' तुमचा 'रिझ्युम' अधिक 'आकर्षक' आणि उठावदार बनवण्यासाठी ह्या टिप्स वापरा!

तुमचा ‘रिझ्युम’ अधिक ‘आकर्षक’ आणि उठावदार बनवण्यासाठी ह्या टिप्स वापरा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

नोकरी शोधताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणून रिझ्युमकडे पाहणे गरजेचे आहे.

कारण रिझ्युम हे केवळ मुलाखतकाराला तुमच्याबद्दल संक्षिप्त स्वरुपात माहितीच देत नाही तर तुमच्या व्यक्तिमत्त्वाची छोटीशी झलक देखील दाखवते.

बऱ्याचदा तुम्ही ज्यांच्याकडे तुमचा रिझ्युम पाठवला आहे ती कंपनी किंवा मुलाखतकार तुमच्या रिझ्युमवरून तुमचे मूल्यमापन करतात.

म्हणजेच रिझ्युमवरून ठरवले जाते की तुम्ही कसे व्यक्ती आहात आणि त्या ठराविक कंपनीसाठी आणि पदासाठी पात्र आहात किंवा नाही?

 

interview inmarathi
career start

 

त्यामुळेच सध्याच्या काळात रिझ्युमला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे. जर तुमचा रिझ्युम उत्तम तर तुम्ही उत्तम असं समीकरणचं म्हणा ना!

रिझ्युम हा समोरच्यावर पहिल्याच भेटीत आपली छाप पाडण्याचा सर्वात सोप्पा मार्ग आहे, म्हणूनच नोकरी शोधणाऱ्या प्रत्येकाने आपल रिझ्युम आकर्षक असण्यावर भर दिला पाहिजे.

यासाठीच आम्ही तुम्हाला आज आकर्षक रिझ्युम बनवण्याच्या काही टिप्स सांगणार आहोत.

 

resume inmarathi 2

 

आवश्यक माहिती ठळक शब्दांत असावी

Resume-Tips-marathipizza01

 

मुलाखतकर्ते रिझ्युम वरुन खाली वाचतात असा अनेकांचा समज असतो. त्यामुळं वरील काही माहिती मोठ्या अक्षरांमध्ये दिली जाते.

मुलाखतकर्ते रिझ्युम सध्या खालून वर किंवा मध्येही वाचू शकतात. त्यामुळे अनुभव, कामगिरी अशी माहिती लिहीताना बोल्ड अक्षरात लिहिणं गरजेचं आहे

 

रिझ्युमची मांडणी हटके असावी

 

Resume-Tips-marathipizza03

 

तम्ही कोणत्या कंपनीमध्ये नोकरीसाठी अर्ज करत आहात, त्यानुसार रिझ्युमची रचना असणं गरजेचं आहे.

उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या ग्राफिक डिजायनिंग कंपनीमध्ये अर्ज करत असाल तर रिझ्युम हा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यापेक्षा वेगळा असावा.

या व्यतिरिक्त रिझ्युम तयार करताना पेजिनेशनसाठी वेगवेगळे रंग, डिझाईन्स, फाँट आणि संबंधित माहितीचे मथळे देणं गरजेचं आहे.

उदाहरणार्थ संपर्काचा विभाग असेल तर त्याचा उठीव अक्षरात मथळा देणं गरजेचं आहे.

.
रिझ्युम अगदी थोडक्यात जास्त माहित सांगणारा असावा.

 

Resume-Tips-marathipizza04

 

तुमचे तांत्रिक कौशल्य, अनुभव, वैयक्तिक माहिती या गोष्टी महत्वाच्या असल्या तरी त्यावर जास्त जागा खर्च करणे चुकीचे आहे. आपला रिझ्युम एका पानापेक्षा जास्त होऊ नये याची काळजी घ्यावी. कमी शब्दात जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करावा.

.
तुमच्या संपर्काची (Contacts) माहिती थोडक्यात असावी.

 

तुमच्याविषयी सर्व माहिती मुलाखतीमध्ये विचारली जाईल एवढा वेळ मुलाखतकर्त्यांकडं नसतो.

त्यामुळं तुमचं ई-मेल अकाऊंट, ट्विटर किंवा फेसबुक अकाऊंट यांची हायपरलिंक देणं जास्त सोयिस्कर ठरतं.

रिझ्युमवर जास्त माहिती न देता हायपरलिंकसह शहर, राज्य आणि पिनकोड दिला तरी प्रभावी ठरु शकतं.

.
रिझ्युममध्ये Summery असणं आवश्यक आहे

 

Resume-Tips-marathipizza06

 

स्वतःविषयी माहिती देण्यासाठी वेगवेगळे भाग करु नये. याऐवजी कामाचा अनुभव, उत्कृष्ट कामगिरी ही एका सारांशामध्ये द्यावी.

एक छोटासा ‘समरी’ असा मथळा करुन ही माहिती दिल्यास मुलाखतकर्त्याला एकाच वेळी तुमच्याविषयी सर्व माहिती वाचणं सोपं जातं.

.

रिझ्युममधील ऑब्जेक्टीव नोकरीशी संबंधित असावं

Resume-Tips-marathipizza02

 

रिझ्युममध्ये ऑब्जेक्टीव लिहिताना अनेकदा आपण ज्या नोकरीला अर्ज केला आहे, त्याला समर्पित नसते. त्यामुळं आपला नोकरी करण्याचा मुख्य उद्देश सांगणारं ऑब्जेक्टीव लिहिणं गरजेचं आहे.

तुम्ही ज्या नोकरीसाठी अर्ज करत आहात त्या नोकरीला अपेक्षित असेच Skills रिझ्युममध्ये द्यावेत.

अजूनही तुमचा रिझ्युम जुन्याच  फॉरमॅट मध्ये असेल तर या टिप्स वापरा आणि तो आकर्षक बनवा !

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?