' पेट्रोलची ३०% बचत करणाऱ्या यंत्राचा शोध लावणाऱ्या “मराठी” माणसाबद्दल जरूर वाचा! – InMarathi

पेट्रोलची ३०% बचत करणाऱ्या यंत्राचा शोध लावणाऱ्या “मराठी” माणसाबद्दल जरूर वाचा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

काही वर्षांपूर्वी आलेला “दे धक्का” हा चित्रपट आठवतोय? त्यात कोल्हापूरजवळच्या एका लहानश्या गावात राहणारा गाड्या दुरुस्त करणारा साधासा मेकॅनिक खूप कष्ट करून असा एक पार्ट बनवतो ज्याने गाडी चालताना पेट्रोलची खपत अत्यंत कमी होते.

तो चित्रपट बघू आपल्या मनात विचार येतो की खरंच असा काही पार्ट शोधून काढला तर किती बरं होईल.

 

de dhakka scene inmarathi

 

दिवसेंदिवस वाढत चाललेल्या पेट्रोलच्या किमतीमुळे खिशाला पडणारे भगदाड कमी होईल. तसेच नैसर्गिक संसाधनांवर येणारा ताण कमी होईल आणि प्रदूषण कमी होईल हा तर बोनसच मिळेल.

तर असा पार्ट खरंच बनवायचा अनेक हुशार लोक प्रयत्न करत आहेत आणि कोल्हापूरच्या एका व्यक्तीने असा मेकॅनिकल व्हॉल्व तयार करण्यात यश देखील मिळवले आहे ज्याने गाडीत पेट्रोलची खपत तीस टक्के कमी होते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

कपड्यांचा व्यवसाय करणारे अरविंद खांडके जेव्हा जेव्हा त्यांच्या कामासाठी कोल्हापूरहुन आसपासच्या गावात त्यांच्या बाईकवरून जायचे, तेव्हा तेव्हा त्यांना एकच चिंता सतावत असे. ती म्हणजे गाडीसाठी लागणारे पेट्रोल!

 

petrol-inmarathi

 

त्यांच्या प्रत्येक प्रवासात त्यांना पेट्रोलवर भरपूर पैसे खर्च करावा लागत असे. तुमच्या आमच्या मनात हा विचार येतोच की कमी पेट्रोलमध्ये भरपूर मायलेज देणारी कुठली गाडी मिळाली तर बरे होईल. तोच विचार अरविंद खांडकेंच्या मनात सुद्धा येत असे.

त्यांनी विचार केला की पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करणे आपल्या हातात नाही पण आपण इंजिनमध्ये काही बदल केले तर पेट्रोलचा प्रश्न आपण आपल्यापुरता तरी नक्कीच सोडवू शकतो.

 

petrol hike inmarathi

 

कोल्हापूरचे अरविंद खांडके हे दहावी उत्तीर्ण आहेत आणि त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. त्यांनी स्वतःच्या गाडीच्या इंजिनमध्ये बदल करण्यासाठी काम सुरु केले.

त्यांनी गाडीमध्ये पेट्रोलची खपत कमी करण्यासाठी व्हॉल्ववर प्रयोग करणे सुरु केले.

७१ वर्षीय अरविंद खांडके ह्यांनी त्यांच्या ह्या प्रयोगाविषयी बेटर इंडियाशी बोलताना सांगितले की,

“सगळ्या जुन्या पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्यांमध्ये इंजिनला कार्बोरेटर जोडलेले असते. मी एक व्हॉल्व ह्या कार्बोरेटरला बसवला. ह्या व्हॉल्वमुळे कार्बोरेटरद्वारे इंजिन चालण्यासाठी पेट्रोल बरोबरच पाणी आणि हवेचा वापर होतो.”

कार्बोरेटर हा गाडीचा एक महत्वाचा एक पार्ट आहे हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे . मोटरसायकल तसेच इतर लहान इंजिन असलेल्या गाड्यांमध्ये हा पार्ट असतो ज्यामुळे पेट्रोल व हवेचे योग्य प्रमाणात मिश्रण होऊन इंजिन सुरु होते.

