' ११ वर्षांच्या मुलीची कमाल : लिंबू पाणी विकून कमावले तब्बल ७० कोटी – InMarathi

११ वर्षांच्या मुलीची कमाल : लिंबू पाणी विकून कमावले तब्बल ७० कोटी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लहान मुलं नेमकं काय करतील याचा अंदाज नाही हे वाक्य तुम्ही अनेकांकडून ऐकलं असेल.

घरात घातला जाणारा गोंधळ, दंगामस्ती अशी लहान मुलांची ओळख असली, तरी काही मुलं मात्र लहानपणापासून आपली वेगळी ओळख निर्माण करतात.

सध्या सुरु असलेल्या रिअलिटी शोव्दारे याची प्रचिती येतेच, त्यामुळे सध्याची पोरं फारच भन्नाट आहेत यावर आपला विश्वास बसतो.

ज्या वयात आपण फक्त रडायचो, हसायचो, खायचो, प्यायचो आणि झोपायचो त्या वयात सध्याची चिमुकली पिढी बक्कळ पैसे कमावते आहे. अगदी बिझनेस उभं करतेय असं म्हटलं तरी चालेलं.

१०-१५ वर्षाच्या पोरांना जेव्हा मोठ्या मोठ्या परिषदांमधून त्यांच्या शोधांची आणि व्यवसायाची माहिती देताना आपण आज पाहतो तेव्हा आपल्या मनातही प्रश्न येतो, ” मी असा विचार केला असता तर मी देखील वयाच्या १०-१५ व्या वर्षी फेमस आणि पैसवाला झालो असतो.”

पण त्यात आपलीही चूक नाही म्हणा! तेव्हाच वातावरण आणि आताच वातावरण खूप बदललंय. आपल्याला नसते तेवढी या चिमुरड्यांना तंत्रज्ञानाची, व्यवसायाची एकंदर जागतिक घडामोडींची इत्यंभूत माहिती असते.

आता तुम्हाला ज्या मुलीची गोष्ट सांगणार आहोत तिचचं उदाहरण घ्या. या अवघ्या ११ वर्षाच्या मुलीने केवळ लिंबू पाण्यातून तब्बल ७० कोटी रुपये कमावले आहेत. काय? चक्रावलाात ना?

 

mikaila-ulmer-marathipizza00

स्रोत

अमेरिकेतील टेक्सास मध्ये राहणाऱ्या या मुलीचं नाव आहे मिकाईला उल्मेर!

मिकाईला लहान असताना तिच्यावर मधमाशांनी दोनदा हल्ला केला होता. तेव्हापासून तिला मधमाशांची प्रचंड भीती वाटत असे. मात्र, कालांतराने मिकाईलाने मधमाशांबद्दल माहिती गोळा करण्यास सुरुवात केली.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

त्यानंतर तिला मधमाशांबद्दल एकप्रकारची ओढ, कुतूहल निर्माण झालं. तेव्हा मिकाईलाने ठरवलं की, घरात परंपरेने चालत आलेल्या लेमनेडमध्ये धने, जवस आणि मध मिसळून काय होतंय ते पाहूया आणि यातून मिकाईलने लेमनेड तयार केलं.

तिला आपलं हे पेय भयंकर आवडलं आणि त्याची विक्री करण्याची कल्पना तिच्या डोक्यात आली.

 

 

mikaila-ulmer-marathipizza01

स्रोत

त्यानंतर मिकाइलाने ‘एबीसी टीव्ही’च्या ‘शार्क टँक’ कार्यक्रमात सहभाग घेतला होता.

या कार्यक्रमात नव्या बिझनेस आयडियाजच्या साहाय्यानं पैसे जिंकण्याची संधी मिळते. या कार्यक्रमातून तिने ६० हजार डॉलरची सीड फंडिंग जिंकली आणि आपला व्यवसाय सुरु केला.

 

mikaila-ulmer-marathipizza02

स्रोत

एवढचं नव्हे तर या दरम्यान तिने जे करुन दाखवलं, ज्याची ती अनेक महिन्यांपासून वाट पहात होती.

गूगलच्या ‘डेयर टू बी डिजिटल कॅम्पेन’च्या माध्यमातून मिकाइलाने शोनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनाही आपल लेमनेड सर्व्ह केलं.

त्यांनीही या छोट्या शेफला मनमुराद दाद दिली.

 

mikaila-ulmer-marathipizza03

स्रोत

मात्र आपण तयार केलेलं हे लेमनेड इतरांपर्यंतही पोहोचावं यासाठी तिने प्रयत्न सुरु केले.

खरंतर मुलांच्या कल्पनांकडे पालकांकडून फारसं लक्ष दिलं जात नाही. मात्र तिच्या पालकांनी प्रत्येकवेळी तिला मदत केली.

होल फूड स्टोअर्ससोबत आपल्या ‘लेमनेड’ ब्रँडच्या विक्रीचा तिने करार केला आहे आणि याबदल्यात तिने ७० कोटी रुपयांची कमाई केली.

 

mikaila-ulmer-marathipizza04

स्रोत

तिचं ‘बी स्वीट’ नावाचं हे पेय उत्पादन आता टेक्सास, ओकलाहोमा, अरकन्सास आणि लुइसियाना येथील स्टोअर्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

याच्या नावाचं वैशिष्ठ्य लक्षात आलं का? मधमाश्यांबद्दलचं तिचं आकर्षण, म्हणून खास `बी’ याचा उल्लेख नावात केला गेला.

 

mikaila-ulmer-marathipizza05

स्रोत

 

संपूर्ण जगभरातून अश्या लहानग्या उद्योजकांना प्रेरणा मिळत आहे.

भारतामध्ये देखील गेल्या काही काळामध्ये अशी उदाहरणे पुढे आली आहेत आणि येणाऱ्या काळातही येतील.

भारतातील मुलांमध्येही मोठ्या प्रमाणात टॅलेन्ट आहे, त्यांच्याही कल्पना अशाच भन्नाट आहेत, मात्र त्यांना मदतीची प्रतिक्षा आहे.

त्यांना प्रोत्साहन देऊन जगापुढे आणण्यासाठी सरकारने प्रयत्न केले तर निश्चितच ही लहान मुलं देशाचं नाव मोठ करतील.आणि एवढचं नव्हे तर, भारताची येणारी पिढी ही यशस्वी उद्योजक म्हणून जगापुढे येईल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?