भारतीय सैन्याच्या या स्पेशल फोर्सचे ट्रेनिंग म्हणजे केवळ “अग्निदिव्य”!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम

 

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

===

ज्यांच्या बॅजवरच “बलिदान” असे कोरलेले असते, ते मरून बेरेट म्हणून ओळखले जाणारे आपल्या सैन्यातील स्पेशल फोर्सेसचे पॅराकमांडो म्हणजे धैर्य, शौर्य आणि कट्टर देशप्रेमाची प्रतीके आहेत.

आपल्या देशासाठी बलिदान देताना सामान्य माणसासारखा ते फक्त स्वतःचा आणि त्यांच्या कुटुंबाचा विचार करत बसत नाहीत म्हणूनच ते असामान्य आहेत.

 

para cap
indiandefencereview

 

भारताच्या सगळ्याच सशस्त्र दलातील सर्वच लोक हे कायम जीव धोक्यात घालून डोळ्यात तेल घालून देशाचे व आपल्या सर्वांचे रक्षण करत असतात.

सैन्यात, नेव्हीत किंवा वायुसेनेत प्रवेश मिळवणे हे खायचे काम नाही. तिथे तुमच्या शारीरिक मानसिक आणि बौद्धिक क्षमतेची कसोटी लागते.

आणि एकदा प्रवेश मिळाला की मग सुरू होते खडतर प्रशिक्षण! हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करून सशस्त्र दलात स्थान मिळवलेल्यांचे व्यक्तिमत्व आपल्यासारख्या सामान्य लोकांपेक्षा वेगळेच असते.

 

para inmarathi
theweek.com

 

एकवेळ हे प्रशिक्षण पूर्ण करणे तुलनेने सोपे आहे पण सर्जिकल स्ट्राईक वगैरे सारखी अत्यंत महत्वाची आणि जोखमीची जबाबदारी ज्या सैनिकांवर सोपवण्यात येते त्या स्पेशल फोर्सेसमधील पॅरा कमांडोजना जे प्रशिक्षण दिले जाते त्याचे वर्णन “अग्निदिव्य” ह्या एकाच शब्दात करता येते.

हे प्रतिष्ठित “मरून बेरे” (मरून कॅप) मिळवणे हे सामान्य माणसाच्याने शक्यच नाही इतके खडतर ट्रेनिंग है स्पेशल फोर्सेसमधील पॅराकमांडोजना दिले जाते.

 

para special force
girlandworld.com

 

हा सन्मान मिळवणे हे जगातील सर्वात कठीण आव्हान आहे असेही म्हटले तर वावगे ठरणार नाही.

देशाच्या सुरक्षेसाठी शत्रूला नामोहरम करण्यासाठी जेव्हा गुप्त आणि अत्यंत जोखमीच्या मोहीमा आखाव्या लागतात तेव्हा भारतात ती जबाबदारी पॅरा स्पेशल फोर्सेसना दिली जाते.

हे आपल्या सैन्यातील एक असे युनिट आहे ज्यांचे ट्रेनिंग अत्यंत खास आणि वेगळे असते.

ह्या फोर्सेसमधील शूर सैनिक शत्रूच्या हद्दीत अगदी लांबपर्यंत घुसून त्यांना धूळ चारून येतात. आपल्या भारतीय सैन्यात अश्या स्पेशल फोर्सचे नऊ बटालीयन आहेत आणि त्यातील प्रत्येक व्यक्ती ही अत्यंत अवघड मिशन पार पाडण्यासाठी कुशल व सुसज्ज असतात.

 

para sf inmarathi
quora.com

भारतीय सैन्यदलाच्या इतर बटालियन्स आणि पॅरा एसएफ मध्ये सर्वात मोठा फरक कुठला असेल तर तो त्यांना देण्यात येणाऱ्या ट्रेनिंगचा आहे. हे भारतातील सर्वात कठीण मिलिटरी प्रशिक्षण तर आहेच पण हे जगातील सर्वात कठोर आणि खडतर कमांडो प्रशिक्षणांपैकी एक आहे.

हे प्रशिक्षण नुसते युट्युबवर बघितले तरी सामान्य माणसाच्या मनात हे नक्कीच येते की,

 

indian army
adgully.com

 

“हे असे ट्रेनिंग यशस्वीपणे पूर्ण करणे आपल्याला सात जन्मात जमणार नाही” आणि आपोआपच ह्या जवानांबद्दलचा आदर द्विगुणित होतो आणि त्यांच्याबद्दलचा अभिमान अधिकच वाढतो.

पॅरा एसएफ सैनिकांना ९० दिवसांच्या एक वेगळ्या प्रशिक्षणातून जावे लागते. ह्या प्रशिक्षणात त्यांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतांची कसोटी लागते.

कॉम्बॅट ट्रेनिंग (लढाऊ प्रशिक्षण) ते सहनशक्तीची कठीण परीक्षा असे खडतर ट्रेनिंग घेताना जवळजवळ सगळ्याच सैनिकांना कधी ना कधी “आता सगळं संपलं, आता ह्यापुढे सहन करणे शक्य नाही” असे वाटू लागते.

त्यातून सुद्धा ते तावून सुलाखून बाहेर पडतात आणि देशाच्या रक्षणासाठी सज्ज होतात.

पण धैर्याची परीक्षा बघणाऱ्या अग्निदिव्यातून बाहेर पडणे अगदी कणखर असलेल्या सैनिकालाही जमणे अवघडच असते म्हणूनच पॅरा एसएफमधून बाहेर पडण्याचे प्रमाण देखील ८० टक्के आहे.

