' जुने टायर्स रिसायकल करून अनेकांना रोजगार देणारा धडाडीचा तरुण; वाचा त्याची स्टोरी… – InMarathi

जुने टायर्स रिसायकल करून अनेकांना रोजगार देणारा धडाडीचा तरुण; वाचा त्याची स्टोरी…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

एक टन जुन्या टायर्स मधून अनुभव मिळवतो ४५० लिटर इंधन, १५० लिटर पेट्रोलियम गॅस, ७५ किलो स्टील, २५० किलो कार्बन..

अबब.. इतकं?

बाकीचे लोक काय करतात? बाकीचे लोक जुने टायर भंगारात कवडीमोल भावाने विकून टाकतात किंवा रिसायकल करायला देतात. आता बघूया भंगारवाले काय करतात ते?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

भंगारवाले असे अनेक टायर्स खरेदी करून ठेवतात आणि अजून पुढे जिथे जास्त भाव मिळेल तिथे विकून टाकतात. बहुतेक वेळेस हे टायर रिमोल्डिंगसाठी जातात.

ज्यांना नवीन टायर घेणे जमत नाही ते लोक असे रिमोल्ड केलेले टायर विकत घेऊन वापरतात.

 

tyre inmarathi

 

अर्थातच या टायरचे आयुष्य कमीच असते. रिसायकल करण्यास पाठवलेल्या टायरमधून सुद्धा काही रिमोल्ड करतात तर काही टायरच्या रबराचा उपयोग चप्पल बनवण्यासाठी केला जातो. आणि बऱ्याच वेळेस टायर जाळले जातात.

जाळलेल्या टायरमुळे त्यातून निघालेल्या विषारी वायू व कार्बन डाय ऑक्साइड यांच्यामुळे हवेतील प्रदूषण फार वाढते.

आपल्याकडे आनंदवनात डॉक्टर विकास आमटे यांनी टायरचा उपयोग बंधाऱ्यासारखा केला. एका ओढ्यावर टायर एकावर एक रचून त्या मध्ये दगड व वाळू भरून एक चांगला बंधारा तयार केला.

त्यामुळे वाहून जाणारे पाणी अडवून ते शेतीकडे वळवले.

त्यांनी अजून एक प्रयोग केला. टायरचे बारीक तुकडे करून ते रस्ते बांधण्यासाठी वापरून न उखडणारे टिकाऊ रस्ते तर बनवलेच शिवाय खर्चात बचत केली.

 

used-tyres-inmarathi

 

मोठा फायदा हा की कोणत्याही प्रकारचे प्रदूषण या प्रयोगातून झाले नाही. टायर पासून चपला निर्माण केल्या. पण असे प्रयोग इतरांनी फारसे नाही केले.

टायर रिमोल्डिंगला देखील मर्यादा आहेतच. एक तर त्यांचे आयुष्य कमी असते आणि वारंवार रिमोल्डिंग होऊ शकत नाही. अशा वेळेस लोक टायर जाळून टाकतात.

वाधवा या सोळा वर्षांच्या तरुणाने, असेच एकदा एका ठिकाणी टायर जाळत असताना बघितले. रबर जळत असताना प्रचंड जळका वास सर्वत्र पसरलेला होता आणि जवळ उभे असलेल्या प्रत्येकाला गुदमरल्यासारखे वाटत होते.

समजा तुम्ही काय किंवा मी काय तेथे असतो तर आपण काय केले असते? आपण फारतर दोन शिव्या हासडून नाकाला रुमाल लावून तिथून दूर झालो असतो.

अनुभव वाधवा मात्र विचारमग्न झाला. त्याच्या डोक्यात विचार घोळू लागले की आपल्याला काय करता येईल ज्याने हवेचे प्रदूषण थांबवता येईल.

 

abubhav inmarathi

हे ही वाचा – गाड्यांच्या टायर्सचा रंग काळा का असतो? वाचा यामागची थक्क करणारी कारणं

अनुभवने घर गाठले आणि इंटरनेटवरून माहिती गोळा केली. नुसती माहिती गोळा करून तो थांबला नाही तर त्याने या समस्येचा अभ्यास करून चक्क एक कंपनी स्थापन केली.

