' हातातली चांगली नोकरी टिकवायची असेल तर या साध्या चुका टाळा!

हातातली चांगली नोकरी टिकवायची असेल तर या साध्या चुका टाळा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जर तुम्ही एखादा व्यावसायिक अर्थात professional कोर्स करत असाल तर तुम्हाला हे नक्कीच माहीत असणार की हे कोर्स करताना इंटर्नशिपला किती महत्त्व द्यावे लागते ते! इंटर्नशिप म्हणजे कंपनीमध्ये आपल्या कोर्सशी निगडीत कामाचा अनुभव मिळाणे जेणेकरून आपल्याला व्यावसायिक ज्ञानही मिळते आणि त्या अनुभवाचा पुढे दुसऱ्या ठिकाणी नोकरीसाठी अप्प्लाय करताना फायदा देखील होतो. बहुतेक इंटर्नशिप या फ्री असतात म्हणजे येथे तुम्हाला पगार मिळत नाही, तुम्हाला ठराविक काळासाठी फुकट काम करावे लागते. तर अनेक इंटर्नशिप अश्याही असतात ज्या तुम्हाला कामाचा थोडासा का होईना पण मोबादला देतात.

internship-mistakes-marathipizza00

स्त्रोत

तर अशी ही इंटर्नशिप प्रोफेशनल कोर्स शिकणाऱ्यांच्या जीवनात महत्त्वाची ठरते कारण त्यावरूनच पुढे त्यांना चांगल्या कंपनीमध्ये नोकरी मिळते आणि ते आपले करियर घडवू शकतात. त्यामुळे इंटर्नशिप करताना ती यशस्वीरित्या पार पाडण्याकडे सर्वांचा कल असतो. पण कधीकधी इंटर्नशिप करताना आपल्या हातून बऱ्याचश्या चुका घडतात. अश्या चुका होणे साहजिकच आहे म्हणा! पण तुम्ही ऑफिसमध्ये कसे वावरता, तुमचं वर्तन कसं? कामात तुम्हाला किती रस आहे? या गोष्टी तुमच्या बॉसच्या मनात तुमचं व्यक्तिमत्त्व बनवतात. त्यामुळे स्वत:चं व्यक्तिमत्त्व बिघडेल अश्या चुका होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.

आज आम्ही तुम्हाला अश्या काही चुका सांगणार आहोत, ज्या इंटर्नशिप करताना आपल्या लक्षात येत नाही परंतु त्या तुमच्या करियरमधला मोठा अडथळा ठरू शकतात.

 

ऑफिसमधल्या वातावरणा विरुद्ध वागणे

internship-mistakes-marathipizza01

स्रोत

प्रत्येक ऑफिसमध्ये काम करण्याची पद्धत वेगळी असते. जेव्हा तुम्ही तिथे जाल, तेव्हा ती पद्धत आत्मसात करा. त्यानुसारच काम करा. उदाहरणार्थ, हॉलमध्ये मोठ्या आवाजात फोनवर बोलू नये, शिवाय मीटिंगची वेळ अचानक ठरणं, हे सगळं तुम्हाला समजणं गरजेचं आहे.

 

बालिशपणा

internship-mistakes-marathipizza02

स्रोत

ऑफिसमधील कामकाजाची पद्धत गंभीर असते. मात्र तिथे तुम्ही कॉलेजच्या कँटिनमधील वातावरण तयार करणं चुकीचं ठरु शकतं. तुमच्या वागण्या-बोलण्यापासून कामामध्ये तुमचा प्रामाणिकता दिसायला हवी.

 

कामाबद्दल गंभीर नसणे

internship-mistakes-marathipizza03

स्रोत

तुम्ही कोणत्याही टीममध्ये काम करत असाल, त्याच्याकडून तुमच्या कामाचा फीडबॅक घेण्याची सवय ठेवावी. याशिवाय जर कोणत्या कामात तुम्हाला कोणी मदत केली तर त्याचे आभार मानण्यास विसरु नका. यावरुन लोक तुमचा स्वभाव पारखतात.

 

प्रसन्न न राहणे

internship-mistakes-marathipizza04

स्रोत

तुम्हाला कोणतंही काम मिळो, ते बोअरिंग असो किंवा नाही, तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर कायम उत्साह आणि आनंद दिसायला हवा. जर तुम्ही उदास चेहरा घेऊन फिरलात किंवा सुस्त दिसलात, तर त्यावरुन असा मेसेज जाईल की, तुमचं कामात मन लागत नाही.

 

विचित्र कपडे परिधान करणे

internship-mistakes-marathipizza05

स्रोत

कामाच्या ठिकाणी नेहमी साध्या कपड्यांमध्ये जा. पायात चप्पलऐवजी शूज घाला. मुलींनीही ड्रेसला साजेशी चप्पल घालावी. तसंच आता तुम्ही कॉलेज नाही तर ऑफिससाठी तयार होत आहात, हे समजणं आवश्यक आहे.

इंटर्नशिप म्हणजे तारेवरची कसरत असते. इंटर्नशिप करताना भरपूर मेहनत घेण्याची तयारी असावी. एकदा का इंटर्नशिप सुरळीत पार पडली की पुढे त्याचा फायदा तुमच्या करियरलाच होणार आहे.  

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?