 

khandke inmarathi

 

ह्या प्रक्रियेत काही बिघाड झाला तर एकतर इंजिन नीट चालत नाही किंवा सुरुच होत नाही. ह्यावरूनच आपण अंदाज लावू शकतो की कार्बोरेटर हा गाडीतील अत्यंत महत्वाचा पार्ट आहे. म्हणूनच खांडकेंनी ह्या पार्टवर प्रयोग केला आणि त्यांचा हा शोध सार्थकी लागला.

२००५ साली नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनने खांडकेंना त्यांच्या ह्या पर्यावरणपूरक संशोधनासाठी पुरस्कार देऊन सन्मानित केले.

 

arvind khandke inmarathi

खांडकेंच्या ह्या संशोधनाचा अधिक बारकाईने अभ्यास करताना केंद्र सरकारच्या संस्थेने नोंद केली की,

“ह्या प्रक्रियेचा अभ्यास करताना १९८० साली एक दिवस त्यांच्या लक्षात आले की एयर फिल्टर तेलकट झाला आहे आणि सिलिंडर रिबाउंडमुळे हवा व पेट्रोलच्या मिश्रणाची गळती होते आहे आणि ती गळती कार्बोरेटरमधून बाहेर पडते आहे.

ही गळती थांबवण्यासाठी त्यांनी व्हॉल्वसदृश एक पार्ट डिझाईन करून कार्बोरेटरवर बसवला. प्रयत्न करत करत १९८३ साली त्यांनी माईल्ड स्टीलपासून व्हॉल्वचा एक प्रोटोटाइप बनवला. पण त्याची तपासणी करताना त्यांच्या लक्षात आले की व्हॉल्वची झडप नीट चालत नाहीये कारण ती वजनाने जड आहे.

मग त्यांनी ती झडप वेगळ्या मटेरियलपासून बनवली आणि नायलॉन व पॉलीप्रोपिलीन वापरून नवीन व्हॉल्व तयार केला. हा व्हॉल्व १ एचपी ते १.२५ एचपी इंजिनसाठी चालू शकणार होता.”

ह्या १९८३ साली तयार केलेल्या व्हॉल्वमध्ये मागच्या वर्षी म्हणजेच २०१८ साली थोडे बदल करण्यात आले. ह्यात वॉटर प्रेशर किट बसवण्यात आले. आधीच्या व्हॉल्वने हवा व पेट्रोलच्या मिश्रणाचे गळती न होता जास्त दहन होत असल्याने गाडीच्या मायलेजमध्ये फरक पडत होता.

 

arvind inmarathi

 

आताच्या नवीन व्हॉल्वमुळे ह्या मिश्रणात पाणी सुद्धा मिसळले जाईल आणि त्यामुळे पेट्रोलची ३० टक्के बचत होईल. पाणी गरम होऊन त्याचे रूपांतर वाफेत होऊन ती वाफ शक्तीचा स्रोत /इंधन म्हणून वापरले जाईल आणि त्याने इंजिनची क्षमता वाढण्यास मदत होईल.

खांडकेंनी सांगितले की जेव्हा गाडीच्या इंजिनमध्ये पेट्रोलचे दहन होते तेव्हा वेगळ्या टाकीत असलेल्या पाण्याची वाफ होऊन इंजिनचें ऍव्हरेज वाढण्यास मदत होते.

अश्या हायब्रीड इंधनामुळे पेट्रोल सप्लायच्या टक्केवारीत घट होते आणि त्यामुळे गाडीत कार्बन कमी साठते व इंजिनचे आयुष्य वाढते ह्यामुळे इंजिन ऑईलचे सुद्धा आयुष्य वाढून परिणामी गाडी चांगली चालते व गाडीचेही आयुष्य वाढते.

खांडके ह्यांनी पुढे असेही सांगितले की त्यांनी त्यांच्या गाडीत हा व्हॉल्व बसवून घेतल्यापासून खांडकेंना आता दर ५००० किमीचे रनिंग झाल्यानंतर इंजिन ऑइल बदलावे लागते.

