' चक्क अमेझॉनचा मालक म्हणतोय : "कंपनी ५ वर्षात बंद पडणार आहे"!

चक्क अमेझॉनचा मालक म्हणतोय : “कंपनी ५ वर्षात बंद पडणार आहे”!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

जागतिक मंदी, जागतिक मंदी असं सगळीकडे आपण ऐकतच असतो. मोठ्या मोठ्या सॉफ्टवेअर कंपन्या, बँका, छोट्या पतसंस्था बंद होणार किंवा तोट्यात आहेत अशा रोज नव्या बातम्या येत असतात.

अशीच एक आणखी धक्कादायक बातमी आहे अमेझॉनबद्दल.

आज आपण अमेझॉनचा सर्रास वापर करतो. रोज नवे नवे सेल अमेझॉन वर असतात. ऑनलाइन खरेदी हा सगळ्यांच्या जीवनातील एक अविभाज्य भाग झाला आहे.

पण अ‍ॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस गेल्या वर्षी म्हणाले होते की , ‘‘पाच वर्षांत अ‍ॅमेझॉन बंद होण्याची शक्यता आहे.’’ ते असं का म्हणलेत ते पाहू.

बेझोस यांच्या म्हणण्यानुसार मोठ्या कंपन्यांचे आयुष्य हे नेहमी जास्तीत जास्त ३० वर्षं असतं. अमेझॉनला २५ पेक्षा जास्त वर्षं पूर्ण झाली असून आमच्या हातात अजून काहीच वर्षं शिल्लक आहेत.

 

Jeff Bezos

खरं तर मोठ्या कंपन्यांतील सीईओ हा धाडसी, असामान्य असावा, परंतु या त्यांच्या बोलण्यावरून अपयशाची भीती डोकावतेय की काय असं वाटतं, पण तसं नसून जास्त काम करायला चालना मिळत असावी.

अपयशाच्या भीतीपोटी माणूस जास्त काम करत असावं असा विचार त्यांचा असावा.

जेफ बेझोसने ५ जुलै १९९४ रोजी अमेझॉनची स्थापना केली. या २५ वर्षांत ही कंपनीने फारच चांगली प्रगती केली आहे. मागच्या वर्षी ‘जगातील सर्वांत मौल्यवान कंपनी’ असा या कंपनीचा गौरव झाला आणि जेफ बेझोस आधुनिक युगाच्या इतिहासातील श्रीमंत व्यक्ती बनली.

 

हे ही वाचा

===

 

तरीही गेल्या तीन वर्षांत तीन वेळा बेझोसने तीन वेळा फर्मच्या बंद होण्याबद्दल ते बोलले, पण अरेबियन्सना खात्री आहे की, अमेझॉन संपणार नाही. एका मोठ्या कंपनीच्या सीईओसाठी अशा प्रकारचे विधान विलक्षण आहे.

वरिष्ठ अधिकारी सामान्यपणे त्यांच्या फर्मच्या संभाव्यतेबद्दल सकारात्मक नसतात.

त्यांचं म्हणणं असं होतं की, ‘‘आम्ही आमच्या ग्राहकांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी स्वत:वर लक्ष केंद्रित करणे सुरू केले तर तेच कंपनीच्या शेवटाचे कारण होईल. आम्ही शक्यतो तो दिवस येऊ नये म्हणून विलंब करतोय.’’

बेझोसच्या मते, अमेझॉनला अभूतपूर्व यश मिळाले आहे. जेव्हा कंपनीचा मुख्य किरकोळ व्यवसाय वाढत आहे आणि कंपनी क्लाऊड कम्प्युटींग मार्केट जिंकत आहे, अलेक्सा कंपनीला मदतीला घेतले आहे.

 

AMAZON

 

परंतु काही कर्मचारी अमेझॉनच्या विस्ताराबद्दल चिंता व्यक्त करत होते, कारण गेल्या आठ वर्षांत तिथल्या कामगारांची संख्या २० पटीने वाढून ६००,०००  हून अधिक झालेली आहे आणि २०१३  पासून त्याच्या शेअरची किंमत चौपट वाढली आहे.

जसजसा विस्तार वाढतो तसतसा बाकीचा व्यापही वाढतच जातो आणि ते हँडल करणे थोडं अवघड जातं.

कंपनीने न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टन मध्ये २५,०००  जॉब देण्याची योजना केली होती. बेझोसने कंपनीच्या कर्मचार्‍यांच्या पगारांच्या समस्यांबद्दल निराकरण केले.

हे पहिल्यांदाच झाले नाही तर मार्चच्या आधीच्या सर्वसमावेशक बैठकीत, बेझोसने सांगितले होते की, अमेझॉनसारख्या मोठ्या कंपन्या बाजारपेठेतील नियमांचे पालन करते. त्यामुळे त्यांची बाजारपेठेतील शक्ती आणि प्रभाव वाढतो.

एक तथ्य आहे की, आमची कंपनी मोठी आहे. बेझोसने एकदा बोलताना सांगितले, ‘‘कोणत्याही प्रकारची मोठी संस्था, ती कंपन्या किंवा सरकार असो, तिची योग्य तपासणी करणे आवश्यक आहे.’’

