'या बाईंनी थेट 'नासा'ला कोर्टात खेचलंय... कारण वाचून हसावं की रडावं कळत नाही!

या बाईंनी थेट ‘नासा’ला कोर्टात खेचलंय… कारण वाचून हसावं की रडावं कळत नाही!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

जमिनीच्या तुकड्यावरून वाद, हाणामारी, कोर्टकचेरी, एवढंच काय अगदी खून होताना पण आपण पाहिलंय, ऐकलंय. पण, चंद्राच्या तुकड्यावरून इतक्यातच वाद उद्भवतील असं वाटलं असेल का कुणाला?

नाही ना! पण असं झालंय. टेनेसी शहरातील एका महिलेने चक्क नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (नासा) या अवकाश संशोधन संस्थेला चक्क कोर्टात खेचलंय!

टेनेसी मध्ये राहणाऱ्या या महिलेचं नांव आहे, लॉरा चीगो.

चंद्रावर पहिले पाऊल टाकणाऱ्या नील आर्मस्ट्रॉंग या अंतराळवीराने ती दहा वर्षांची असताना चंद्रावरून आणलेली माती एका कुपीत घालून तिला भेट म्हणून दिली होती असा दावा तिने दाखल केलेल्या फेडरल याचिकेत केला आहे.

 

moon dust inmarathi
inverse.com

तिच्या जवळील ही भेट तिची खाजगी मालमत्ता आहे. पण, कदाचित नासा तिला जप्त करेल या भीतीने तिने नासाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

चंद्रावरील माती असलेली ही कुपी अत्यंत दुर्मिळ असून तिची विक्री करणे सहजासहजी शक्य नाही.

“चंद्रावरील जे काही समान आहे ते सरकारच्या मालकीचे असेल असा हुकुम नासाने काढला आहे” अशी माहिती चीगोच्या वकीलांनी दिली.

“ज्या लोकांकडे अशा वस्तू असतील त्यांच्या घरावर सरकारने अक्षरशः स्वात पद्धतीने छापे टाकले आहेत. जणू काही या लोकं गुन्हेगारच आहेत. लॉराच्या बाबत असे कहीही घडू द्यायचे नाहीये.”

२०१२ मध्ये कॉंग्रेसने एक कायदा संमत केला होता, ज्यानुसार जर अंतराळवीरांनी आपल्या सोबत स्पेसशिप मधील काही वस्तू जसे की – विमान शेड्युल, वैयक्तिक लॉग किंवा चंद्रावरील काही वस्तू असतील- आणि ते त्यांनी जर घरी नेल्या तर त्या वस्तू त्यांच्या मालकीच्या असतील आणि फेडरल सरकार मात्र अशा वस्तूवरील मालकी नाकारत आहे.

 

astaunaut inmarathi
india.com

परंतु, यामध्ये “चंद्रावरील खडक आणि चंद्रावरील इतर पदार्थ” यांना सूट दिली आहे. नासाच्या एका प्रवाक्तीने मात्र या याचीकेबद्दल किंवा या याचिकेसंदर्भातील त्यांच्या भूमिकेबद्दल कोणतीही माहिती देण्यास नकार दिला.

लॉराकडे चंद्रावरील माती भरलेली ही कुपी कुठून आली?

लॉरा सांगते, १९७२ साली टॉम मुरे तिचे वडील, ऑफिसमधून घरी आले आणि तिच्या हातात एक कुपी दिली ज्यामध्ये मातेरी रंगाची कसली तरी पावडर होती.

तिची आई, डोरोथीने तिला सांगितले की, चंद्रावर पहिले पाऊल ठेवलेल्या पहिल्या व्यक्तीने, नील आर्मस्ट्रॉंगने ही भेट दिली असल्याचे सांगितले.

मिसेस चीगो सांगतात, १९२० साली त्यांचे वडील आणि मिस्टर आर्मस्ट्रॉंग हे क्वाइट बर्डमेनच्या सिनसिनाटी चॅप्टरचे या विमानचालकांच्या एका खाजगी सोसायटीचे सदस्य होते.

आर्मस्ट्रॉंग आणि मुर्रे इतके जवळचे मित्र होते की, त्यांनी मित्राच्या मुलीसाठी चंद्रावरील माती भरलेली कुपी भेट म्हणून दिली. परंतु, तेंव्हा १० वर्षाच्या लॉराला त्या त्या भेटीचे मूल्य समजले नव्हते.

