' तुम्हाला या ५ वाईट सवयी नसतील तरच यशस्वी 'बिझनेस' करू शकाल!

तुम्हाला या ५ वाईट सवयी नसतील तरच यशस्वी ‘बिझनेस’ करू शकाल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

यशस्वी उद्योजक होण्यासाठी तुम्हाला पोषक वातावरण आणि सकारात्मक मानसिकता असणे गरजेचे आहे. खाली दिलेल्या लक्षणांपैकी काही लक्षणे जर तुमच्यात असतील तर, तुम्ही कधीच व्यावसायिक बनणार नाही.

सध्याच्या काळात स्टार्टअप उद्योग प्रचंड वेगाने वाढत आहेत. स्टार्टअप उद्योजक असणं आता प्रतिष्ठेचं मानलं जातंय. परंतु, स्टार्टअप उद्योजक होणं ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही.

छोट्या छोट्या गोष्टी साध्य करण्यासाठी देखील भरपूर संयम आणि उर्जा असावी लागते.

थोडक्यात सांगायचं झाल्यास उद्योजक होणं हा असा प्रवास आहे ज्यासाठी काही लोकांची अजिबात तयारी नसते.

 

business plan inmarathi

 

तुमची नोकरी सोडून तुम्ही स्टार्टअप उद्योग करू शकत नसाल, तर त्यामागे ही काही करणे असू शकतात.

१. तुम्हाला कुणाचा पाठींबा न मिळणे –

उद्योगपती म्हणून यश मिळवण्यासाठी तुमच्या मागे भक्कम पाठबळ असावं लागतं. तुमचे कुटुंबिय, नातेवाईक, मित्र यांना तुम्ही घेतलेल्या निर्णय तडीस नेण्यास पाठींबा दिला पाहिजे तसेच, त्यासाठी तुमचं मनोधैर्य वाढवलं पाहिजे.

उद्योजक होण्यासाठी तुम्हाला व्यावसायिक आणि वयक्तिक मार्गदर्शन करणारे गुरु हवेत. पहिला पाठींबा हा घरातून सुरु होतो.

तुम्हाला जर तुमच्या कुटुंबियांचा, विशेषतः तुमच्या जोडीदाराचा पाठींबा नसेल तर, तुम्ही व्यवसायाच्या बाबतीत कोणताही ठोस निर्णय घेऊ शकणार नाही. तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला प्रोत्साहन देत नसल्याची खंत तुम्हाला सतत सतावत राहिल.

तुम्ही जर अपयशाला घाबरत असाल तर, तुम्ही कधीच यशस्वी उद्योजक होऊ शकत नाही. व्यवसाय करत असतना तुमच्या पाठीमागे जर भक्कम पाठबळ नसेल तर तुम्ही सतत अपयशाची भीती बाळगाल.

म्हणूनच तुम्हाला हे माहित असणं आवश्यक आहे की, तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तींचा तुमच्यावर विश्वास हवा.

 

indian family support inmarathi

 

२. तुम्हाला पगारावरच अवलंबून राहण्याची सवय असेल तर –

नव्याने स्टार्टअप सुरु केल्यानंतर जर तुमच्याकडे इतर कर्मचारी काम करत असतील तर, व्यवसायातून मिळणारे पैसे थेट तुम्हाला न मिळता आधी त्यांना द्यावे लागतील. कदाचित यामुळे काही दिवस किंवा महिन्यांसाठी तुमच्या हातात पैसे येणार नाहीत.

पण तुम्हाला जर ठराविक आकड्याचा चेक महिन्यातून एकदा घेतल्याशिवाय चैन पडणार नसेल तर, तुम्ही उद्योजक होऊ शकत नाही. नव्या उद्योजकांनी कमीत कमी काही दिवस आपल्याला मिळणाऱ्या फायाद्याचा विचार न करता काम करत राहिले पाहिजे.

 

salary inmarathi
the financial express

 

३. तुमच्यात नवीन कल्पना शिकण्याची इच्छा नसेल –

अनेक उद्योजक सुरुवातीला, आपल्या कौशल्याचा वापर करून स्टार्टअप पटकन सुरू करतात. आपल्याकडे असणार्या कौशल्याच्या बळावर बर्यापैकी जम बसवू शकतो असे त्यांना वाटते.

फक्त मार्केटिंग स्कील आहे म्हणून किंवा डेव्हलपमेंट स्कील आहे म्हणून तुम्ही वयवसाय करू शकता असा जर तुमचा समज असेल तर तुम्ही गाढ झोपेत आहात.

 

ratan tata inmarathi

 

तुम्हाला नवनव्या गोष्टी शिकण्यात रस नसेल तर तुम्ही कधीही यशस्वी उद्योजक बनू शकत नाही.

मला जे जमत मी फक्त तेच करणार आणि इतर कामांसाठी मी कर्मचार्यांवर अवलंबून राहणार किंवा इतर कामं कर्मचारी सांभाळतील अशी जर तुमची वृत्ती असेल तर तुम्ही उद्योजक बनू शकत नाही. उद्योजक बनण्यासाठी नवनवीन गोष्टी शिकाव्या लागतात.