आधी हेच त्यांना २००० किमी झाल्यानंतर इंजिन ऑइल बदलून घ्यावे लागत असे.

त्यांना त्यांच्या व्यापारासाठी कायमच गाडीने सगळीकडे प्रवास करावा लागतो. त्यामुळे त्यांना तर हा व्हॉल्व बसवून घेतल्यापासून खूप जास्त फायदा झाला आहे जे त्यांनी सांगितलेल्या आकड्यांतूनच दिसून येते.

ते पुढे म्हणतात की,

“प्रीमियर पद्मिनी गाडीवर ह्याची टेस्ट घेतल्यानंतर हे लक्षात आले की ह्या गाडीचे ऍव्हरेज मायलेज १० किमी आहे जे व्हॉल्व बसवल्यानंतर १३ किमी इतके वाढते. ह्यावरून आपण म्हणू शकतो की ह्या व्हॉल्व मुळे पेट्रोलची ३० टक्के बचत होते.

 

bangla inmarathi

 

१९९९ साली कोल्हापूरच्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये ह्याची परत चाचणी घेण्यात आली. ३५० सीसीच्या एनफिल्ड गाडीत जर हा व्हॉल्व बसवण्यात आला आणि कार्बन मोनोऑक्साइड आणि हायड्रो कार्बन उत्सर्जन किती होते हे तपासण्यात आले.

व्हॉल्व बसवला असल्यास १२० rpm ला CO रिडक्शनचे प्रमाण ८.३ टक्के होते तर २००० rpm ला हे प्रमाण ८२ टक्के इतके होते.

जेव्हा गाडीचा वेग वाढतो तेव्हा प्रक्षुब्धता (टर्ब्युलन्स) देखील वाढते आणि व्हॉल्व असेल तर इंधनाचे दहन अधिक प्रभावी होते आणि इंधनाचे नुकसान (गळती) गती कमीतकमी होते जी व्हॉल्व नसेल तर खूप जास्त होते. “

खांडके ह्यांनी त्यांच्या ह्या दोन्ही यंत्रांचे पेटन्ट घेतले आहे. पहिले पेटन्ट त्यांनी १९९९ साली मिळवले आणि दुसरे २०१८ साली मिळवले. जेव्हा त्यांना विचारले की ह्या व्हॉल्वची व्यावसायिक विक्री करण्याबाबत त्यांचे काय मत आहे तेव्हा त्यांनी नम्रपणे सांगितले की,

 

khandkes patent inmarathi

 

“मी एक सामान्य व्यावसायिक आहे आणि हा व्हॉल्व मोठ्या प्रमाणावर तयार करण्यासाठी माझी इतकी मोठी आर्थिक तयारी नाही. मला गाड्यांच्या निर्मितीची आणि त्या तंत्रज्ञानाची आवड आहे तसेच कमी पेट्रोलवर चालणारी गाडी ही माझी गरज होती म्हणून मी हा प्रयोग केला.

जर इतर कुणाला हे यंत्र तयार करून वापरायचे असेल, विक्री करायची असेल तर मी आनंदाने त्या व्यक्तीला माझ्याकडे असलेली सगळी माहिती व ज्ञान देण्यास तयार आहे.”

 

bosch inmarathi

तुम्हाला ह्या पार्टबद्दल जर खांडके ह्यांच्याशी बोलण्याची इच्छा असेल तर तुम्ही arvinde6@gmail.com ह्या इ मेल ऍड्रेसवर त्यांच्याशी संपर्क साधू शकता.

एका सामान्य व्यावसायिकाने केलेले हे संशोधन खरंच कौतुकास्पद आहे.

त्यांच्याकडून माहिती घेऊन हे पार्ट जर खरंच कुठल्या कंपनीने तयार केले, तर सर्वांचाच फायदा होईल शिवाय पर्यावरणाचेही होणारे नुकसान कमी होईल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?