' डॉ. शीतल आमटेंसारख्या हुशार व्यक्तीची आत्महत्या; विचार करायला भाग पाडणाऱ्या इतर सुसाईड नोट्स… – InMarathi

डॉ. शीतल आमटेंसारख्या हुशार व्यक्तीची आत्महत्या; विचार करायला भाग पाडणाऱ्या इतर सुसाईड नोट्स…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

ज्या आनंदवनाने आजपर्यंत अनेकांना नवसंजीवनी दिली, ज्या आनंदवनाने लाखोंना जगण्याची नवी प्रेरणा दिली त्याच आनंदवनाने आज एक दुर्दैवी अंत पाहिला. आनंदवनाच्या सीईओ डॉ शीतल आमटे यांनीे नैराश्यातून आत्महत्या केली आणि पुन्हा एकदा नैराश्य हा मुद्दा चर्चेत आला.

नेहमीप्रमाणेच अनेक टिकाकारांनी आत्महत्येबाबत आपली परखड मतं मांडली तर अनेकांनी आमटे कुटुंंबातील वादावर हल्लाबोल केला.

डॉ शीतल आमटे यांच्या आत्महत्येमागे कोणतीही कारणं असली तरी या नैराश्याची झळ एक हुशार, कर्तबगार महिलेला आणि त्यांच्या कुटुंबियांना लागली यात शंका नाही.

मात्र यापुर्वी आत्महत्या, त्यामागील कारणं यांचा उहापोह होणं गरजेचं आहे.

यासाठी भुतकाळातल्या काही उदाहरणांकडे प्रत्येकाने बघायचालच हवं.

फोफावणा-या आत्महत्येंचं प्रमुख कारण म्हणजे नैराश्य, अर्थात ताण-तणाव. अभिनेता सुशांत सिंग, अभिनेता असिफ बसरा… २०२० साली तर या धक्कादायक घटनांची यादी सातत्याने वाढती आहे. केवळ सेलिब्रिटीज नव्हे तर सामान्यांची अनेक ज्वलंत उदाहरणं तुमच्याही आसपास दिसतील.

तणाव नाही, टेन्शन नाही, दुःख नाही असा एकही माणूस शोधूनही सापडणार नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही ताणताणाव असतोच. रोजच्या जगण्याच्या विवंचना इतक्या तीव्र झालेल्या आहेत की, ताण-ताणाव हे आयुष्याचा अविभाज्य भाग बनले आहेत.

यामुळे अनेक लोक, हायब्लड प्रेशर, मधुमेह, लठ्ठपणा अशा समस्यांनी देखील ग्रस्त आहेत. परंतु, तरीही जगण्याची उर्मी स्वस्थ बसू देत नाही.

प्रत्येक समस्येवर मात करत, हसत जगणारे काही कमी नसतात. पण, काही लोकांना हा ताण सहन होत नाही, त्यांना सगळ्या समस्येवर झटपट तोडगा हवा असतो. अगदी तरुण वर्गही याला अपवाद नाही.

संकटांशी दोन हात करण्याची यांची क्षमता दिवसेंदिवस कमी कमी होत चालले की काय अशी शंका वाटावी इतकी गंभीर परिस्थिती आहे.

 

tensed-inmarathi

 

तरुणांच्या वाढत्या आत्महत्या हा चिंतेचा विषय तर आहेच, पण आयआयटी सारख्या प्रतिष्ठित संस्थेतून शिक्षण घेणारे तरुण जेव्हा अपयशाला, तणावाला, चिंतेला, समस्येला घाबरून, आत्महत्येचा पर्याय निवडतात तेव्हा कोणाही सहृदयी व्यक्तीला अस्वस्थ वाटणे साहजिक आहे.

तसेही इतक्या मोठ्या संस्थेतून उच्चपदवी घेणारे तरुण इतका टोकाचा मार्ग स्वीकारतात तेव्हा समाज, शिक्षणव्यवस्था, पालक, मित्र-मैत्रिणी यांच्यासमोर काही तीव्र आणि गंभीर स्वरूपाचे प्रश्न निश्चितच उभे राहतात.

चांगले मार्क्स आणि चांगली नोकरी, या एवढ्याच दोन इच्छा परंतु या इच्छांनी कित्येक विद्यार्थ्यांचा नाहक बळी घेतला असेल.

अशीच एक घटना हैद्राबादच्या आयआयटीमध्ये घडली होती. आयआयटीमध्ये मास्टर्स डिग्री घेणाऱ्या एका विद्यार्थाने सातत्याने शैक्षणिक कामगिरी खालावत असल्याच्या कारणावरून आत्महत्या केली.

