' उद्योजक बनायचंय? हे १० गुण आत्मसात केले तर यशाचं शिखर नक्की गाठू शकाल!! – InMarathi

उद्योजक बनायचंय? हे १० गुण आत्मसात केले तर यशाचं शिखर नक्की गाठू शकाल!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

त्याचं काय तो मोठा उद्योजक आहे, भरपूर पैसा आहे त्याच्याकडे. हे शब्द सर्रास आपण ऐकतो किंवा बोलतो. पण हा उद्योग काही त्याला बसून मिळाला का? किंवा त्यासाठी त्याने कमी कष्ट घेतले का?

याचा आपण सारासार विचार करत नाही, किंबहुना आपल्याला जर कोणी सांगितलं, ‘तू पण एखादा व्यवसाय सुरू कर’ तर आपण खूपच कारणं सांगून ते आपल्याला कसं शक्य नाही हे दुसर्‍याला पटवून देतो. खरंतर आपण आपल्याच मनाची समजूत काढून घेतो.

 

start-up-inmarathi

 

उद्योजक असाच जन्माला येतो का? उद्योजक असेच जन्मल्या जन्मल्या उद्योजक होतात का? नाही तर ते स्वत:मध्ये उद्योजकतेची कौशल्ये वाढवतात.

उद्योजक होण्यासाठी आपल्याला आपल्या स्वत:वर विश्‍वास ठेवणे, सहनशील असणे, आपल्यातील नकारात्मकता काढून टाकणे, कष्ट करण्याची तयारी दाखवणे आवश्यक आहे.

कधी कधी अपयश पण मिळेल पण त्यामुळे खचून न जाता परत नव्या जोमाने उभे राहिले पाहिजे. भारतीय वंशाच्या दक्षिण अफ्रिकन व्यावसायिक अतुल गुप्ता यांचेच उदाहरण घेऊया.

 

Atul-Gupta-banned InMarathi

 

सध्याच्या त्यांच्या व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात ते अपयशी झाले, पण आता ते खूप यशस्वी उद्योजक आहेत. दक्षिण आफ्रिकेतील खाणीचे ते मालक आहेत. त्याचं धैर्य हे नवीन उद्योजकांना एक धडाच आहे.

म्हणतात ना ‘स्वप्न हे नेहमी मोठं पाहावं’, पण आपण आपल्या कल्पना किंवा स्वप्नांना प्रत्यक्षात आणायला खूप घाबरतो. आपण सर्वांत पहिल्यांदा विचार करतो तो समजाचा.

मला हे करायला जमलं नाही तर समाज काय म्हणेल? लोक मला हसतील. आहे ती नोकरी सोडून नवीन काही तरी सुरू करायचं तर आपल्याकडे पुरेसे पैसे नाहीत, मला व्यवसायाचे ज्ञान नाही, मला ग्राहक मिळतील का?

 

startup 1 inmarathi

हे ही वाचा – पकोडे विक्रेता ते भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती: या उद्योजकाचा प्रवास मार्गदर्शक ठरतो

मी इतका हुशार नाही असे हजार विचार आपल्या मनात येतात आणि या सगळ्यात मोठी भीती ‘मी अयशस्वी झालो तर?’ या भीतीनेच आपण इतके खचून जातो की, व्यवसायात पाऊल टाकायलाच घाबरतो. पण असे घाबरून जाऊ नका.

स्वत:च स्वत:ला ओळखा आणि उद्योजक बनण्याचे स्वप्न बघा. त्यासाठी काही मुद्दे दिले आहेत ते वाचून तुम्ही तुमच्या कुवतीची खात्री करून घ्या.

तर मंडळी तुम्हाला यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर हे गुण तुमच्यात आहे का? याची खात्री करून घ्या. तुम्ही जरा प्रयत्न कराल तर हे कौशल्य नक्की आत्मसात करू शकाल व यशस्वी उद्योजक बनू शकाल. पाहुया तर ही कोणती कौशल्ये आहेत.

१. योग्य वेळ

तुमच्या डोक्यात एखादी कल्पना आली असेल, तुम्ही ती सगळ्यांसमोर मांडली पण आहेत, पण तुम्ही सगळ्यांना सांगत आहात की तुम्ही योग्य वेळेची वाट पाहात आहात तर तसं करू नका.

 

startup 2 inmarathi

 

अशी वाट पाहून ‘योग्य वेळ’ कधीच येणार नाही. त्यासाठी तुम्ही डोक्यात कल्पना आली की तीच योग्य वेळ समजा आणि कामाला लागा, नाहीतर वाट बघण्यातच आयुष्य संपून जाईल.

२. ग्राहक खूश होतील याची काळजी घ्या.

कोणत्याही धंद्यात सगळ्यात जास्त महत्त्व कोणाला आहे तर ग्राहकाला. ‘ग्राहक देवो भव।’ असं म्हणतात ते उगीच नाही. ग्राहकाला जर तुम्ही खूश ठेवू शकलात तर तुमचा व्यवसाय नक्कीच यशस्वी होईल.

 

business customer in happy InMarathi

 

सुरुवातीला तुम्हाला फारसा नफा मिळणार नाही, पण एकदा का ग्राहकाचा तुमच्यावर विश्‍वास बसला तर तो दुसरीकडे जाणार नाही हे नक्की.

३. नवीन शोध

तुम्ही सर्वसामान्य व्यावसायिक असाल तर तुम्ही आहेत त्यातच समाधानी असता, मिळालेल्या यशाचेच गोडवे गाता, त्याचा विजय साजरा करता, पण जर मोठा उद्योजक व्हायचं असेल तर सतत काहीतरी नवीन शोध घेतला पाहिजे नवीन आव्हाने घ्यायला तयार राहिले पाहिजे.