 

Amazon-Market-Share-2018

 

अनेक अमेझॉन कंपनीतील कर्मचारी सीएनबीसी बोलण्यास तयार आहेत, पण एका अटीवर त्यांचं नाव कुठेही घेतलं जाणार नाही याची खात्री असेल तरच. कारण त्यांना तसं बोलण्याची परवानगी नाही. सरकारी नियम आणि कर्मचार्‍यांमधील विश्‍वासघात ही कंपनीच्या दृष्टीने मोठी चिंता असते.

इमार्केटच्या मते, अमेझॉनचा २०१७ मधील सेल ४३% पर्यंत आहे. अमेझॉनचं उद्दिष्ट आहे की अमेरिकेतील ४८% ऑनलाइन सेल हा त्यांच्या कपंनीकडून व्हायला पाहिजे.

सिडनी रिसर्च ग्रुपने नुकत्याच दिलेल्या एका अहवालात म्हटले आहे की, एडब्ल्यूएस सेवा क्लाउड कॉम्प्युटिंग इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये अद्याप आघाडीवर आहे.

अमेझॉनचे प्रवक्ते वॉल स्ट्रीट जनरल मुलाखतीत म्हणाले, ‘कंपनी वेगवेगळ्या व्यवसायात गुंतली आहे आणि आमचे खाते जागतिक किरकोळ बाजारपेठेपेक्षा ‘एक टक्के कमी’ असे खाते आहे.

 

Amazon wall street

 

मार्चच्या कर्मचारी बैठकीत बेझोसने सांगितली की, वाढीव तपासणीस प्रतिसाद देण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे, ‘असं आचरण करा की, जेव्हा आपण आपली तपासणी करू तेव्हा आपल्या चेहर्‍यावरचा रंग उडणार नाही.’

तथापि, अमेझॉनची कथा ही खूपच वेगळी आणि महत्त्वाची आहे. अमेझॉन इतर कंपन्यांबरोबर मर्ज होऊ शकणार नाही. उदाहरणार्थ त्यांनी म्हटले आहे, ‘ग्राहकांच्या जीवनात सुधारणा कशी करावी हे सांगण्यासाठी अमेझॉनकडे चांगली कथा आहे.

त्यांच्या सहकार्‍यांपेक्षा त्यांच्याकडे एक वेगळा व्यवसाय देखील आहे.’’

बेझोस म्हणाले, ‘जसे फेसबुक आणि गुगल सारखे नाही तसेच अ‍ॅपल आणि अमेझॉन सारखे नाही. मला कोणत्याही कंपनीशी तुलना करायची नाही, मला फक्त अमेझॉन बद्दल बोलायचे आहे.’’ परंतु तेथील कर्मचारी मात्र निराश आहेत.

अमेझॉन कंपनीच्या सीईओने राष्ट्राध्यक्ष ट्रम्पची थट्टा केली, कारण त्यांनी बेझोसवर वैयक्तिक हल्ला केला होता.

काही दिवसांपूर्वी ट्रम्पने अ‍ॅक्सिओसला सांगितले होते की, त्यांचे प्रशासन अमेझॉनच्या नियमांचे उल्लघंनाकडे लक्ष वेधत आहेत. अमेझॉन कंपनी सरकारला थोड्याच प्रमाणात कर देते, त्यामुळे युएसचं मोठं नुकसान होत आहे.

म्हणून आम्ही अशा किरकोळ व्यापार्‍यांना व्यवसायातून बाहेर टाकत आहोत असं ट्रम्पचं म्हणणं होतं.

दरम्यान युरोपमधील नियमकांनी अमेझॉनच्या व्यापारी डेटाचा वापर करण्याबाबत चौकशी सुरू केली आहे आणि जपानी अधिकारी विश्‍वासघात करणार्‍या आरोपांवर कंपनीची तपासणी करीत आहेत.

हे ही वाचा

===

 

Trump vs Amazon

 

बेझोसने एका मुलाखतीत मजेत सांगितले की, ज्या कंपन्या जुन्या आहेत त्या थोड्या प्रमाणात अल्कोहोल विकतात. आणि ते म्हणाले, ‘‘बहुतेक जुन्या कंपन्या ब्रुअरी आहेत.’ तो हसून म्हणाला हे खूपच मनोरंजक आहे.

मला समजाबद्दल काय म्हणू हेच समजत नाही.’

कारणं काही असोत एवढी मोठी कंपनी बंद होणे योग्य नाही. त्यावर बर्‍याचशा कर्मचार्‍यांचं भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे पुढे बघत राहण्याशिवाय आपल्या हातात काही नाही.

परंतु बेझोसने ही एक हूल उठवली असावी जेणेकरून कंपनीतील कर्मचारी किंवा एकूणच सगळी कंपनी जोमाने कामाला लागेल. एकदा यशस्वी झालो म्हटलं की, कामाचा वेग जरा कमी येतो.

तसं होऊ नये म्हणून कदाचित त्यांनी हा मार्ग अवलंबला असेल. कारण अपयश मिळतंय म्हटलं की, माणूस परत जोमाने कामाला लागतो हे खरंच आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?