' राजकीय पक्षांना एक सारखीच निवडणूक चिन्हे कशी मिळतात? – InMarathi

राजकीय पक्षांना एक सारखीच निवडणूक चिन्हे कशी मिळतात?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

निवडणुका लढणाऱ्या प्रत्येक पक्षाला भारतीय निवडणूक आयोगामार्फत चिन्हांच वाटप केलं जातं. सामान्यत: प्रत्येक पक्षाचं निवडणूक चिन्ह वेगवेगळं असतं. पण जेव्हा आपण समाजवादी पार्टी आणि तेलगु देसम पार्टीचं चिन्ह पाहतो तेव्हा मात्र आपण बुचकळ्यात पडतो. कारण दोहोंच निवडणूक चिन्ह एकच आहे ते म्हणजे ‘सायकल’! आता अश्यावेळेस आपल्या मनात प्रश्न उभे राहतात की दोन वेगवेगळ्या पक्षांना एकाच निवडणूक चिन्ह देण्याचा हेतू काय? निवडणूक आयोग कुठे चुकलंय की काय? किंवा त्यांच्याकडून काही घोळ झालाय की काय? तुमच्या या सर्व प्रश्नांचं एकच उत्तर आहे ते म्हणजे- निवडणूक आयोगाने स्वत:हून दोन्ही पक्षांच्या ‘सायकल’ या चिन्हाला मान्यता दिली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून ना कोणता घोळ झाला आहे आणि ना ही त्यांनी काही चूक केली आहे.

same-election-symbol-marathipizza01

सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की दोन्ही पक्ष हे देशातील जरी दोन मातब्बर पक्ष असले तरी ते वेगवेगळ्या राज्यांमध्ये सक्रीय आहेत. समाजवादी पार्टीचे उत्तर भारत आणि कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये अस्तित्व आहे. तर तेलगु देसम पार्टीचे आंध्रप्रदेश आणि तेलंगणा मध्ये अस्तित्व आहे. हे दोन्ही पक्ष ज्या ज्या प्रदेशांमध्ये त्यांचे अस्तित्व आहे तेथेच निवडणुका लढवतात. त्यामुळे हे दोन्ही पक्ष कधीही एकमेकांसमोर उभे ठाकलेले नाहीत. याच कारणामुळे दोन्ही पक्षांना एकाच निवडणूक चिन्हाचा त्रास कधीच सहन करावा लागत नाही.

पण समजा भविष्यात दोन्ही पक्षांनी एकाच मतदारसंघातून आपापले उमेदवार उभे केले तर मात्र निवडणूक आयोग त्याच पक्षाला सायकल चिन्ह वापरण्याची परवानगी देईल ज्या पक्षाचं त्या प्रदेशातील बलस्थान वरचढ आहे.

पक्षांना एकसारखी चिन्हे मिळण्यामागचं कारण अगदी सोपं आहे.
समजा A पक्षाने ‘ट्रेन’ हे चिन्ह निवडले असेल आणि दुसऱ्या राज्यातील B पक्षानेसुद्धा तेच चिन्हं निवडले असेल तर निवडणूक आयोग यात आक्षेप घेत नाही कारण हे पक्ष कधीच एकमेकांविरोधात उभे राहणार नसतात. जरी असं झालंच की A ani B पक्ष एकमेकांविरोधात विरोधात उभे राहिले तर त्या त्या राज्यात कोणाचं वर्चस्व जास्ती आहे त्यानुसार निवडणूक आयोग निर्णय घेतं!

उदाहरणार्थ, तेलगु देसम पार्टीने आंध्रप्रदेशामधील एखाद्या मतदारसंघात निवडणूक लढण्यासाठी आपला उमेदवार उभा केला असेल आणि त्याच मतदारसंघात समाजवादी पार्टीने देखील आपला उमेदवार उभा केला तर मात्र निवडणूक आयोग समाजवादी पार्टीला सायकल हे निवडणूक चिन्ह वापरण्याची परवानगी देणार नाही, कारण तेलगु देसम पार्टी हा आंध्रप्रदेशातील प्रादेशिक पक्ष आहे आणि म्हणून बाहेरून आलेल्या समजवादी पार्टीपेक्षा त्यांचे बलस्थान त्या प्रदेशामध्ये वरचढ आहे. त्याचप्रकारे जर तेलगु देसम पार्टीला जर समाजवादी पार्टीचे ज्या प्रदेशामध्ये बलस्थान वरचढ आहे त्या प्रदेशातील मतदारसंघात आपला उमेदवार उभा करायचा झाल्यास त्यांना सायकल चिन्ह वापरण्याची परवानगी निवडणूक आयोगामार्फत मिळणार नाही.

अश्या पेचप्रसंगावेळी निवडणूक चिन्ह नियम, १९६८ नुसार उतारा १२ मधील तरतुदी अंतर्गत ज्या पक्षाला निवडणूक चिन्ह नाकारण्यात आले आहे त्यांना स्वतंत्र निवडणूक चिन्हांच्या यादीमधील एखादे चिन्ह निवडणूक आयोगामार्फत देण्यात येईल.

same-election-symbol-marathipizza02

स्रोत

 

जर तुम्हाला वाटत असेल की केवळ समाजवादी पार्टी आणि तेलगु देसम पार्टीचचं निवडणूक चिन्ह सायकल आहे तर तुम्ही तुम्ही चुकताय, कारण भारतातील अजून एका राजकीय पक्षाचे निवडणूक चिन्ह ‘सायकल’ आहे. तो पक्ष आहे-

जम्मू आणि काश्मीर मधील नॅशनल पँथर्स पार्टी

jknpp-marathipizza

स्रोत

मणिपूर मधील मणिपूर पीपल्स पार्टी आणि केरळमधील केरळ कॉंग्रेस या दोन्ही पक्षांचे निवडणूक चिन्ह देखील ‘सायकल’ होते. परंतु आता दोन्ही पक्ष स्वतंत्ररित्या सक्रीय नाहीत.

एवढेच नाही तर भारतातील अजून ६ राजकीय पक्ष विविध राज्यात ३ समान निवडणूक चिन्हांसह अस्तित्वात आहेत.
महाराष्ट्रातील उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि झारखंड मधील शिबू सोरेन यांचा झारखंड मुक्ती मोर्चा या दोन्ही पक्षांचे चिन्ह ‘धनुष्यबाण’ आहे.

same-election-symbol-marathipizza03

स्रोत

same-election-symbol-marathipizza04

स्रोत

मायावतींची बहुजन समाज पार्टी आणि आसाम मधील असोम गाना परिषद या दोन्ही पक्षांचे चिन्ह ‘हत्ती’ आहे.

same-election-symbol-marathipizza05

स्रोत

same-election-symbol-marathipizza06

स्रोत

केरळ मधील केरळ कॉंग्रेस एम (प्रादेशिक पक्ष) आणि दिवंगत नेत्या जयललिता यांचा ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्रा काझागम (एआयएडीएमके) या दोन्ही पक्षांचे चिन्ह ‘झाडाची दोन पाने’ आहेत.

same-election-symbol-marathipizza07

स्रोत

same-election-symbol-marathipizza08स्रोत

 

 

आता तुमच्या लक्षात आलं असेल की एकापेक्षा जास्त राजकीय पक्षांचं निवडणूक चिन्ह समान असणं ही गोष्ट तशी सामान्य आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Vishal Dalvi

Anything, Everything, Whatever I like, I don't wait..I Just write......

vishal has 36 posts and counting.See all posts by vishal

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?