' यशस्वी झालेल्या ८ भारतीय स्टार्टअप्स बद्दल आणि त्यांच्या स्ट्रगल बद्दल जाणून घ्या! – InMarathi

यशस्वी झालेल्या ८ भारतीय स्टार्टअप्स बद्दल आणि त्यांच्या स्ट्रगल बद्दल जाणून घ्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

बिझनेस म्हंटल कि आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या समोर पहिले नुकसान हाच शब्द येतो, आणि त्यातून कुणी तरुण उद्योगधंद्यात काही नवीन करतोय असं म्हटल्यावर त्याला प्रोत्साहन देणाऱ्यांची संख्या आणखीनच कमी होते!

म्हणून खरंतर आपल्या इथे तरुण पिढी सहजरीत्या बिझनेस करायला कचरते!

पण तरीही काही जणांनी ही गोष्ट यशस्वी रीत्या पार पाडून दाखवली आणि आज त्यांनी चालू केलेले बिझनेस हे आपल्या देशातील ८ यशस्वी स्टार्टअप्स म्हणून ओळखले जातात हे किती कौतुकाचं आहे ना!

तुम्ही कदाचित युनीकॉर्न क्लब विषयी ऐकून असाल, युनीकॉर्न क्लब मध्ये अशा कंपन्याचा समावेश होतो ज्यांचे मुल्यांकन १ अब्ज डॉलर पेक्षा जास्त आहे.

विशेष म्हणजे या कंपन्या फार काही जुन्या नसतात, या नव्यानेच स्थापन होऊन अडथळयांना मागे टाकून पुढे जाणाऱ्या स्टार्ट अप्स आहेत

या लेखात आपण आघाडीच्या ८ भारतीय स्टार्ट अप्स विषयी जाणून घेऊ ज्यांचे मूल्यांकन आज एक अब्ज डॉलर पेक्षाही जास्त आहे.

 

१. उडान :

भारतीय माध्यमांतील अहवालानुसार, हा B2B ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे.. आणि सर्वात वेगाने याने १ अब्ज डॉलर चे मुल्यांकन प्राप्त केले आहे. ही कंपनी फ्लिपकार्ट मधील माजी ३ सदस्य आमोद मालवीय, सुजित कुमार आणि वैभव गुप्ता यांनी २०१६ मध्ये स्थापन केली.

 

udaan inmarathi
OfficeChai.com

 

स्थापनेनंतर केवळ २६ महिन्यात कंपनी अब्जाधीश झाली.

उडान हे उत्पादन निर्माते, ठोक विक्रेते यांना किरकोळ विक्रेत्यांना ऑनलाईन जोडते शिवाय पेमेंट आणि ट्रान्सपोर्ट (लॉजिस्टिक) सेवा देते. यांच्या २ प्लॅटफॉर्म वर एकूण १५००० पेक्षा जास्त विक्रेते आणि खरेदीदार आहेत.

 

२. लेन्सकार्ट : 

लेन्सकार्ट भारतातील सर्वात जास्त वेगाने वाढणारा आयवेअर उद्योग आहे. चष्मे, नंबरच्या काचा, लेन्स, गॉगल्स ऑनलाईन विक्रीसाठी प्रसिद्ध झाला आहे.

पियुष बन्सल यांनी २०१० मध्ये कोणत्याही अर्थ सह्हाय शिवाय सुरु केला मात्र ३५० दशलक्ष डॉलर सॉफ्टबँक व्हिजन फंड मधून मिळवले आणि १ अब्ज डॉलर चे मुल्यांकन प्राप्त करून युनीकॉर्न लिस्टमध्ये स्थान मिळवले.

 

lenskart
forum malls

 

पियुष बन्सल हे माजी मायक्रोसॉफ्ट तंत्रज्ञ आहेत. त्यांच्याच वेबसाईट वर दिलेल्या आकडेवारी नुसार साधारण १ लाख ग्राहक दर महिन्यात खरेदी करतात.

ऑनलाईन विक्रीसह त्यांनी वैशिठ्यपूर्ण रित्या फिजिकल स्टोर्स उभारले आहेत.