एक संस्थापक म्हणून तुम्ही सुरु केलेल्या व्यवसायात काय आवश्यक आहे शिकल पाहिजे, नवीन काय करता येईल या गोष्टी शोधणे आणि त्या आत्मसात करने हा गुण जर तुमच्या जवळ नसेल तर, तुम्ही उद्योजक बनू शकणार नाही.

प्रसंग ओढवल्यास जी कामे येत नाहीत ती शिकून घेऊन करण्याची तयारी हवी.

 

innovation inmarathi

 

४. आपणच आपले बॉस या मिथकावर तुमचा विश्वास असेल तर –

आपण उद्योजक आहोत म्हणजे आपला कोणी बॉस नाही आपण स्वतःसाठीच फक्त काम करतो असा जर तुमचा दृढ समज असेल तर, तुम्ही कधीही उद्योजक बनू शकणार नाही.

तुम्ही जरी स्वतःचा व्यवसाय सुरु केला असला तरी, तुम्ही फक्त स्वतःसाठी काम करत नसता तर, तुम्ही तुमचे गुंतवणूकदार, तुमचे व्यवसायातील भागीदार आणि जर तुमच्याकडे कर्मचारी असतील तर, तुम्ही त्यांच्यासाठी काम करता असता, स्वतःसाठी नव्हे.

उद्योगासाठी भांडवल म्हणून कुणाकडून तरी तुम्ही पैसे घेता, कुणी तरी तुमच्या उद्योगात भागीदार होण्यासाठी पैसे गुंतवलेले असतात, व्यवसाय करताना सर्व गोष्टींची जबाबदारी तुमच्यावर असते.

तुम्ही स्वतः सगळ्यात शेवटी पगार घेता, सगळे घरी गेल्यावर मग तुमची सुट्टी होते. जबाबदारीचा सगळा भर तुमच्या एकट्याच्या खांद्यावर असतो.

आणि सगळ्यात महत्वाशी गोष्ट काही लोकांना वाटते की आपण व्यवसाय सुरु केलाय तर आपल्या फावल्या वेळेत काम करता येईल परंतु तसे शक्य नसते.

 

bossing inmarathi
the tribune

 

इथे स्वातंत्र्य मिळत असले तरी, त्याची किंमत चुकवावी लागते

 

५. तुमच्याकडे व्यावहारिक दृष्टीकोन नसेल तर –

प्रत्येक उद्योजकाकडे हा गुण हवाच. काही लोकांना असे वाटते की पारंपरिक व्यवसायातील खाचाखोचा जाणून घेण्याची काही गरज नसते. वस्तुतः हे सत्य नाही. व्यवसायावर तुमची पकड बसणे महत्वाचे असेल तर, तुम्ही जी सेवा किंवा वस्तूचा व्यवसाय करू इच्छिता त्याभोवतीच तुमचा व्यवासाय उभा राहायला हवा.

सुरुवात करण्यापूर्वी तुमच्याकडे निश्चित योजना आहेत का? काही चुका झाल्यास त्यातून बाहेर कसे पडायचे याचे काही नियोजन केले आहे का? एक व्यावसायिक म्हणून सुरुवात करण्यापूर्वी या गोष्टी तुम्ही पडताळून पाहणे गरजेचे आहे.

तुमच्या कडे ग्राहक कसे आकर्षित होतील आणि त्यातून तुमची मिळकत कशी वाढेल आणि तुम्ही एका व्यहारातून किती नफा मिळवू इच्छिता या गोष्टी तुम्हाला स्पष्ट माहित असायला हव्यात. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जर तुमच्या जवळ नसतील तर, व्यवसाय सुरु करण्यापूर्वी तुम्हाला थोडा अभ्यास करावा लागेल.

 

business meeting inmarathi

 

व्यवसायाचे विविध पैलू समजून घेण्यासाठी जे जे करता येईल ते ते करा. थोडेफार वाचन करा आणि तुमचे प्रतिस्पर्धी त्यांचे उत्पादन बाजारात आणण्यासाठी कोणत्या क्लृप्त्या वापरतात याचा देखील अभ्यास करा.

अर्थ तज्ञांशी सल्लामसलत करा. ज्यामुळे तुम्हाला पैसा कितपत आणि कसा लागेल हे कळेल तसेच तुम्ही तो कसा खर्च करणार याचेही नियोजन करता येईल.

उद्योजक होण्याचा हा प्रवास किती कठीण आहे हे तुमच्या लक्षात आले असेलच. हे गुण जर तुमच्यात असतील तर  वास्तवात तुमच्या हातून काही भव्यदिव्य घडू शकणार नाही.

 

Practical Approach
YouTube

 

उद्योजक होणे म्हणजे अंधाऱ्या बोगद्यातील प्रवास आहे जिथे वळणे कधी येतील याचाही तुम्हाला अंदाज नसतो. तुम्हाला धोका पत्करायचा नसेल आणि परिचयाच्या वातावरणातून बाहेर पडण्याची इच्छा नसेल तर तुमच्यात उद्योजक होण्यासाठीचे आवश्यक गुण अजिबात नाहीत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “तुम्हाला या ५ वाईट सवयी नसतील तरच यशस्वी ‘बिझनेस’ करू शकाल!

 • July 6, 2019 at 12:52 am
  Permalink

  Hike in diesel price effect on everyone those who r middle class n also transportERS

  Reply
 • September 4, 2019 at 10:20 pm
  Permalink

  अतिशय सुंदर आहे..

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?