'भारतीय रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर मागच्या बाजूला "X" का लिहितात? जाणून घ्या...

भारतीय रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर मागच्या बाजूला “X” का लिहितात? जाणून घ्या…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

तुम्ही कधी रेल्वेने प्रवास केलाय का? असे कुणी विचारले तर तुम्हाला वाटेल काय चेष्टा करताय का? रेल्वेचा प्रवास तर अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडतो.

भारतात तर रेल्वे ही देशाची जीवनवाहिनी आहे. विस्तीर्ण प्रदेशात विस्तारलेल्या, अनेक राज्ये, भौगोलिक प्रदेश यांना जोडणारा हा महत्वाचा दुवा आहे.

या रेल्वेच्या बाबतीत अशा अनेक गमतीशीर गोष्टी आहेत की ज्या आपल्याला माहित नसतात.

 

train inmarathi
dontgetserious

 

जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल किंवा केला असेल तर, रेल्वेच्या सगळ्यात शेवटच्या डब्यावर मोठा X लिहिलेला असतो, हे तुम्ही पाहिलंय का?

नसेल तर पुढच्यावेळी जेंव्हा तुम्ही रेल्वेने प्रवास कराल तेंव्हा नक्की पहा. रेल्वेच्या सगळ्यात शेवटच्या डब्यावर हा X का लिहिला जातो? या X चा नेमका अर्थ काय? हे लिहिण्यामागे नेमके काय कारण असते जाणून घेऊया.

रेल्वेच्या सगळ्यात शेवटच्या डब्यावर X लिहिलेले असते आणि त्याच्या खाली LV ही अक्षरे लहिलेली एक पाटी लटकवलेली असते.

या अक्षराच्या खालीच एक लाल दिवा देखील असतो. आता ही अक्षरे लिहीण्यामागे नक्कीच काही तरी अर्थ असला पाहिजे.

 

x train inmarathi
newindianexpress.com

 

ज्या डब्याच्या पाठीमागच्या बाजूला X लिहिलेले असेल तो डबा त्या रेल्वेचा शेवटचा डब्बा असतो.

ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर जेंव्हा हे अक्षर दिसेल तेंव्हा स्टेशन मास्तरला संकेत मिळतो की या ट्रेनचे सर्व डब्बे जोडलेले असून ती ट्रेन आता स्टेशन मधून बाहेर पडण्यास सज्ज आहे.

त्या रेल्वेचा कोणताही भर स्टेशन मध्ये राहिलेला नाही असा त्याचा अर्थ होतो.

एक गाडी जेंव्हा स्टेशन मधून बाहेर पडते तेंव्हा तो दुसऱ्या स्टेशनवरून येणाऱ्या ट्रेनला अनुमती म्हणजे लाईन क्लीअर देण्यासाठी निघून जातो. दोन स्टेशन मध्ये जे अंतर असते त्याला ब्लॉक सेक्शन म्हणतात.

दिवसा X अक्षर सहज दिसू शकते पण, रात्री ते दिसणार नाही म्हणून त्याच्या खाली लाल दिवा लावलेला असतो.

 

companies inmarathi
aanavandi.com

 

रेल्वेच्या शेवटच्या डब्ब्यावर जर हे अक्षर नसेल तर त्या ट्रेनचे काही डब्बे मागे राहिलेत आणि ट्रेनला धोका आहे असा याचा अर्थ होतो.

अशावेळी पुढील अपघात टाळण्यासाठी रेल्वे अधिकार्यांना सूचना दिल्या जातात.

यासोबत LV अशी अक्षरे असलेली एक छोटी पाटी देखील या डब्याला जोडलेली असते. पिवळ्या रंगाच्या पाटीवर काळ्या रंगात अशी अक्षरे लिहिलेली असतात.

LV चा अर्थ लास्ट व्हेहिकल (Last Vehicle) असा होतो. गाडी सुटताना गाडीच्या शेवटच्या डब्ब्याला LVचा बोर्ड जोडण्याची जबाबदारी स्टेशनवर जो गार्ड असतो त्याची असते.