ह्या अवघड निवड प्रक्रियेतून जाताना काही जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

 

commando inmarathi
theweek.com

 

ET शी बोलताना पारस रेजिमेंटचे कर्नल असलेले लेफ्टनंट जनरल विनोद भाटिया (निवृत्त) ह्यांनी सांगितले की ,

“We feel we are a bunch of misfits that fit well together. During training, the aim is to basically break the will of the soldier. It’s only when we don’t succeed that it means the soldier has passed.”

“आम्हाला असे वाटते की आम्ही मिसफिट लोकांचा एक समूह आहोत जो इथे मात्र छान एकत्र फिट होतो. प्रशिक्षणादरम्यान सैनिकांची इच्छाशक्ती कशी नष्ट होईल ह्यासाठीच प्रयत्न केले जातात. इच्छाशक्ती संपते फक्त तेव्हाच माणूस हरतो.

पण आम्ही जेव्हा काहीही करूनसैनिकांनी इच्छाशक्ती नष्ट करू शकत नाही, तेव्हा सैनिक मात्र यशस्वी झालेला असतो.”

पॅरा एसएफच्या प्रशिक्षणात त्यांना शस्त्रात्रांच्या प्रशिक्षणासह कम्युनिकेशन, वैद्यकीय व स्वयंपाकाचेही प्रशिक्षण देण्यात येते.

त्यांना अंडरकव्हर एजन्ट म्हणून काम करता यावे ह्यासाठी त्यांना विविध भाषा सुद्धा शिकवण्यात येतात. ह्यांसह त्यांना ज्या ज्या गोष्टींचे प्रशिक्षण दिले जाते त्याची यादी खूप मोठी आहे.

ह्या कमांडोजच्या प्रशिक्षणात असलेला सगळ्यात कठीण भाग म्हणजे ३६ तासांची स्ट्रेस फेज.. ह्या फेजमध्ये त्यांना सलग ३६ तास न झोपता राहायचे असते.

ह्या दरम्यान त्यांना जेवण व पाणी सुद्धा दिले जात नाही आणि प्रचंड शारीरिक व मानसिक यातनांतून जावे लागते. ऐकूनच अंगावर काटा आला ना?

 

parasf inmarathi
thefact.com

 

हे प्रशिक्षण विविध टप्प्यांत असते. पहिल्या टप्प्यात २०-२० किलोच्या दोन जेरी कॅन उचलून न्याव्या लागतात.

दुसऱ्या राउंडमध्ये त्यांना ६०-८५ किलो वजन असलेले ट्रकचे टायर उचलून न्यावे लागतात आणि तिसऱ्या राउंडमध्ये त्यांना ३० ते ८० किलो वजनाचे लाकडाचे ओंडके उचलून न्यावे लागतात.

ह्या सगळ्यांसह त्यांच्याजवळ त्यांची ३० किलो वजनाची बॅग कायमच असते आणि त्यांची शस्त्रे सुद्धा असतात. ह्याखेरीज त्यांना ही सगळी वजनं उचलून न्यावी लागतात.

ह्या फेजच्या दुसऱ्या टप्प्यात सैनिकांचे हात व पाय बांधलेले असतात आणि त्यांना १२ फूट खोल थंडगार बर्फाच्या पाण्यात उडी मारण्यास सांगितले जाते.

हीच सैनिकांची सर्वात कठीण परीक्षा असते व अत्यंत कमी ऑक्सिजन मिळाल्यामुळे किंवा ऑक्सिजन नसल्यामुळे ह्याच फेजमध्ये बहुतांश सैनिकांची इच्छाशक्ती संपुष्टात येते.

ह्यांसह त्यांना कॉम्बॅट फ्री फॉलचे ट्रेनिंग देण्यात येते. ह्यात हाय अल्टीट्युड लो ओपनिंग (HALO) आणि हाय अल्टीट्युड हाय ओपनिंग (HAHO) पॅराशूट जम्प शिकवण्यात येतात.

 

army inmarathi
deday.com

 

तसेच सिवेज लाईन्समधून सरपटत जाण्याचे ट्रेनिंग सुद्धा देण्यात येते. ट्रेनिंगच्या शेवटी आणि मरून बेरे (maroon beret) मिळण्याच्या आधी ह्या सैनिकांना चक्क काचा खाण्यास सांगितले जाते.

ही काचा खाण्याची परीक्षा सैनिकांचा निडरपणा तपासण्यासाठी घेण्यात येते. ह्या पॅरा एसएफ कमांडोजना ज्या मिशनवर पाठवण्यात येते ते बहुतांश सर्वच मिशन्स गुप्त ठेवण्यात येतात.

१९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धापासून ते उरी सर्जिकल स्ट्राईकपर्यंत अनेक महत्वाच्या व जोखमीच्या वेळेला ह्या पॅरा एसएफ कमांडोजने महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे.

इतक्या कठीण अक्षरश: अग्निदिव्यातून जाऊन ,सतत जीवावर उदार होऊन निर्भीडपणे देशाचे डोळ्यात तेल घालून प्राणपणाने रक्षण करणाऱ्या ह्या सर्व शूर सैनिकांना हात जोडून मानवंदना दिली पाहिजे.

भारतमातेच्या शूर सुपुत्रांनो आम्ही तुम्हाला सॅल्यूट करतो.

===

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?