' गॅस एजन्सीकडून लूट होतीये? या नागरिकाचा मार्ग सर्वांनी शिकायला हवा!

गॅस एजन्सीकडून लूट होतीये? या नागरिकाचा मार्ग सर्वांनी शिकायला हवा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

गॅस एजेन्सीकडून ग्राहकांना लुटले जाणे हा काही नवीन प्रकार नाही. आपल्यापैकी अनेकांनी याचा अनुभव घेतला असेल. गॅस शेगडीसाठी वेगळे किंवा जास्तीचे पैसे घेणे, शेगडीचा न देणे वगैरे मार्गांनी ही फसवणूक होत असते.

गॅस एजेन्सीचे नियम माहित नसलेले ग्राहक कंपनी जे सांगेल ते मान्य करतात. 

खरेदी करताना सजग राहिले तर ही फसवणूक टाळणं काही अवघड नाही हे एका जागरूक ग्राहकाने दाखवून दिले आहे.

 

gas inmarathi

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हे ही वाचा –

===

 

सातारा येथे राहणाऱ्या सुचिकांत वनारसे यांनी त्यांच्या गॅस खरेदी प्रक्रियेबद्दल सविस्तर लिहिले आहे. त्यांचा लेख इनमराठीच्या वाचकांसाठी देत आहोत..

साताऱ्यात फ्लॅट भाड्याने घेतल्यावर, नवीन गॅस कनेक्शनसाठी आम्ही तिथल्याच एका गॅस एजन्सीमध्ये विचारणा केली. पहिल्याच दिवशी तिथल्या एका वृद्ध इसमाने आणि महिला कर्मचाऱ्याने आम्हाला गॅस शेगड्या घ्याव्याच लागतील असं सांगितलं.

नंतर शेगड्या आमच्याकडून नाही घेतल्या तरी बाहेरून घ्या आणि पावती आमच्याकडे जमा करावी लागेल असा नियम सांगितला.

गॅस एजन्सीचे लोक शेगड्या गळ्यात मारतातच, हे तर आपण गेली अनेक वर्षे पाहत आहोत.

त्यामुळे तिथे जास्त वाद न घालता मी फेसबुकवर पोस्ट केलं, की असा काही नियम आहे का? उद्देश होता, लोकांनी यातून मार्ग सुचवावा तसेच इतरांचे अनुभव काय आहेत, किती कॉमन इशू आहे? याची चाचपणी करणे.

बहुतेकांनी असा काही नियम नाही पण एजन्सीवाले लोक गळ्यात मारतात म्हणून प्रतिसाद दिला. काहींनी ऑनलाईन बुकिंगचा सल्ला दिला.

 

indane inmarathi

 

ऑनलाईन बुकिंग केलं तर माझा प्रश्न सुटेल पण इतरांचे काय? ज्यांना माहिती नाही त्यांची अशीच यापुढे लुट होणार असा विचार मनात आला आणि आता यावर एजन्सीकडूनच मूळ सरकारी किमतीत कनेक्शन घ्यायचं ठरवलं.

प्रथम ट्वीटरवर एचपी च्या हँडलवर, माझी तक्रार सांगितली आणि पंतप्रधान-नरेंद्र मोदी आणि पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना सीसी मार्क केलं.

एकूणच @MoPNG_eSeva चे सर्व ट्विट्स बघितल्यास समजेल की, मी इतर कुणाला सीसीमध्ये नसतं ठेवलं तरी चाललं असतं.

To : @HPGasIndia @HPCL
Cc : @narendramodi @dpradhanbjp

Hi
I went to buy new gas connection from local HP gas dealer – Satara, Maharashtra. Dealer is asking me to buy Gas stove as well, saying it’s mandatory, which is not correct. Pls look in to this.

यावर ईसेवा वाल्यांकडून खालील प्रतिसाद मिळाला.

@MoPNG_eSeva
Meanwhile also help us with your contact number and the name of agency

 

gas agency inmarathi

 

हे ही वाचा –

===

 

यानंतर त्यांनी मला खालील माहिती दिली :

For further assistance in your case we request you to contact HPCL PUNE LRO on the following nos with full details,
Customer Service Cell – 020 – 26213104 / 26213105 / 26213020
Field Officer – GANESH KASHINATH KARWAR – 8547869331

इकडे मला एजन्सीमधून फोन आला : कशाला तुम्ही वर तक्रार केली, तुम्ही आणा सर्व कागदपत्रे तुम्हाला शेगड्या घ्यायची गरज नाही.

माझी कागदपत्रे तयार नव्हती त्यासाठी ६-७ दिवस गेले. पुन्हा आम्ही एजन्सीत गेलो तर यावेळी आम्हाला त्याच व्यक्तींनी जुन्या शेगडीची पावती आणावी लागेल म्हणून आडवं लावलं.

