' फक्त "मेड इन इंडिया" लिहिता यावं म्हणून या भारतीय कंपनीने घेतला होता इंग्रजांशी पंगा...

फक्त “मेड इन इंडिया” लिहिता यावं म्हणून या भारतीय कंपनीने घेतला होता इंग्रजांशी पंगा…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

‘गोदरेज कंपनी’ नाम तो सुना होगा असं म्हणण्याचीही गरजच नाही. गोदरेज कंपनी माहीत नाही अशी एकही व्यक्ती अस्तित्वात असणे शक्य नाही.

भारताच्या व्यापाराला उंचीवर नेऊन ठेवण्यात या कंपनीचा मोठा हात आहे आणि एक गोष्ट या कंपनीच्या संस्थापकांनी आपल्या प्रोडक्टवर ‘मेड इन इंडिया’ असं लिहिण्यासाठी पंगा घेतला.

पाहूया काय आहे ही कहाणी.

१८९४ मध्ये मुंबईचे दोन तरुण वकिलांनी खळबळ माजवली होती. एकाने साउथ आफ्रिकेत तर एकाने ईस्ट आफ्रिकेत. दोघांचे विचार एकच होते की, वकिली पेशात असलो तरी खोटं बोलायचं नाही.

एक होते मोहनदास करमंचद गांधी जे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहेत. आणि दुसरे होते आर्देशीर गोदरेज. गोदरेज समूह ज्यांनी बनवला ते आर्देशीर गोदरेज.

 

aredshir godrej
TheBetterIndia.com

 

गोदरेजचा प्रवास : 

सत्यवचनी असणारे आर्देशीर गोदरेज आपल्या या स्वभावामुळे वकिलीपासून लवकरच दूर झाले. १८९४ मध्ये ते मुंबई येथे परतले.

एका फार्मासिटीकल कंपनीत केमिस्ट असिस्टंटची त्यांनी नोकरी केली, परंतु पारसी समाजाप्रमाणे आपणही काही व्यवसाय करावा अशी त्यांना इच्छा होती.

केमिस्टच्या कामामुळे त्यांना एक कल्पना सुचली. शस्त्रक्रियेसाठी लागणारी कात्री आणि ब्लेड तयार करण्याची ती कल्पना होती. जी उत्पादने फक्त ब्रिटिश कंपन्या तयार करत होती.

 

british company InMarathi

हाच विचार आर्देशीर पक्का केला आणि पारसी समाजातील एक हितचिंतक मेरवानी यांच्याकडून ३००० रुपये कर्ज घेतले, पण आपल्या तत्त्वांमुळे ते या कामात लवकरच अपयशी ठरले.  काय होते त्याचे तत्त्व?

आर्देशीर गोदरेज यांनी ती शस्त्रक्रियेसाठी लागणारी साधनं तयार करायला सुरुवात केली एका ब्रिटिश कंपनीसाठी. म्हणजे प्रोडक्ट गोदरेज यांनी तयार करायचे, पण विकण्याची जबाबदारी ब्रिटिश कंपनीची होती.

 

godrej 1 inmarathi
ParsiKhabar.com

पण हा करार लवकरच तुटला कारण आर्देशीर गोदरेज म्हणाले की, ते त्यांच्या प्रोडक्टवर ‘मेड इन इंडिया’ लिहितील. ब्रिटिश कंपनी त्यासाठी तयार नव्हती.

ते म्हणाले की, ‘मेड इन इंडिया’ असं म्हटलं तर उत्पादनाची विक्री होणार नाही.

दोन्ही पक्ष त्यांच्या बाजूला ठाम राहिले आणि याचा परिणाम असा झाला की, आर्देशीर गोदरेज यांना त्यांचा पहिला-वहिला धंदा बंद करावा लागला.

त्यांचं प्रोडक्ट चांगलं नव्हतं म्हणून नाही तर त्यांचं तत्त्व ठाम होतं. माझ्या देशात झालेल्या वस्तूला मी दुसर्‍या देशाचं नाव का देऊ? या तत्त्वावर ते ठाम होते.

असा पहिला व्यवसाय बंद पडल्यानंतर आर्देशीर गोदरेज निराश झाले होते. त्यांनी आपली नोकरी चालू ठेवली होती, पण व्यवसायात मन होते. एक दिवस वर्तमानपत्रात एक बातमी आली त्यावर त्यांची नजर गेली.

मुंबईतील चोरीची घटना होती ती आणि त्या बरोबर मुंबई पोलीस आयुक्तांकडून एक निवेदन पण देण्यात आलं होतं की, ‘सर्व लोकांनी त्यांच्या घराच्या आणि कार्यालयाची सुरक्षा सुधारावी.’

आर्देशीर च्या डोक्यात व्यवसायाचा किडा पुन्हा वळवळू लागला. कुलूप तयार करण्याची कल्पना त्यांच्या मनात आली. त्या वेळी भारतातील सर्व कुलपं हाताने तयार केली जात. ती सुरक्षित नव्हती.

 

godrej 2 inmarathi
Lockspor.com

 

त्यांनी अशी कुलपं बनवायचं ठरवलं की, जे तोडणं कठीण असलं पाहिजे. कुलपं तयार करण्याच्या कल्पनेसह ते पुन्हा मेरवानजींकडे गेले. पहिले कर्ज न फेडल्याबद्दल त्यांनी त्यांची माफी मागितली आणि मग त्यांच्यासमोर कुलपाची नवी योजना मांडली.