 

straw inmartahi
cbcnews.com

“ती कुपी पाहून मला तेंव्हा काही फारसा आनंद झाला नव्हता,” असे ती सांगते.

अशा प्रकारे चंद्रावरील वस्तू जवळ बाळगण्याचा अधिकार नागरिकांना आहे का?

चंद्रावरुन आणल्या गेलेल्या सर्व वस्तू नासाच्या मालकीच्या आहेत, या नासाच्या वक्तव्याच्या अगदी उलट बाजू असलेला कायदा या संदर्भात बनवला गेला आहे.

२०१२ मध्ये अंतराळातील वस्तू संबधी करण्यात आलेल्या कायद्यामध्ये चंद्रावरील वस्तू संदर्भात सूट देण्यात आली आहे.

चंद्रावरील वस्तू सामान्य नागरिकांना बाळगण्याला विरोध करणारा कोणताही कायदा सध्या अस्तित्वात नाही. त्यामुळे अशा वस्तू बाळगणे हा गुन्हा नाही.” अशी माहिती मॅकहुफ यांनी दिली.

परंतु, नासाच्या इन्स्पेक्टर जनरलचे विशेष सदस्य जोसेफ गुथैन्झ यांच्या मते लॉरा यांच्या कडे असलेली ती कुपी त्यांची वैयक्तिक मालमत्ता असल्याचा त्यांनी कितीही दावा केला असला तरी, नासा कधीही त्यांच्याकडील वस्तू जप्त करू शकते.

 

NASA-inmarathi
nasa.org

अपोलो मिशनद्वारे जे काही चंद्रावरील खडक आणि माती आणली होती, त्यावर अमेरिकी सरकारचा अधिकार असल्याचे त्यांचे मत आहे.

“नील आर्मस्ट्रॉंग यांना या वस्तू अशा दुसऱ्याला भेट म्हणून देण्याचा काहीही अधिकार नव्हता.”

यापूर्वी नासाने नागरीकांकडे असेलेल्या वस्तू जप्त केल्या आहेत का? यापूर्वी देखील नासाने सामान्य नागरीकांच्या ताब्यातील चंद्रावरील वस्तूंवर आपला दावा सांगितला होता.

२०११ मध्ये देखील याचप्रकारची एक वादग्रस्त घटना घडली होती. नासातील एका माजी इंजिनियरच्या विधवा पत्नीने तिला तिच्या नवर्याने भेट दिलेले चंद्रावरील खडकाचा अगदी तांदळाच्या दाण्याच्या आकाराचा छोटा तुकडा आणि आपोलोचे उर्जाकवच विकण्याचा प्रयत्न केला होता.

ती जेंव्हा या वस्तू विकण्यासाठी ग्राहकाला भेटण्यासाठी जात होती त्याचवेळी नासाने स्टिंग ऑपरेशन करून या वस्तू जप्त केल्या होत्या.

आर्मस्ट्रॉंगने १९६९ मध्ये चंद्रावरील खडक गोळा करण्यासाठी जी बॅग वापरली होती यामध्ये अजूनही चंद्रावरील धुळीचे भरपूर कण आढळून येतात.

 

dust inmarathi
outerspace.com

काही वर्षापूर्वी सरकारने या बॅगचा लिलाव केला होता. ज्या महिलेने ही बॅगविकत घेतली तिने नंतर१.८दशलक्ष डॉलर्स इतक्या किमतीला त्या बॅगची विक्री केली.

नासामध्ये जतन करून ठेवलेले चंद्रावरील हे पदार्थ चोरीला जाण्याचा खरा धोका होता – २००२ मध्ये नासातील तीन अभ्यासकांनी जॉन्सन स्पेस सेंटर, हस्टन येथून जवळपास २१ मिलियन डॉलर्स इतक्या किमतीचे सामना गायब केले होते.

चंद्रावरून आणलेले अशा प्रकारचे २७० पदार्थ अमेरिकन सरकारने इतर देशांना भेट म्हणून दिले, इतर १५० पदार्थ गायब आहेत आणि ते कदाचित काळ्याबाजारात विकले गेले असतील अशी देखील शंका व्यक्त केली जाते.

परंतु लॉरासारख्या व्यक्तींनी जर त्यांच्याजवळील या वस्तू त्यांनी चोरलेल्या नाहित हे सिद्ध केले तर, कदाचित ते जप्त केले जाणार नाही, अशीही माहिती मॅकहुफ यांनी दिली.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?