाहेर रहात असाल तर 

तुम्ही नोकरीच्या ठिकाणी खोली भाड्याने घेऊन रहात असाल तर तुमच्यासाठी अजून एक किंवा दोन पार्टनर शोधा.

 

roommates inmarathi

 

असे केले म्हणजे खोली भाडे विभागले जाऊन खर्चात बचत होईल. तो खर्च तुम्ही बाजूला काढू शकाल.

 

(४) नोकरीमध्ये सातत्य 

तुमच्या करिअर मध्ये कोणत्याही कारणाने ब्रेक घेऊ नका.कारण या मुळे आर्थिक नियोजन फिसकटेल व वेगळ्याच समस्येला तोंड द्यावे लागेल.

 

tired-desk
Undercover Recruiter

 

(५) कॅशलेस पेमेंट करा 

कॅशलेस स्कीम्स कोणत्या आहेत आणि त्यातून काही फायदा होतोय का ते बघून त्याचा वापर करा.अशा योजनेत बरेच डिस्काउंटस मिळतात.

 

paytm inmarathi
startup.com

 

कोणतेही पेमेंट करताना ते गुगल पे, फोन पे, पेटीएम अशा प्रकारच्या ऍप्स मधून करा म्हणजे त्यातून कॅश बॅक योजनेच्या माध्यमातून बरेच पैसे मिळतात. ही पण एक प्रकारे तुमची बचतच असते.

 

cashless platforms inmarathi

Credit-cards-inmarathi04
reuters.com

 

शिवाय आहे कार्ड तर करू खर्च असा विचार मनात येऊ लागतो आणि मग तुमची बचत राहिली बाजूला डोक्यावर कर्ज वाढते. तेव्हा क्रेडिट कार्ड न वापरणे योग्य.

 

(७) वायफळ खरेदी 

गरज नसताना उगाच कोणतीही खरेदी करू नका. त्या ऐवजी तेवढे पैसे बाजूला काढून बचत खात्यात भरून टाका. खर्च कमी करणे म्हणजे सुद्धा बचत करणेच होय.

 

indian girls shopping inmarathi
zee news

 

(८) वृत्तपत्र किंवा मासिक घेणे बंद करा. टीव्हीची गरज नसल्यास घेऊ नका.

आजकाल मोबाईल घेणे हे गरजेचे झाले आहे. या मोबाईलमध्ये बरीचशी वृत्तपत्रे तुम्ही ऑनलाइन वाचू शकता. चित्रपट बघू शकता. टीव्हीचे कार्यक्रम बघू शकता.

इतरही बरेच मनोरंजनाचे कार्यक्रम किंवा क्रिकेट सामने बघू शकता. त्यामुळेच या कार्यक्रमावर होणारा खर्च तुम्ही मोठ्या प्रमाणात कमी करू शकता. तीच तुमची मोठी बचत असेल.

 

online streaming inmarathi

 

(९) पार्ट टीईमध्ये जॉब करणे 

नोकरी व्यतिरिक्त काही पार्ट टाईम जॉब्ज असतात ते करू शकता. तरुणपणी जास्तीचे काम करण्याची ताकद असते त्यामुळे हे तुम्ही करू शकता.शिकवण्या घेणे जमत असेल तर ते काम करून अधिक पैसा मिळवू शकता.आणि हा पैसा गुंतवू शकता.

आम्ही हे नऊ मार्ग तुम्हाला दाखवले आहेत. त्यांचा मार्गदर्शक म्हणून उपयोग करून तुम्ही पैसे वाचवून त्यातून गुंतवणूक करू शकता.

हे तुम्ही विशीत असताना कसे पैसे बचत करू शकता याचे मार्गदर्शन आहे कारण पुढे जाऊन चांगली नोकरी चांगला पगार तुम्ही मिळवू शकता.

 

part time
FlexJobs

 

घरासाठी कर्ज घेऊ शकता. देशांतर्गत किंवा देशाबाहेर पर्यटन करू शकता. पण या साठीच पहिल्या नोकरीच्या पहिल्यावहिल्या पगारापासूनच बचतीस सुरवात करा म्हणजे आपोआपच आर्थिक शिस्त लागेल.

नोकरी नसेल तरीही तुमच्या पॉकेटमनीतून काही रक्कम बाजूस काढू शकता. शेवटी खर्च कपात म्हणजेच एक प्रकारची मिळकत असते हे विसरू नका.

तर मंडळी, विशीत असाल तर चला बचतीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकूया.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?