पहिली फ्रेम फ्री, चष्मे, गॉगल्स आपल्या घरी ट्राय करा आणि मग निवडा, आपल्या घरी नेत्र तपासणी ची सुविधा अशा वैशिठ्य पूर्ण कल्पनांमुळे आज लेन्सकार्ट या क्षेत्रात सर्वात मोठा उद्योग बनला आहे.

 

३. बिग बास्केट : 

बिग बास्केट हा ऑनलाईन किराणा, अन्न, डेअरी, बेकरी उत्पादन विक्रेता आहे. बिग बास्केट भारतातील मोठ्या शहरात सेवा देते. १८००० प्रॉड्क्टस आणि १००० ब्रॅंडस ची आपल्या वेबसाईट आणि अॅप मार्फत विक्री करते.

 

big basket inmarathi
inc42

 

यामध्ये दुध, भाजीपाला, अंडी, किराणा, बेकरी यांचा समावेश होतो. बिग बास्केट ने  मार्फत १५० दशलक्ष डॉलर ची उभारणी केली आणि १.२ अब्ज डॉलर चे मुल्यांकन प्राप्त केले.

 

४. ड्रीम ११ : 

ड्रीम ११ हा एक काल्पनिक क्रीडा मंच आहे (fantasy sports platform) ज्यावर उपयोगकर्ता हा क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, बास्केटबॉल सारखे खेळ काल्पनिक रित्या आपला संघ बनवून खेळू शकतो.

अर्थातच पैसे लाऊन आणि विजेत्यास बक्षीस रक्कम दिली जाते. २०१९ च्या सुरुवातीच्या टप्प्यात स्टेडव्ह्यू कॅपिटलकडून पैसे उभे केले गेले.

 

dream 11
kandra digital

 

युनीकॉर्न लिस्ट मध्ये असलेली ही पहिली भारतीय गेमिंग कंपनी आहे. ड्रीम ११, २००८ मध्ये हर्ष जैन आणि भावित शेठ यांनी स्थापन केली.

२०१४ मध्ये कंपनीने १ दशलक्ष नोंदणीकृत वापरकर्त्यांची नोंद केली जी २०१६ मध्ये २ दशलक्ष आणि २०१८ मध्ये २५ दशलक्ष होती.

 

५. ओयो रूम :

ओयो रूमची स्थापना २०१४ मध्ये रितेश अग्रवाल यांनी ऑनलाइन हॉटेल रूम बुकिंग सेवा म्हणून केली. २०१८ मध्ये सॉफ्टबँककडून ८०० दशलक्ष डॉलर्सची निधी मिळाल्यानंतर ५ अब्ज डॉलर्सच्या मूल्यांकनासह हा काळातील सर्वात यशस्वी व्यवसाय मानला जातो.

या क्षेत्रामध्ये भारतातील सर्वात मोठी कंपनी म्हणून ओयो रूम्सने मान मिळवला आहे.

 

oyo rooms
xerve.com

 

२०१२ मध्ये ओडिशाच्या रायगडा जिल्ह्यातील १८ वर्षीय रितेश अग्रवाल यांनी ओरव्हेल स्टे सुरू केले.

पुढील तीन महिन्याच्या कालावधीत १०० पेक्षा जास्त हॉटेल्स, अतिथी गृहे अशा ठिकाणी निवास केल्यानंतर ओरव्हेल स्टे`ज चे नामांतर ओयो रूम्स असे केले.

ओरव्हेल स्टेज सुरू करण्याच्या काही काळानंतर, रितेश अग्रवाल यांना पीटर थीलच्या थिएल फेलोशिपच्या रूपाने एक लाख डॉलर अनुदान मिळाले.

 

६. स्वीगी :

सर्वात यशस्वी ऑनलाइन खाद्य (हॉटेल मधील डिशेस) वितरण ऍप, ज्याने संपूर्ण भारतातील बाजार ताब्यात घेतला आहे. कंपनीने गुंतवणूकदारांकडून एक अब्ज डॉलर्सची गुंतवणूक वाढवली, ज्यातील एक म्हणजे टेनसेंट आहे.

 

swiggy inmarathi
startup.com

 

आज कंपनीचे मूल्य ३.३ बिलियन डॉलर्स आहे आणि युनिकॉन क्लबचे ते सदस्य आहेत.