स्पर्धेत टिकून राहण्याचा दबाव इतका प्रचंड असतो की, त्यापुढे स्वतःच्या आयुष्याचे मोल देखील नगण्य वाटत आहे.

जाता जाता त्या विद्यार्थ्याने आपल्या ८ पानी सूसाइड नोटमध्ये आपले मित्र, पालक आणि प्रत्येकासाठी, आपली आयुष्याबद्दलची काही मते लिहून ठेवली होती. यात सगळ्यात महत्वाचा संदेश आहे, “जगायचं विसरू नका, हे आयुष्य एकदाच मिळतं.”

 

suicide_note_inmarathi

 

ही सुसाईनोट केवळ त्या प्रसंगापुरती मर्यादित नाही. तर आजही आपले डोळे उडते.

नोकरी असो, करिअर असो वा अन्य कौटुंबिक वाद… कारण कोणतंही असलं तरी त्याकडे बघण्याची दृष्टी आणि आत्महत्येपर्यंतचा पोहोण्याचा निर्णय हा अत्यंत संवेदनशील विषय त्या कागदांमध्ये मांडण्यात आला होता.

ज्येष्ठ समाजसेविका डॉ शीतल आमटेंच्या आत्महत्येने आज महाराष्ट्रात खळबळ माजली असली तरी त्यानिमित्ताने या विद्यार्थ्याने सुसाईडनोटमधून मांडलेली व्यथा आपले डोळे उघडते.

नोकरी मिळवण्यात अपयश येत असल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे त्याने लिहिले होते. याबद्दल त्याने आपल्या आई-वडिलांची देखील माफी मागितली.

त्याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या पत्रानुसार त्याला परीक्षेत कमी मार्क मिळाल्याने त्याला चांगली नोकरी मिळू शकत नाही आणि म्हणून तो आत्महत्या करत आहे. कारण या जगात अपयशी व्यक्तीला काहीही किंमत नसते.

एम. टेक. फायनलमध्ये शिकणाऱ्या मार्क अँड्र्यू चार्ल्सने मंगळवारी होस्टेलच्या रूममध्ये पंख्याला लटकवून गळफास घेतला होता.

बराच वेळ त्याचा काहीच पत्ता नसल्याने त्याच्या मित्रांनी त्याच्या खोलीचा दरवाजा तोडला तेव्हा तो पंख्याला लटकलेला होता.

मार्क वाराणसीचा रहिवाशी होता.  मार्क्सच्या डायरीमध्ये जी सूसाइड नोट लिहिण्यात आली होती, त्यामध्ये त्याने म्हटले होते की, कदाचित मला चांगले मार्क्स मिळणार नाहीत आणि या जगात अपयशी लोकांना काहीही किंमत नसते. त्याने आपल्या पालकांची देखील माफी मागितली होती.

 

actors inmarathi

 

त्याने लिहिले होते की,

“तुमच्या त्यागाचे मी योग्य मोल देऊ शकलो नाही. अशा पद्धतीने तुम्हाला खाली मन घालायला लावून मी चूक केले. मी तुम्हाला कधी निराश करेन आणि या पद्धतीने स्वतःला संपवेन असे मलाही वाटले नव्हते. परंतु, माझी आठवण काढू नका. मी त्या लायकीचा नाही. पण ते खूप चांगले आई-वडील आहेत आणि त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.”

अंकित, राज्जो, या आपल्या दोस्तांची नावे घेऊन त्याने असे देखील लिहिले आहे की, आयटी इंडस्ट्रीत काम करता करता जगायचे विसरू नका. आयुष्य एकदाच मिळते हे नेहमी लक्षात ठेवा.”

आयआयटीने देखील याप्रकारे विद्यार्थ्याने केलेल्या आत्महत्येबद्दल खेद व्यक्त केला.

पोलिसांच्या मते, त्याला ताण सहन न झाल्याने आणि तो प्रचंड विमनस्क अवस्थेत असल्यानेच त्याने आत्महत्या केली असावी.

त्याच्या मित्रांनी पोलिसांना कळवताच पोलीस तिथे पोहोचले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी त्यांनी स्थानिक सरकारी दवाखान्यात पाठवला आणि आत्महत्येच्या गुन्ह्याची केस दाखल करण्यात आली आहे.

 

actors inmarathi

 

हैद्राबादमध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. अलीकडच्या काही महिन्यात हैद्राबादच नव्हे तर तेलंगणा परिसरातील जवळपास ५० विद्यार्थ्यांनी माध्यमिक परीक्षा नापास झाल्याच्या कारणावरून आत्महत्या केल्या आहेत.