मेरवानी स्वत: एक व्यापारी होते. त्यांनी पण वर्तमानपत्रातील ती बातमी वाचली होती.

थोड्या चर्चेनंतर मेरवानींनी त्यांना मदत करण्याचे कबूल केले. सक्सेस हाय वे पुस्तकात मेरवानी आणि त्यांच्यातील संवाद असा लिहिला आहे की जेव्हा मेरवानींनी त्यांना विचारले,

‘‘मुला तुमच्या जातीत किंवा घरात असं कोणी आहे का की ज्यांनी कुलूप तयार केलं आहे?’’

त्यावर त्यांनी उत्तर दिलं,

‘‘मी पहिला आहे की नाही हे मला माहीत नाही, पण तुमच्या सारख्या महान माणसाच्या मदतीनं मी नक्कीच सर्वश्रेष्ठ बनून दाखवीन.’’

जिद्द आणि आत्मविश्‍वास याचं हे उत्तम उदाहरण आहे.

तर अशा रितीने मेरवानींकडून आर्देशीर यांना परत कर्ज मिळाले. दिनांक ७ मे १८५७ गोदरेज यांनी कामाला सुरुवात केली. बॉम्बे गॅस वर्क्सच्या बाजूला कुलपं बनवण्याचं काम सुरू केलं. गुजरात आणि मालबारहून १२ शिकलेले कारागीर आणले गेले.

अँकर या नावाने कुलपं बाजारात आली.

godrej 3 inmarathi
GodrejArchives.com

या सगळ्यात महत्त्वाचं होतं ते एक वर्षाच्या गॅरेंटीचं पत्र ज्यामुळे त्याच्या विक्रीला मागणी आली. तेव्हा कोणत्याही कुलपाला गॅरेंटी नव्हती. गोदरेजचं

कुलूप दुसर्‍या कोणत्याही चावीने उघडू शकत नव्हते.

अशा तर्‍हेने गोदरेजचं ताळं म्हणजेच कुलूप भारत आणि भारताच्या लोकांचं विश्‍वासाचं स्थान बनलं आणि आर्देशीर गोदरेज यांचा बिझनेस चांगला चालू लागला.

आता त्यांना नवीनवीन उद्योगांची कल्पना सुचू लागली. मग गोदरेजचं कपाट बनवलं गेलं. कुलपं आणि कपाट हे गोदरेजचे ब्रँड झाले तरीही आर्देशीर गोदरेज यांना अजून काहीतरी नवीन करण्याची इच्छा होती.

१९०६ मध्ये ते टिळकांच्या संपर्कात आले आणि स्वदेशी सिद्धांत अवलंबण्याची शपथ घेतली.

आत्तापर्यंत त्यांचा धाकटा भाऊ फिरोजशाह हाही त्यांच्या व्यवसायात सामील झाला. दोन्ही भावांचा कुलूप आणि कपाट व्यवसाय वाढत होता. भारतीयांवर ब्रिटिशांचे राज्य होते. त्यामुळे भारतीयांवर विविध प्रकारचे कर लागू होते.

आर्देशीर गोदरेज त्यामुळे खूप विचलित होते. १९१० मध्ये त्यांच्या आयुष्यात आणखी एक वळण आले. ज्यांच्याकडून त्यांनी कर्ज घेऊन व्यापार सुरू केला होता त्याला एक भगिनी होती. तिचे नाव बॉयस होते.

 

godrej 4 inmarathi
twitter.com

 

सीएच्या सल्ल्यानुसार गोदरेजनी बॉयसला आपला पार्टनर बनवले. मग कंपनीचे नाव ठेवले गोदरेज अँड बॉयस मॅन्युफॅक्चरिंग कंपनी. काही दिवसांनी बॉयसने कंपनी सोडली, परंतु आदर्शने आजही कंपनीचे नाव तेच ठेवले. ‘गोदरेज अँड बॉयस’.

नंतर आर्देशीर लोकांच्या थेट संपर्कात आले. मग त्यांनी आंघोळीच्या साबणाचे उत्पादन सुरू केले. तेव्हा भारतात असलेल्या साबणात पशूंची चरबी वापरली जात असे.

त्यामुळे हिंदूंची मन दुखावली जात म्हणून साबण तयार करण्याची व्यावसायिक संधीचा विचार त्यांनी केला.

१९१८ साली गोदरेज कंपनीने दोन साबण तयार केले. असे एकेक उत्पादन वाढू लागली आणि गोदरेजचा कारभार वाढू लागला. हळूहळू कुटुंबातील मेंबर या बिझनेस मध्ये सामील झाले.

मग वॉशिंग मशीन, फ्रीज, हेअर डाय, फर्निचर अशी उत्पादनं वाढू लागली आणि गोदरेज कंपनी नावारूपास आली आणि ‘मेड इन इंडिया’ हे वाक्य लिहायला नकार देणार्‍या ब्रिटिशांच्या नाकावर टिच्चून गादरेज कंपनीने आपला व्यवसाय दिवसेंदिवस वाढवला.

 

godrej 5 inmarathi
GodrejArchives.com

मनात तत्त्व होतं, एक सचोटी होती आणि देशाबद्दल प्रखर अभिमान होता. म्हणूनच हे सगळं शक्य झालं.

व्यवसायात पाऊल ठेवलं आणि तो व्यवसाय नावारूपाला आणला इतका की आज इतकी वर्षं झाली तरी गोदरेजचं स्थान अढळ आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?