 

startup 4 inmarathi

 

हेच यशस्वी उद्योजकाचे कौशल्य आहे.

४. जर तुम्ही तुमच्या बॉसपेक्षा जास्त काम करत असाल

जर तुम्ही नोकरीवर आहात आणि तुमच्या बॉसपेक्षा जास्त काम करत आहात तर तुम्ही स्वत:चा व्यवसाय काढायला पूर्णपणे योग्य आहात. स्वामित्व ही तुमची मानसिकता यातून दिसते.

 

startup 5 inmarathi

 

तुम्ही कुणाच्या अंमलाखाली काम करत नाही तर तुम्हाला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी काम करत आहात हे यातून दिसून येते आणि तेच उद्योजक म्हणून आवश्यक आहे. तेव्हा आता स्वत:च्या व्यवसायाचा विचार करायला हरकत नाही.

 

५. साईडबिझनेसच वाढवा

जर तुम्ही नोकरी करत आहात आणि तरीही स्वत:चा छोटासा व्यवसाय पण वेळ मिळेल तसा करत आहात. व्यवसाय चांगला चालत आहे, पण तुम्हाला त्याकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाहीये तर वाट कशाची बघताय?

 

startup 6 inmarathi

 

तुमच्या व्यवसायातच उडी मारा आणि चांगले यश मिळवा. अजून वाट पाहात बसाल तर फसाल.

 

६. आता पुढे जाण्यासाठी काही शिल्लक नाही.

जर तुम्ही करत असलेल्या नोकरीत सर्वश्रेष्ठ पदावर आहात आणि आता तुम्हाला वाटत आहे की शिकण्यासाठी आता काही शिल्लक नाही. तुम्ही सर्व जबाबदार्‍या योग्य रितीने पार पाडत आहात तर तुम्ही नवीन पुढील आव्हानासाठी तयार व्हा.

 

startup 7 inmarathi

 

नाहीतर तुमची कुचंबणा होईल आणि वर्षानुवर्षे तेच काम करत राहाल आणि तुमच्या हुशारीचा काही उपयोग होणार नाही. तसेच आर्थिक परिस्थितीही आहे तशीच राहील.

७. तुम्ही टीव्ही पाहू शकता किंवा इतर करमणुकीच्या साधनात पण वेळ घालवू शकता, पण ते करण्याऐवजी जर तुम्ही तुमच्या व्यवसायातील भांडवल किंवा व्यवसाय कसा वाढवायचे याचा जर विचार केलात.

 

startup 8 inmarathi

 

असा विचार करत असाल की, ‘मी माझ्या कल्पना पैसे मिळवण्यासाठी वापरल्या तर?’ असा विचार तुमच्या मनात आला की ओळखा की हेच साईन आहे तुम्ही स्वत:ला सिद्ध करू शकाल. आता तुम्हाला व्यवसायात उडी घ्यायला हरकत नाही.

 

८. जर असं झालं तर

तुम्ही जर असा विचार सतत करत असाल की, ‘जर असं झालं तर काय होईल?’ तर नक्कीच तुम्ही तुमच्या अंतर्मनाप्रमाणे विचार करा आणि तसं करा.

 

startup 9 inmarathi

 

असा विचार तुम्ही करता म्हणजे नक्कीच काहीतरी उद्देश तुमच्या मनात आहे आणि तुम्ही तो साध्य करू शकता. तेव्हा पुढे जा.

अंतर्मनातील सुप्त इच्छा तुम्हाला यशस्वी बनवण्यास नक्कीच मदत करेल.

 

९. सर्वांपेक्षा वरचढ

जर सर्व मित्र, नातेवाईकांत तुम्ही विचारात पुढे असाल आणि तुम्हाला जाणवत असेल की आपल्यात काही तरी वेगळं नक्की आहे. आपण सगळ्यांच्यात वेगळे आहोत तर नक्की यावर विचार करा आणि वेगळेपण सिद्ध करा.

 

startup 10 inmarathi

 

त्यासाठी एखादा उद्योग सुरू करा तुमच्या हुशारीचा फायदा नक्की होईल आणि तुम्ही अजून वरचढ व्हाल.

१०. अंतिम

कोणताही उद्योजक असला तरी त्याच्या मनात भीती नाही असं होऊच शकत नाही. आपल्याला जर भीती, संशय वाटत असेल तर ते स्वाभाविकच आहे.

 

startup 11 inmarathi

हे ही वाचा – शून्यापासून विश्व उभारत; सामाजिक क्षेत्रात मुशाफिरी करणारा हा उद्योजक माहित नसणं हेच दुर्दैव!!

आपण आपल्या समाजात, कुटुंबातून किंवा असुरक्षिततेच्या भावनेतून घाबरत असतो, पण हे भय असत्य आहे याची जाणीव असणे आवश्यक आहे. भय वाटू नये यासाठी आत्मविश्‍वास वाढवा आणि तुम्ही तुमच्या उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करा.  जसं तुम्हाला पाहिजे तसं जीवन जगा.

या दहा गोष्टी तुमच्या स्टार्टअप साठी खूप उपयोगी पडतील. तुमच्यातील आत्मविश्‍वास वाढवतील. तर लागा तयारीला.

‘‘असेल हरी तर देईल खाटल्यावरी’ असं म्हणणे म्हणजे मूर्खपणाचं आहे.

त्यापेक्षा म्हणा  जो प्रयत्न करीत राहील त्याच्या पाठीशी परमेश्‍वर असतो. जर तुम्ही प्रयत्न करत राहाल तर तुमच्या व्यवसायात तुम्हाला नक्कीच यश मिळेल व तुम्ही मोठे उद्योजक बनाल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?