काही काही घटनांमध्ये जेइई परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकलो नाही म्हणून आणि त्यामुळे आयआयटीमध्ये प्रवेश मिळाला नाही म्हणून देखील विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

आता विचार करा, की ज्येष्ठ समाजसेविका डॉ शीतल आमटे यांच्याबाबत अपयश हा प्रश्नच उरला नव्हता. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात, डॉ विकास आमटे यांची कन्या, डॉ प्रकाश आमटे यांची पुतणी अशा सशक्त कुटुंबातली या कन्या. समाजसेवा हा संस्कार बालपणी रुजलेला.

समाजसेवेचे बाळकडु मिळाल्याने नंदवनातील महारोगी सेवा समितीच्या सीईओ ही भुमिका त्या उत्तमरित्या वठवत होत्या याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे करिअरमध्ये अपयश ही बाब त्यांच्याबाबत निर्माण होण्याचा प्रश्न नाही. तरिही वयाच्या चाळीशीत त्यांनी हा निर्णय घेतला याचाच अर्थ इतरही अनेक प्रश्न, समस्या आपल्याही नकळत भोवती रुंजी घालतात.

चांगले आयुष्य जगण्यासाठी चांगली नोकरी हवी आणि चांगली नोकरी हवी असेल तर चांगले शिक्षण हवे, हे सूत्र या पिढीच्या डोक्यात इतके फिट्ट बसले आहे की, शैक्षणिक अपयश ही एक यांना एक फार भयानक गोष्ट वाटते.

शिक्षण हे आनंदी जगण्याचे साधन बनण्याऐवजी ते प्रचंड स्पर्धेचे क्षेत्र बनलेआहे.

ताण प्रत्येकाला येतो. पण, म्हणून आयुष्य संपवणे हा काही त्यावरचा एकमेव मार्ग असू शकत नाही. शिक्षण-नोकरी या दोन टोकांच्या पलीकडेही आयुष्यात बऱ्याच गोष्टी असतात.

आई-वडील असतात, भावंड असतात. मित्र-मैत्रिणी असतात, आपल्या आयुष्यातील बर्या वाईट गोष्टी वाटून घेण्यासाठी इतक्या लोकांचा आधार असताना स्वतःला लोकं एकटं का समजतात. ताण फार खोलवर रुजण्याआधीच तो बोलून मोकळं का होत नाहीत?

 

Depressed-businessman-inmarathi

 

सगळ्यात जास्त ही तरुणाई या डिप्रेशन आणि उदासीनतेच्या रोगाला बळी पडत आहे आणि हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे. अपयशाचे तोंडही पहिले नाही असा कोणी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही.

अपयश आले म्हणजे सगळ्या वाटा बंद झाल्या असा याचा अर्थ होत नाही. ताणतणावाचे व्यवस्थापन करून आहे त्या परिस्थितीवर काही विधायक सकारात्मक उपाय शोधणे हे शहाणपणाचं लक्षणं असतं.

क्षुल्लक गोष्टीवरून जीव संपवण्याआधी एकदा आपले आई-वडील, आपली भावंड, आपले मित्र-मैत्रिणी यांचे चेहरे आठवा.

लहानाचा मोठा करून वाढवलेल्या आई-वडिलांच्या जीवाला किती यातना होतील याची कल्पना करा. आपण, प्रयत्न न करताच याप्रकारे त्यांना दुःखात टाकून जाने कितपत योग्य वाटते याचाही विचार करा.

एखाद्या प्रसिद्ध व्यक्तींने केलेली आत्महत्या किंवा परिचितांबाबत घडलेली दुर्घटना यानंतर आपण त्या घटनेकडे गांभिर्याने पाहतो. त्यावर विचार करतो, चर्चा करतो, हळहळतो, मात्र सहानुभुतीपेक्षाही त्याच्या कारणांवर विचार होणं गरजेचं आहे. अशी मनमोकळी चर्चा घडली तर भविष्यातील अनेक दुर्घटनांना आपण रोखण्याचा किमान प्रयत्न करु शकू.

म्हणूूनच एक लक्षात ठेऊयात. आयुष्यातील प्रत्येक समस्येवर काही ना काही तोडगा निघतोच. आपल्या जवळच्या व्यक्तींशी यावर बोलून पहा. महत्वाचं म्हणजे, “आयुष्य एकदाच मिळतं ते जगायला विसरू नका!”

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?