' २०५० पर्यंत जगाची अर्ध्याहून अधिक लोकसंख्या आंधळी होऊ शकते

२०५० पर्यंत जगाची अर्ध्याहून अधिक लोकसंख्या आंधळी होऊ शकते

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

जगात इतके नानाविविध आजार आहेत की त्यातल्या कोणता आजार कधी कोणते रूप घेईल हे सांगणं तसं अवघडच! त्यात भर म्हणून की काय सतत नवनवीन आजारांचा विषाणूंचा शोध देखील लागत आहे. सध्या तरी हे आजार आटोक्यात आहे म्हणजे जास्त लोकांमध्ये ते पसरलेले नाहीत. परंतू वातावरणातील बदलामुळे आणि मानवच्या बदलत्या जीवनशैलीमुळे या आजारांचे स्वरूप हळूहळू वाढत चालले आहे. याच वाढत जाणाऱ्या आजारांपैकी एक आजार म्हणजे ‘मायोपिया’ आजार होय.

myopia-diseases-marathipizza00

स्रोत

या आजाराबद्दल तशी अजूनही लोकांबद्दल म्हणावी तितकी लोकांमध्ये जागरुकता नाही. बहुतेक जणांना तर असा एखादा आजार आहे याची कल्पना देखील नाही. पण या आजराबद्दल नुकतीच एक धक्कादायक बाबा समोर आली आहे ती म्हणजे येत्या २०५० सालापर्यंत जगाची अर्धी लोकसंख्या मायोपिया आजाराने ग्रस्त असेल.

 ‘ऑपथॅल्मोलॉजी’ या मासिकात प्रकाशित करण्यात आलेल्या एक संशोधक गटाच्या अहवालानुसार ही चिंताजनक गोष्ट उघड झाली आहे.

मायोपिया हा डोळ्यांचा आजार आहे. हा आजार झाल्यास डोळ्यांची दृष्टी कमी होते. लांबचं अंधूक दिसायला सुरुवात होते. आजार अधिक वाढल्यास दृष्टी गमावण्याचीही शक्यता वाढते.

myopia-diseases-marathipizza01

स्रोत

अमेरिकेत २००० साली मायोपिया आजारामुळे त्रस्त असणाऱ्यांची संख्या जवळपास ९० लाख एवढी होती. मात्र, तीच संख्या २०५० सालापर्यंत केवळ अमेरिकेत २६ कोटींवर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर कॅनडामध्ये २००० साली ११  लाख असलेल्या मायोपियाग्रस्तांची संख्या २०५० पर्यंत ६६ लाखांवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 पर्यावरणातील वाढता प्रदूषण आणि बदलती जीवनशैली या आजाराला कारणीभूत असल्याचं संशोधकांनी म्हटलं आहे.

myopia-diseases-marathipizza02

स्रोत

जर तुम्हाला तुमच्या लहानग्यांना या आजारापासून वाचवायचं असेल, तर त्याच्या डोळ्यांची काळजी घ्या. नियमितपणे तपासणी करत राहा. असा सल्ला ऑस्ट्रेलियातील यूनिव्हर्सिटी ऑफ न्यू साऊथ वेल्सचे प्राध्यापक केव्हिन नायडू यांनी दिला आहे.

या आजाराला वेळीच आला घालण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने स्वत:हून पुढाकार घेत स्वत:ची आणि आपल्या नातलगांची काळजी घेतली पाहिजे अन्यथा संशोधकांचे भाकीत खरे ठरण्यास जास्त वेळ लागणार नाही हे देखील तितकेच खरे!

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?