'जगातील मोस्ट वॉन्टेड महिला दहशतवाद्यांची ही यादी झोप उडवून टाकते

जगातील मोस्ट वॉन्टेड महिला दहशतवाद्यांची ही यादी झोप उडवून टाकते

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

दहशतवाद हे मानवी राक्षसाचे आधुनिक रूप! गेल्या काही वर्षांत हा राक्षस अधिकच बोकाळला आहे. दहशतवादी संघटनांच्या माध्यमातून पसरवल्या जाणाऱ्या दहशतवादाला वेळीच आळा घातला नाही तर येणारे युग हे अतिशय भयंकर असेल हे वेगळ सांगण्याची गरज नाही.

आपल्यापैकी बऱ्याच जणांचा असा समज असेल की दहशतवादामध्ये केवळ पुरुषांचा सहभाग असतो तर तुमचा हा समज पूर्णत चुकीचा आहे. कारण जगातील सर्वच दहशतवादी संघटनांमध्ये महिला देखील तितक्याच सक्रीय आहेत जेवढे की पुरुष सक्रीय आहेत.

गेल्या काही वर्षातील दहशतवादी हल्ल्यांमधून ही गोष्ट प्रकर्षाने जाणवू लागली आहे की दहशतवादी संघटनांमध्ये महिलांचा सहभाग वेगाने वाढतो आहे.

 

women terrorist inmarathi
Middle East Institute

जगातील काही खतरनाक दहशतवादी संघटनांमधील महिला देखील इतक्या खतरनाक आहेत की गुप्तहेर यंत्रणा हात धुवून त्यांच्या मागे लागल्या आहेत आणि त्यांनी या महिलांना मोस्ट वॉन्टेड म्हणून घोषित केले आहे.

हिटलिस्ट मधील बऱ्याचश्या महिला दहशतवाद्यांना जरी कंठस्नान घालण्यात या गुप्तहेर यंत्रणांना यश आले असले तरी बऱ्याचश्या धोकादायक महिला आजही मोकाट आहेत.

चला जाणून घेऊया त्यापैकी चार मोस्ट वॉन्टेड महिला दहशतवाद्यांबद्दल!

हसना अत बोलाचेन

 

most-wanted-women-marathipizza01

स्त्रोत

फ्रान्समधील पॅरिस शहरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेली हसना ही युरोपमधील पहिला महिला दहशतवादी असल्याचेही म्हटलं जात आहे.

पॅरिस हल्ल्याच्या तपासादरम्यान, जेव्हा पोलिसांनी एका अपार्टमेंटमध्या छापा टाकला, त्यावेळी तिथे हसना हजर होती. मात्र, तिने पोलिसांना शरण जाण्याऐवजी स्वत:लाच बंदुकीनं उडवलं.

हसनाने स्वत:ला गोळी मारल्याच्या वृत्ताचं फ्रान्स पोलिसांनी खंडण केलं आहे. हसनाचं लहनापण प्रचंड वेदनादायी होतं.

मात्र, तिला ओळखणाऱ्या कुणालाही असं वाटत नव्हतं की, हसना दहशतावाद किंवा कट्टरतावादकडे झुकेल. हसनाच्या भावाच्या म्हणण्यानुसार, तिने कधीच कुराण उघडून पाहिलं नाही. मात्र, ती नेहमी फेसबुक आणि व्हॉट्सअप बघायची.

 

असाता शकुर

 

most-wanted-women-marathipizza02

स्त्रोत

 क्युबामध्ये राहणारी असाता ही अनेक दहशतवादी कार्यांमध्ये सक्रीय आहे. १९७१ ते १९७३ या तीन वर्षांच्या कालावधीत असाता अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचं समोर आलं आहे.

१९७९ मध्ये एका बँक दरोडा आणि एका पोलिसाची हत्या या गुन्ह्यांमध्ये असाता शिक्षा भोगत असताना अमेरिकेतून क्युबामध्ये पळून आली. गेल्या ३० वर्षांपासून असातावर मोठ-मोठे बक्षीस जाहीर झाले आहेत.

 

समांथा ल्यूथवेट

 

most-wanted-women-marathipizza03

स्त्रोत

व्हाईट विडो या नावाने ओळखली जाणारी ब्रिटनची नागरिक समांथाला अनेक देशांचे पोलीस शोधत आहेत. समांथा प्रचंड खतरनाक महिला दहशतवादी म्हणून ओळखली जाते.

७ जुलै २००५ मधील लंडनमधील एका सार्वजनिक बसवर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात समांथासह तिचा पती जर्मेन लिंडेसचाही सहभाग होता.

२०१३ साली नायोरबीमधील शॉपिंग मॉलमधील हल्ल्यामागेही समांथाचा हात होता, असे म्हटले जात आहे. या हल्ल्यात ६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. महिलांना सुसाईड बॉम्बरची ट्रेनिंग देण्याचा आरोपही समांथावर आहे.

तशफीन मलिक 

 

most-wanted-women-marathipizza04

स्त्रोत

३१ वर्षीय तशफीन मलिक हिने तिचा पती सय्यद फारुख याच्यासोबतीने कॅलिफोर्नियातील एका कुटुंब नियोजन केंद्रावर गोळीबार करुन १४ लोकांची हत्या केली. असे म्हटलं जातं की, तशफीन ही कॉलेजमध्ये सर्वात हुशार विद्यार्थिनी म्हणून ओळखी जायची.

मात्र, याची कुठेही माहिती मिळत नाही, की तशफीन कट्टरतावादाकडे कशी आणि केव्हा झुकली.

तशफीन आणि फारुख या दहशतवादी दाम्पत्याला एक सहा महिन्यांची मुलगी आहे, या मुलीला त्यांनी फारुखच्या आईकडे सोडलं आहे.

दहशतवादाचं विश्लेषण करणाऱ्या काही जाणकारांनी असे सांगितलं आहे की, मुल जन्माला घालणं हे या दहशतवादी दाम्पत्याची रणनिती असण्याची शक्यता आहे.

मुल आहे म्हणजे तशफीन आणि फारुख हे सर्वसामान्य दाम्पत्य आहे, असा समज निर्माण व्हावा यासाठी या दोघांनी मुल जन्माला घातलं असावं, असाही जाणकारांचे म्हणणे आहे.

दहशतवादासारख्या हीन कृत्यांमध्ये महिलांचा वाढता सहभाग ही फारच चिंतेची बाब आहे. यासाठी संपूर्ण जगभर वेळीच समाज प्रबोधन केले तर कदाचित भविष्यात महिला दहशतवादी बनण्यापेक्षा त्या विरोधात लढण्यासाठी उभ्या राहतील.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?