' केवळ एका मुलीला शाळेत जाता यावं म्हणून इथे ट्रेन चालवली जाते ! – InMarathi

केवळ एका मुलीला शाळेत जाता यावं म्हणून इथे ट्रेन चालवली जाते !

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

 

दुर्गम भागात, खेड्यात राहणाऱ्या लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी किती कष्ट करावे लागतात याची कल्पना आपल्याला शहरात बसून करता येणार नाही. काही ठिकाणे तर शाळेपासून इतकी दूर आहेत की, मुलांना जवळपास ३-४ तास चालत जाण्यावाचून पर्याय नसतो. प्रगतीच्या वाटेवर असणाऱ्या भारतात देखील अशी असंख्य ठिकाणे आढळून येतील, जेथील मुलांना आज २१ व्या शतकात देखील शिक्षण मिळवण्यासाठी पायपीट कराव लागते. यापेक्षा दुर्दैव ते काय? सरकारने शिक्षणासाठी अनेक उपक्रम राबविले परंतु त्याचा या दुर्गम भागात राहणाऱ्या मुलांना काडीचाही उपयोग होताना दिसत नाही.

school children in India, kids at study, literacy, education, Indian literacy mission, children wearing uniform.

स्त्रोत

एकीकडे आपल्या देशात शिक्षणाची मारामार आहे तशी जगात इतर देशांमध्ये आहे. पण त्या इतर देशांमध्ये अश्या परिस्थितीमध्ये शिकणाऱ्या मुलांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. जेणेकरून त्यांचे शिक्षण नीट पूर्ण व्हावे. याच विषयाशी निगडीत जपानचं एक उदाहरण आम्ही सांगत आहोत. ही बातमी वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल की, इतर देशातील शिक्षण व्यवस्थेमध्ये आणि आपल्या देशातील शिक्षण व्यवस्थेमध्ये आकाश-पाताळाचे अंतर का आहे..!

जपानमधील रोज एका स्टेशनवर केवळ एका लहानग्या मुलीसाठी एक ट्रेन थांबते. या शाळकरी मुलीसाठी येथे ट्रेनला खास थांबा देण्यात आला आहे.

japan-train-stop-for-school-girl-marathipizza

स्त्रोत

उत्तर होकाइदो द्वीपच्या कामी-शिराताकी गावचं रेल्वेस्टेशन बंद करण्यात आलं होतं. कारण इथे कुणीच प्रवासी नसत. मात्र, रेल्वे प्रशासनला लक्षात आलं की, या गावातून एक लहानगी मुलगी शाळेत जाते आणि तिला ट्रेनव्यतिरिक्त कोणताही पर्याय नाही. त्यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांनी या स्टेशनवर पुन्हा ट्रेनला थांबा दिला.

japan-train-stop-for-school-girl-marathipizza02

स्त्रोत

रेल्वे प्रशासनाच्या पुढाकारामुळे या मुलीला शाळेत नेण्यासाठी आता या स्टेशनला दिवसातून दोनवेळा ट्रेनला थांबा देण्यात येतो. विशेष म्हणजे या मुलीशिवाय दुसरं कुणीही या स्टेशनवरुन ट्रेनमध्ये चढत नाही किंवा उतरत नाही. या चिमुरडीच्या शाळेच्या वेळेनुसार ट्रेनची वेळ निश्चित करण्यात आली आहे.

japan-train-stop-for-school-girl-marathipizza03

स्त्रोत

असे म्हटलं जातं आहे की, जेव्हा ही लहान मुलगी हायस्कूलमध्ये प्रवेश करुन दुसऱ्या शाळेत शिकण्यासाठी जाईल, तेव्हा ही ट्रेन रद्द करण्यात येईल. मात्र, तोपर्यंत ट्रेन सुरुच राहणार आहे.

japan-train-stop-for-school-girl-marathipizza01

जपानचे हे उदाहरण पाहून एकच गोष्ट लक्षात येते की, आपल्या देशातील प्रशासकीय यंत्रणेची अनास्था जोवर समूळ नष्ट होत नाही तोवर आपल्या देशात जपानसारखे उदाहरण दिसणे केवळ अशक्य आहे.

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?