एक गार्ड ड्युटी संपवून गेला तरी ड्युटीवर येणाऱ्या दुसऱ्या गार्ड जवळ अशी लाईन क्लिअरन्ससाठीची पट्टी असावी लागते.

 

rail guard inmarathi
youtube.com

 

समजा एखाद्या ट्रेन ए स्टेशन वरून सुटली पण मध्येच ब्लॉक सेक्शन मध्ये तिचा एखादा भाग तुटून बाजूला झाला असेल, तर ती अर्धीच गाडी बी स्टेशन कडे रवाना होईल आणि स्टेशन बी वरून स्टेशन ए ला लाईन क्लिअरन्स दिल्यानंतर तिथून सुटणारी गाडी मध्येच तुटलेल्या आधीच्या गाडीच्या डब्ब्यावर आदळेल.

यामुळे मोठा अपघात घडून येऊ शकतो. म्हणून प्रत्येक लाईन क्लीअर देताना शेवटच्या डब्ब्यावर X अक्षर आहे की नाही हे पाहण सोबत LV अक्षरे असलेली पाटी जोडण ही खबरदारी प्रत्येक स्टेशन गार्डला घ्यावी लागते.

दिवसाच्या वेळी X सोबत LV लिहिलेला बोर्ड तर रात्रीच्या वेळी लाल लाईट असलेला दिवा असणे महत्वाचे असते.

अनेक डब्बे एकमेकांना जोडून ट्रेन बनवली जाते. हे डब्बे एकमेकांशी जोडताना त्यामध्ये जर काही त्रुटी राहिली असेल तर वाटेत हे डब्बे एकमेकांपासून अलग होऊ शकतात.

ट्रेनच्या डब्ब्यांची सख्या इतकी असते की, पाठीमागे असे डब्बेजर निखळले गेले असतील तर ड्रायव्हरला त्याची भणक देखील लागत नाही.

 

train driver inmarathi
india.com

 

मग सुटलेले डब्बे मागे सोडून गाडी तशीच पुढे निघून जाते. अशावेळी जर मागून येणाऱ्या ट्रेनला थांबण्याचे संकेत दिले गेले नाही तर अनर्थ ओढवू शकते.

यासाठी प्रत्येक स्टेशनवर शेवटच्या डब्ब्यावर X अक्षर आहे किंवा नाही याची खात्री केली जाते. यामुळे संपूर्ण ट्रेन गेले किंवा आले याची खात्री पटल्या नंतर मागून येणाऱ्या ट्रेनला लाईन क्लीअर दिली जाते.

भारतातील रेल्वे मार्गाचे जाळे प्रचंड विस्तारलेले आहे. भारतातील रेल्वेचे नेटवर्क हे आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नेटवर्क आहे.

देशाच्या विकासात भारतीय रेल्वेचे महत्व अनन्यसाधारण आहे. भारतातील रेल्वे सेवेला १६० वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. काळानुरूप यात बदल होत गेले तरी काही बाबी या जुन्याच राहिल्या. अर्थात इतक्या मोठ्या व्यवस्थेत हे होणं साहजिक आहे.

रेल्वेने प्रवास करण्याची वेळ बहुतांश वेळा आपल्या प्रत्येकावर आलीच असेल. रेल्वेमुळे दळणवळणाची सोय अगदी सुलभ झाली.

 

toy train featured inmarathi
trainto.com

 

खरे तर भारताच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत एकमेकांना जोडून ठेवणाऱ्या या रेल्वेचे कामकाज जर बिघडले तर किती गहजब होईल नाही?

पण, गेली कित्येक वर्षे आपली ही रेल्वे सेवा सुरळीतपणे दळणवळणाचे काम करतेच आहे. रेल्वेचे हे काम जितक्या सहजतेने चालते तितके ते सोपे निश्चितच नाही.

त्यामागे कितीतरी अवाढव्य यंत्रणा चोखपणे राबत असते. यातील एखादा दुवा जरी विस्कळीत झाला तरी किती अपरिमित हानी होऊ शकते याची आपल्याला कल्पना येईलच!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?