'प्रचंड पैसे कमावलेला "ड्रग तस्कर" आणि त्याने तुरुंगातून सुटण्यासाठी केलेल्या अजब करामती

प्रचंड पैसे कमावलेला “ड्रग तस्कर” आणि त्याने तुरुंगातून सुटण्यासाठी केलेल्या अजब करामती

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

=== 

१९९४ साली प्रदर्शित झालेला ‘द शॉशँक रिडेम्पशन’आपल्या वाचकांपैकी अनेक जणांनी पाहिला असेल .

‘ऑल टाईम वॉच’ असलेल्या काही चित्रपटांपैकी एक असलेला हा चित्रपट, एका कैद्यावर जो परिस्थितीजन्य पुराव्यांच्यामुळे कैदेत आहे त्यावर आधारित आहे.तो तुम्ही कधीही बघा, तुम्हाला खिळवून ठेवतो.

 

prison break 5 inmarathi
Euronews

अलीकडेच ह्या चित्रपटातील काही गोष्टींशी सारख्या घटना उरुग्वे मधील ‘मोंन्ते विदो’ येथे घडलीय.

एक ड्रग तस्कर, ‘रॉक्को मोराबित्तो‘ उरुग्वेच्या तुरुंगातून निसटला आहे. कोण आहे तो ? कसा निसटला तो, हे आपण पाहूच!

उरुग्वेच्या गृहमंत्रालयाने दिलेल्या बातमीनुसार, ‘रॉक्को मोराबित्तो’हा त्रेपन्न वर्षाचा इटालियन ड्रग माफिया, ज्याची इटालीला प्रत्यार्पणाची कारवाई चालू होती तो तुरुंगातून निसटला.’

 

rocco morabito InMarathi

इटलीमधील खूप मोठ्या संघटित गुन्हेगारी गटाचा,’कॅलॅब्रियन एन्देरन्घेट्टा, चा बॉस ,’रॉक्को मोराबित्तो’ मोंन्टे विदो च्या तुरुंगातून, छताला भगदाड पाडून निसटला.त्याच्याबरोबर तीन इतर गुन्हेगार ज्यांचे ब्राझील आणि अर्जेंटिना ला प्रत्यार्पण होणार होते तेही निसटले.

त्यांनी दोरीच्या सहाय्याने निसटून बाजूच्या शेतातील घरात शिरकाव केला आणि घरमालकालाही लुबाडले.

मोराबित्तो हा इटली मधील कोकेन ड्रग तस्करीचा एक मोठा खेळाडू. हा माफिया ‘मिलान कोकेन किंग’ ह्या टोपण नावाने ओळखला जातो.

 

prison break 2 inmarathi
WUFT

तो १९९४ पासून पोलिसांच्या काळ्या यादीत/हिट लिस्टवर होता. आंतरराष्ट्रीय उत्तेजक द्रव्यांच्या तस्करी मध्ये तो खूप वरच्या स्थानावर होता.त्याने जवळजवळ १ टन कोकेन ची तस्करी ब्राझीलमधून इटलीत केली होती.

ज्याची किंमत तेरा बिलिअन लिरा (७.६४मिलियन डॉलर) एवढी आहे. तो इटलीतील पहिल्या पाच फरार गुन्हेगारामध्ये मोजला जातो.

तो २००१ मध्ये खोटा ब्राझीलिअन पासपोर्ट बनवून, फ्रान्सिस्को कॅपेलेतो ह्या नावाने उरुग्वे मध्ये आला आणि दक्षिण किनाऱ्यावरील पुन्त डेल इस्टे येथे एक आलिशान बंगला विकत घेऊन राहू लागला.

 

rocco morabito 1 InMarathi

 

जवळजवळ २३ वर्ष फरार असलेल्या रोक्को ला २०१७ सप्टेंबरमध्ये बायकोसह जी अंगोला देशाची नागरिक आहे, अटक झाली होती. त्यानंतर  मोंन्टे विदो येथे त्याला ठेवण्यात आलं होतं. अडीच वर्षे झाली परन्तु त्याचं इटली येथे प्रत्यार्पण झालं नव्हतं,आणि तो निसटला.

ह्या वृत्तावर प्रतिक्रिया देताना इटालियन गृहमंत्री, ‘मातीओ साल्विनी’म्हणाले, “हे अगदीच अतर्क्य आहे की इटलीकडे प्रत्यार्पण होणारा, मोराबित्तो सारखा आंतरराष्ट्रीय गुन्हेगार ,तुरुंगातून निसटला आहे.

ह्याचा नक्कीच मोंन्टे विदो शासनाला जाब विचारला जाईन आणि मोराबित्तो जिथे कुठे आहे तिथून त्याला पकडलं जाईल.”

 

prison break 3 inmarathi
MercoPress

उरुग्वे पोलिसांनी त्याची मालमत्ता जप्त केली. ह्या धाडीत १३ मोबाईल फोन,१२ बँकेची क्रेडिट आणि डेबिट कार्ड्स, दोन गाड्या ज्यामध्ये मर्सिडीज बेंझ आहे, १५० पास पोर्ट आकाराचे फोटो, काही मौल्यवान रत्ने, ५०००० डॉलर कॅश, १००००० रकमेची सर्टिफिकेट्स् आणि ९ मि मी चे पिस्तूल सापडले.

शिवाय त्याचा व त्याच्या बायकोचा पोर्तुगीज पासपोर्ट ही हस्तगत करण्यात आला.

 

rocco morabito 2 InMarathi

 

“ही खरंच वाईट बातमी आहे,”कॅलाब्रियन सिटी कटनझारो तस्करविरोधी पथकाचे मुख्य वकील म्हणाले, “ह्या घटनेसारखी घटना सगळीकडे होऊ शकते परंतु प्रत्यार्पणात लागणाऱ्या वेळामुळं आमच्यापुढील अडचणी वाढतात.

राजकर्त्यांनी दक्षिण अमेरिकेतील देशांच्या गृह मंत्रालयासोबत असे काही करार करावेत की काही वर्षांपूर्वी कोलंबिया बरोबर केला होता, ज्यामुळे केवळ ४८ तासातच प्रत्यार्पण करता येईल”

कोकेनसारख्या मादक द्रव्याच्या तस्करीने अनेक तरुण पिढ्या चुकीच्या मार्गाबर गेल्या आहेत,त्यांची भवितव्ये अनिश्चित झाली आहेत, ह्या ड्रग माफियाचे निसटणे नक्कीच ब्राझील, इटली आणि इतर दक्षिण अमेरिकेतील देशांसाठी चांगली बातमी नाही.

 

prison break 4 inmarathi
The Times

उरुग्वे आणि इटली सरकारने ह्यात तातडीने लक्ष घालून रॉक्को मोराबित्तोसारख्या गुन्हेगाराला पकडून योग्य शिक्षा देणे हे तेथील कोवळया पिढीसाठी खूप योग्य होईल..पाहू, ऐकायला मिळेलच..

आपण आशा ठेवूया.द शॉशँक रेडिम्पशनध्येही म्हटलंय, जो संवाद खूपच छान आहे-“remember red, hope is a good thing.”आपणही रॉक्को लवकर पकडला जाण्याची आशा करूया.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?