२०१४ मध्ये जेव्हा बिट्स पिलानीचे दोन ग्रॅज्युएट्सचे श्रीहर्षा मजीटी आणि नंदन रेड्डी यांनी हे ठरवले की त्यांनी भारताची आहार शैली बदलून जीवन सोपे बनवायचे आहे – सर्व फक्त एक टॅप करून!

२०१४ मध्ये त्यांनी बेंगलोर मधील काही हॉटेल्स शी करार करून सुरवात केली. २०१५ मध्ये त्यांनी मोबाईल अॅप लॉंच केले.

 

७. बायजूस:

BYJU’S ची ऍप २०११ मध्ये बैजू रवीन्द्रन यांनी स्थापन केलेली थिंक अँड लर्न प्रा.लि. द्वारे विकसित केली गेली.

प्रशिक्षित अभियंता असलेले रवींद्रन यांनी 2006 मध्ये गणित परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठीची शिकवणी विद्यार्थासाठी सुरु केली. २०११ मध्ये त्यांनी स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन व्हिडियो द्वारे प्रशिक्षण देणारी कंपनी स्थापन केली.

४ वर्षांच्या परिश्रमानंतर बायजू`स लर्निग अॅप ची निर्मिती केली . हे अॅप त्यानंतरच्या केवळ तीन महिन्यात २० लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी डाऊनलोड केले.

२०१६ तर्फे गुगल तर्फे या ऍप ला उत्तम आत्म सुधारणा करणारे ऍप म्हणून गौरव करण्यात आला.

 

byju inmarathi
dxminds

 

२०१७ मध्ये लहान मुलांसाठी बायजू`स गणित ऍप आणि पालकांना विद्यार्थ्यांची प्रगती जाणून घेण्यासाठी केलेले पॅरेंट कनेक्ट ऍप लॉंच केले.

२०१८ पर्यंत १.५ कोटी विद्यार्थी हे ऍप वापरत आहेट यातील ९ लाख हे पेड युझर्स आहेत. हावर्ड बिझिनेस स्कूल मध्ये हि व्यवसाय प्रकरण अर्थात बिझिनेस केस म्हणून अभ्यासले जाते.

 

८. पे टीएम –

ऑगस्ट २०१० मध्ये विजय शेखर शर्मा यांनी पेटीएमची 2 दशलक्ष डॉलर्सची प्रारंभिक गुंतवणूक करून स्थापना केली. सुरवातीला फक्त प्रीपेड मोबाईल रिचार्ज आणि डीटीएच रिचार्ज सेवा देत होते नंतर २०१३ मध्ये डाटा कार्ड, लॅंडलाईन बिल पेमेंट अशा सेवा २०१३ मध्ये
समाविष्ट केल्या.

२०१४ मध्ये कंपनीने पेटीएम वॉलेट लॉंच केले आणि लगेचच भारतीय रेल्वे आणि उबरने पेमेंट ऑप्शन म्हणून पेटीएम वॉलेट समाविष्ट केले.

 

paytm inmarathi
startup.com

 

२०१५ मध्ये ऑनलाईन डील्स, वीज बिल,पाणी पट्टी अशा सेवा द्यायला सुरवात केली. २०१६ मध्ये रेल्वे तिकीट बुकिंग, सिनेमा, इव्हेंट्स, पार्क्स, विमान तिकीट बुकिंग अशा सेवा समाविष्ट केल्या.

पेटीएमचा युझर बेस ऑगस्ट २०१४ मध्ये १ कोटी १८ लाख होता तो ऑगस्ट २०१७ मध्ये १० कोटी ४० लाख झाला.

२०१७ मध्ये १० कोटी डाऊनलोड झालेले पे टीम हे पहिले भारतीय अॅप बनले. याच वर्षी कंपनीने सोने खरेदी साठी पेटीएम गोल्ड सेवा देण्यास सुरवात केली. २०१७ मध्येच पेटीएम मॉल हे ऑनलाइन मार्केट प्लेस सुरु केले.

हे बी २ सी मॉडेल वर आधारित आहे .(b2c म्हणजे विक्रेता ते ग्राहक)

तर या आठ कंपन्यांनी सातत्याने आणि चिकाटीने काम करत, बाजारात आपले अस्तित्त्व टिकवून ठेवत छोट्याश्या स्टार्टअप्स पासून सुरुवात करून आज त्या करोडोंच्या घरात नफा कमवत आहेत.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?