' अवघं २६ वर्षे वय असलेली चंदीगडची चहा विक्रेती ऑस्ट्रेलियाची “बिजनेसवुमन ऑफ द इयर” बनली! – InMarathi

अवघं २६ वर्षे वय असलेली चंदीगडची चहा विक्रेती ऑस्ट्रेलियाची “बिजनेसवुमन ऑफ द इयर” बनली!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

आपण ज्या क्षेत्रात स्वतःला झोकून देऊ शकतो, त्यात विशेष प्राविण्य मिळवू शकतो, स्वतःचाच अभिमान वाटेल असे समाजउपयोगी किंवा इतरांना प्रेरणादायी ठरणारे काम उभारू शकतो तेच असतं आपलं करिअर!

ज्या गोष्टीची आपल्याला आवड असेल आणि त्याच क्षेत्रात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असेल तर नक्कीच आपण यशस्वी करिअर करू शकतो.

तरीही, काही लोकांना डॉक्टर, इंजिनियर आणि मॅनेजर्स यापलीकडेही करीअर होऊ शकते ही गोष्टच पटत नाही.

आता चहा पिणे कुणाला आवडत नाही? परंतु, चहा-वाला होणे हे सुद्धा करिअर होऊ शकते किंवा कॉफी-मेकर हे सुद्धा करिअर होऊ शकते याचा आपण कधी विचार केला आहे का? नाही ना!

 

tea-inmarathi
heritage.com

मग अवघे २६ वर्षे वय असलेल्या उपमा विरदीची गोष्ट नक्की वाचा जिला नुकताच ऑस्ट्रेलियाचा “बिझनेसवुमन ऑफ द इअर” पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

गेल्याच आठवड्यात सिडनी येथे झालेल्या इंडियन ऑस्ट्रेलियन बिझिनेस अँड कम्युनिटी अॅवार्ड (IABCA) या भव्य सोहळ्यामध्ये तिला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

चहा विकून तिने मिळवलेले हे यश डोळे दिपवणारे आहे. अर्थातच इथपर्यंतचा तिचा प्रवासही तितकाच खडतर असला पाहिजे.

इतका मोठा पुरस्कार तिला चहासाठी मिळाला म्हणजे ती फार मोठे हॉटेल किंवा रेस्टॉरंट किंवा कॅफे चालवत नाही तर “चाय-वाली” या नांवाने ती एक ऑनलाईन स्टोअर चालवते.

वंशाने भारतीय असलेली उप्पमा खरे तर व्यवसायाने वकील आहे.

चहाबद्दल असलेल्या प्रेमापोटीच तीने ऑस्ट्रेलियामध्ये “चाय-वाली” हे ऑनलाईन स्टोअर सुरु केले आणि या चहाच्या प्रेमानेच तिला ऑस्ट्रेलियातील स्टार उद्योजक बनवलं आहे. विरदी चहा-वाली तर आहेच पण, एक प्रसिद्ध व्यावसायिक सुद्धा आहे.

 

virdi inmarathi
aust.com

भारतात तरी चहाला नाही म्हणणारा मनुष्य विरळाच! परंतु विरदीने ऑस्ट्रेलियात देखील चहाला भारताइतकीच प्रसिद्धी मिळवून दिली आहे. विरदीची चहा बनवण्याची खासियत देखील अगदी वेगळी आहे.

“चहा म्हंटल की भारतात चार लोकं तरी एकत्र येतातच. भारतात चहा हा लोकांना एकमेकांशी जोडण्याचा दुवा आहे. आनंदाचा सोहळा असो की दुखाचा क्षण कोणत्याही प्रसंगी भारतीयांना चहा हा लागतोच.

इथे ऑस्ट्रेलियामध्ये आल्यानंतर कुठे चांगला चहा मिळेल याचा मी भरपुर शोध घेतला. परंतु, भारतात मिळतो त्या दर्जाचा उत्तम चहा इथे कुठेही मला मिळाला नाही.”

विरदी सांगत होती.

दोन वर्षापूर्वी आपली नेहमीची लॉ-फर्म मधली नोकरी करत असतानाच विरदीला ही अनोखी कल्पना सुचली. तेंव्हाच तिने आपण चहाचा व्यापार सुरु करायचा हे पक्क ठरवलं.

चहा बद्दलची तिची आवड किंवा तिचं प्रेम ही तिच्या कुटुंबाकडून तिला मिळालेली देणगी आहे. विरदीला चहा बनवण्याची कला तिच्या आजोबांनी शिकवली.

 

chawali inmarathi
sbs.com.au

तिचे आजोबा आयुर्वेदिक वैद्य होते. वेगवेगळे आयुर्वेदिक मसाले घालून स्वादिष्ट आणि पौष्टिक चहा बनवण्याची कला त्यांना अवगत होती. चहाला विशिष्ट चव येण्यासाठी कोणता मसाला किती प्रमाणत वापरावा हे देखील त्यांनीच शिकवले, असे विरदी सांगते.