विश्वास नाही ना बसत? माझाही बसला नव्हता राव. पण अनुभव हे प्रकरण काही अफलातूनच आहे.

वयाच्या केवळ १२ व्या वर्षी अनुभवने सॉफ्टवेअर प्रॉडक्ट डेव्हलमेंट कंपनी सुरू केली आणि नाव दिले TechAPTO . त्याच्या डोक्यात सतत नवीन कल्पना घोळत असतात. गुरगावच्या “पाथवेज वर्ल्ड स्कुल” मध्ये शिकणारा अभिनव अतिशय हुशार आहे.

वयाच्या केवळ १२ व्या वर्षी सॉफ्टवेअर प्रॉडक्ट डेव्हलपमेंट कंपनी सुरू करणारा सर्वात लहान उद्योगपती तोच असावा.

शाळेतुन परत येताना डझनावारी फाटके टायर रस्त्यावर पडलेले आणि दोन शेकोटीत जळत असंलेले बघूनच त्याने “Tirelessly” 

कंपनी सुरू करायचा निर्णय घेतला. या साठीचा अभ्यास त्याने इंटरनेट वरून केला. “टायरलेसली” कंपनीचे ध्येय आहे प्रदूषण रोखणे, तसेच त्यातून मिळणाऱ्या बाय प्रॉडक्ट मधून वेगवेगळ्या गोष्टी वेगळ्या करून त्यातून रोजगार निर्मितीस चालना देणे.

 

vadhva inmarathi

 

तो एक टन म्हणजे एक हजार किलो टायरमधून द्रव इंधन, पेट्रोलियम गॅस, स्टील, असे उत्पादन मिळवतो. यातून प्रदूषण तर होत नाहीच पण त्याने रोजगार निर्मिती केलीय.

या बायप्रॉडक्टची विक्री किंवा जाहिरात या बाबी तो स्वतः बघतो. या साठी लागणारे अर्थसहाय्य त्याने बाहेरून कर्ज स्वरूपात घेण्याऐवजी स्वतःच्याच TechAPTO मधून उभे केले आहे.

अगदी पहिल्या दिवसापासून त्याची “टायरलेसली” ही कंपनी चांगली फायद्यात चालू आहे.

लोकांना टायर जाळण्यापासून परावृत्त करतो. यामुळे होणाऱ्या प्रदूषणाची जाणीव करून देतो शिवाय यातून मिळणाऱ्या बायप्रोडक्ट विषयी आणि त्यांच्या विक्री व त्यातून मिळणाऱ्या पैशांविषयी माहिती देतो.

अनुभव वाधवा खूप चांगले कार्य करत आहे. त्याचे कार्य बघून अजूनही काही तरुण या व्यवसायात उतरले तर ती समाजासाठी मोठी देणगी असेल.

 

anubhav vadhva inmarathi

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हे ही वाचा – ऐनवेळी टायर पंक्चर झाल्यामुळे होणारा मनस्ताप टाळायचा आहे का? मग हे वाचाच!

दर वर्षी लाखो टन टायर्स रिसायकलिंग साठी तयार असतात. यातून प्रेरणा घेऊन हा उद्योग वाढवता येऊ शकतो.

आणि मुख्य म्हणजे स्वतःच्या दोन्ही कंपन्या देखील फायद्यात चालवतो. आज अनुभव २१ वर्षांचा आहे. मात्र केवळ १६ व्या वर्षी त्याने इतरांना रोजगार प्राप्त करून दिला. एवढे लक्षात घेतले तर तो किती वेगळा मुलगा आहे हे लक्षात येते.

अनुभव, तुझ्या अनुभवातून काही चांगलं इतरांनी शिकावं आणि आपल्या पायावर उभे राहून मेक इन इंडिया या पंतप्रधानांनी बघितलेल्या स्वप्नाला हातभार लावावा व स्वतःची आणि इतरांची प्रगती साधावी हीच इच्छा. तुला तुझ्या वाटचालीसाठी शुभेच्छा.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?