आम्ही म्हणालो शेगडी १२ वर्षे जुनी आहे, त्याची पावती कुठून आणणार?

मग मी वर नंबर दिलेल्या गणेश कारवार यांना फोन केला. त्यांच्याकडे तक्रार केली. त्यावर त्यांनी सांगितलं अशी कोणत्याही पावतीची गरज नसते. फक्त माणूस सर्वेक्षण करायला येतो त्याचे १७० रु. द्यावे लागतात.

 

gas-line-inmarathi-

 

पुन्हा विनिताला गॅस एजन्सीत जावं लागलं, यावेळी एजन्सीवाला माणूस चिडला होता. अतिशय Attitude दाखवून बोलला.

कारवार यांच्याकडून फोन गेल्यामुळे एजन्सीवाल्याची मात्रा चालली नाही, उद्या माणूस शेगड्या चेक करायला येईल म्हणून नवीन कनेक्शन फॉर्म भरून घ्यावा लागला.

आता आज शेवटी माणूस शेगड्या चेक करून गेल्यावर एजन्सीतून फोन आला आणि ३७०० रु. भरा म्हणून सांगितले. मी थोडा विचार केला आणि गुगल करून किती पैसे लागतात चेक केलं. साधारण २९०० रु. लागायला हवेत हे कोरावरून समजलं.
मी एचपी सपोर्टशी चाट करून नक्की किंमत किती आणि ब्रेक अप कसं आहे हे विचारून घेतलं, खाली दिलंय.

Security Deposit for 1 Cylinder (14.2 kg) RS 1450

Security Deposit for Pressure Regulator RS 150

Documentation Charges for serving LPG consumers RS 88.50

Installation/Demonstration charges RS 118

Blue Book Charges (DGCC cost) RS 59

Suraksha LPG hose (Rubber Tube) Charges 1.5 Mtr – Rs 190/-12:04

Hotplate Inspection charges of 2 Burner RS 177/-

मग मी पुन्हा कारवार यांना फोन केला आणि एजन्सीवाला ३७०० रु. मागतोय म्हणून तक्रार केली.

 

ujwala inmarathi

 

३७०० रु. सिंगल सिलेंडरसाठी लागत नाहीत असं त्यांनीपण स्पष्ट केलं. तुम्ही एजन्सीत जा आणि एजन्सीवाल्याला ३७०० रुपयांचे ब्रेकअप मागा म्हणून त्यांनी सांगितलं.

पुन्हा विनिता गॅस एजन्सीमध्ये गेली असता, तिच्यासमोरच कारवार यांचा गॅस एजन्सीवाल्याला फोन आला आणि एजन्सीवाल्याला त्यांनी त्यांच्या भाषेत सांगितले असावे.

एजन्सीवाला विनिताला म्हणाला चुकून एजन्सीमधून तुम्हाला ३०३७ च्या जागी ३७०० सांगितले गेले.

चुकून ७०० रु. जास्त मागता? लाज नाही वाटत या लोकांना? यानंतर मी एजन्सीने दिलेल्या नंबरवर गुगल पे ने पैसे भरून कनेक्शनची प्रक्रिया पूर्ण केली.

आपल्यासारख्या मध्यमवर्गीय लोकांना अशाच पद्धतीने लुटले जाते. गॅस शेगड्या घ्या, आमच्याकडूनच घ्या, बाहेरून घेतल्या तर पावती आणा, अमुक इतकेच पैसे भरा, या सर्वात आपल्याकडून किती पैसे जास्त घेतले जातात?

 

money-inmarathi

 

शिवाय एजन्सीवाल्यांची अरेरावी असते ती वेगळी. एजन्सीवाल्याला पक्कं माहिती होतं की, तो झ्योल करतोय त्यामुळेच शेवटी तो विनिताला म्हणाला मॅडम ते twitter वर काय टाकलंय ते डिलीट करा ना.

 

तुम्हीपण सर्वांनी लक्षात ठेवा, ट्विटर, ईमेलचा सढळ हाताने उपयोग करून असल्या भ्रष्टाचारावर आळा घाला. प्रत्येक ठिकाणी सरकारच्या नावाने बोटे मोडण्यात काही अर्थ नाही.

(सर्व फोटो प्रतीकात्मक आहेत)

===

हे ही वाचा –

===

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “गॅस एजन्सीकडून लूट होतीये? या नागरिकाचा मार्ग सर्वांनी शिकायला हवा!

 • July 10, 2019 at 9:29 pm
  Permalink

  very busy

  Reply
 • July 13, 2019 at 7:23 am
  Permalink

  ekdam mast

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?