“माझे आजोबा आयुर्वेदिक डॉक्टर होते. त्यांच्या दवाखान्यात ते हा आयुर्वेदिक चहा नेहमी बनवायचे आणि ही कला त्यांनीच मला शिकवली.”

उन्हाळ्यात चहासाठी वापरले जाणारे मसाले आणि पावसाळ्यात चहा बनवताना वापरले जाणारे मसाले वेगवेगळे असतात हे देखील तिच्या आजोबांनी तिला दाखवून दिले होते.

ज्या-त्या ऋतूनुसार हवामानामध्ये जे बदल होतात त्याला अनुसरुन चहा बनवल्यास चहाचे फायदे मिळतात असे ती सांगते.

अगदी काही महिन्यापूर्वी वीरदीने आपल्या ऑनलाईन स्टोअर वरून हा आयुर्वेदिक चहा विकायला सुरुवात केली.

मार्केटिंग, सोशल मिडिया कॅम्पेनिंग, नेटवर्किंग सोबतच तिचे कष्ट आणि चहाचा उत्तम दर्जा यामुळे अल्पावधीतच तिच्या या चहाने चहा प्रेमींचे मन जिंकले. ज्यामुळे वीरदी हा मानाचा समजला जाणारा पुरस्कार पटकावू शकली.

 

upamma inmarathi
nation.com

“खरे तर ऑस्ट्रेलियन समाजाला चहाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीची ओळख करून देणे हे माझे खरे ध्येय आहे,” असे वीरदी सांगते.

उप्पमा “द आर्ट ऑफ चाय”चे वर्कशॉप देखील घेते. या माध्यमातून ती लोकांना परफेक्ट चहा कसा बनवायचा याचे धडे देखील देते. महत्वाचे म्हणजे तिच्याकडून चहा बनवायला शिकणे लोकांनाही आवडते.

इतके करूनही वीरदीने वकिली पेशाची नोकरी मात्र सोडलेली नाही.

दोन वर्षातच तिच्या या चहाने अनेकांना वेड लावले आहे. चहा बनवणे ही तिची आवड होती. अगदी घरी देखील कितीही पाहुणे आले तरी चहा हा उप्पमाच्याच हातचा असणार हे गणित ठरलेलं.

“मी घरी असले की माझे आई-वडील अगदी प्रेमाने माझ्याजवळ चहाची फर्माईश करतात. मला आठवतंय माझ्या भावाचं लग्न झालं तेंव्हा किमान हजारभर तरी वर्हाड मांडली आली होती आणि इतक्या जणांचा चहा मी एकटीने बनवला होता.

यावरून मला चहा बनवण्याची किती आवड आहे ते तुम्हाला कळेलच. अगदी स्कॉलरशिप घेऊन मी जेंव्हा ऑस्ट्रेलियाला गेले तेंव्हा तिथेही मी सर्वांसाठी चहा बनवायचे. चहामुळे लोकं एकमेकांशी जोडली जातात.” उप्पमा सांगते.

 

virdi upamma inmarathi
thehindu.com

भारतात चहाचे कितीतरी प्रकार आढळतात आणि भारतीय चहा हा जगभरात मिळणाऱ्या चहापेक्षा कसा वेगळा आहे, हे तिला दाखवून द्यायचे आहे.

वेलची चहा, अद्रक चहा, लवंग चहा शिवाय, वेगवेगळ्या आयुर्वेदिक औषधी घातलेला चहा. हे सर्व प्रकार ऑस्ट्रेलियन लोकांना माहिती झाले पाहिजेत असे तिला वाटते.

आज तिने सुरु केलेले ऑनलाईन स्टोअर अगदी जोमात सुरु आहे. विरदीच्या या स्टोअरवर भारतीय चहाचे वेगवेगळे फ्लेवर विकले जातात.

या स्टोअर वरून ती चहा सोबतच इतर काही वस्तू देखील विकते. जसे की, मेणबत्त्या, किटली, गाळणी आणि अगदी चहा पासून बनवलेले चॉकलेट सुद्धा तिच्या या स्टोअरवर उपलब्ध आहे.

काही दिवसांपूर्वी मेलबर्न येथे झालेल्या “टी फेस्टिवल” मध्ये देखील विरदीला आमंत्रण देण्यात आले होते. या समारंभात बोलताना ती म्हणाली की, भारतातील चहाची संस्कृती आणि चव तिला जगभर पोहोचवायचे आहे.

अर्थातच सध्या ऑस्ट्रेलियापुरता मर्यादित असणारे तिचे हे ऑनलाईन स्टोअर उद्या जगातील कानाकोपर्यात पोहोचलेले असेल.

 

chaiwali inmarathi
fnrew.com

जगभरातील लोकांना वेगवेगळ्या प्रदेशात बनवला जाणारा चहा आणि त्याची चव चाखता यावी या उद्देशानेच हा महोत्सव भरवण्यात येतो.

भारतात चहा कसा बनवला जातो आणि तिथे चहा बनवण्याची जी विशिष्ट पद्धत आहे त्याबद्दलही उप्पमा मेलबर्नच्या फेस्टिव्हलमध्ये बोलली.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?