'टायटॅनिक बुडण्याचं खरं कारण "हिमनगाशी झालेली टक्कर" हे नाही...!

टायटॅनिक बुडण्याचं खरं कारण “हिमनगाशी झालेली टक्कर” हे नाही…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

===

टायटॅनिक म्हटलं की आठवतं ते भलंमोठं प्रचंड जहाज आणि त्या जहाजाच्या अपघातावर आधारित चित्रपट! या चित्रपटामध्ये टायटॅनिकला नेमका अपघात कसा झाला आणि ते जहाज बुडालं कसं यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

मुळात तुम्हाला हे सर्व माहित असणारच, कारण टायटॅनिक चित्रपट न पाहणारा माणूस मिळणे तसं कठीणच!

तरी ज्यांनी पहिला नसेल त्यांना म्हणून सांगतो, जहाजाच्या भल्यामोठ्या आकारापुढे जशी मुंगी भासावी तश्या समुद्रातील लहानग्या हिमानगाला धडकल्यामुळे टायटॅनिक बुडलं! हे असंच संपूर्ण जगात मानलं जातं.

“टायटॅनिक” चित्रपटात तो प्रसंग छान चितारला आहे :

 

 

टायटॅनिक चित्रपटामुळे आधीच जगात उत्सुकता चाळवलेला हा विषय अधिकच व्यापक झाला आहे. फार कशाला, १९१२ मध्ये घडलेल्या ह्या अपघाताबद्दल आजही खूप उत्साहात चर्चा होतात ह्यातच सर्व आलं!

इतिहासात घडलेल्या अनेक चांगल्या वाईट घटनांच्या बाबतीत हे घडत नाही. काही मोजक्याच घटना अश्या असतात ज्या नेहेमीच लोकांच्या उत्कंठेचा विषय ठरतात. समुद्रावर “राज्य” करू शकणाऱ्या टायटॅनिकच्या पहिल्याच समुद्र सफरीदरम्यान झालेला करुण अपघात ह्या मोजक्याच विषयांपैकी एक ठरला आहे.

ज्यात, अर्थातच, टायटॅनिक चित्रपटाचा फार मोठा हातभार आहे. ऑल थँक्स टू डायरेक्टर जेम्स कॅमरॉन आणि चित्रपटातील जबरदस्त कलाकार – लिओनार्डो डी कॅप्रिओ आणि केट विन्स्लेट !

 

titanic-marathipizza03
rogerebert.com

पण ज्याप्रमाणे प्रत्येक ऐतिहासिक गोष्टींमध्ये वेगळ्या बाजूने तर्क लावणारा एक गट असतो तसाच एक गट टायटॅनिक जहाजाच्या या अपघात कहाणीला नाकारतो आणि वेगळा अर्थ लावतो.

आपलं म्हणणं सिद्ध करण्यासाठी हा गट त्यावर रिसर्च देखील करत होता.

आणि त्यातून त्यांना सापडलेला निष्कर्ष असे दर्शवतो की

आपण आजवर जे हिमनगाचं कारण ऐकत आलोय ते अर्धसत्य आहे…!

 

titanic-sinking-reason-marathipizza00

स्रोत

एप्रिल १९१२ रोजी एप्रिल महिन्यात न्यूयॉर्कच्या दिशेने रवाना झालेल्या टायटॅनिकला जहाजाला अटलांटिक महासागरामध्येच जलसमाधी मिळाली होती. या ऐतिहासिक दुर्घटनेत १५०० पेक्षा जास्त लोकांना स्वत:चे प्राण गमवावे लागले होते.

आगीमुळे जहाजाला नुकसान पोहोचलं त्यानंतर ते हिमनगाला ठोकल्यामुळे ते अजून कमजोर होऊन बुडालं.

टायटॅनिकच्या अपघातावर संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या निष्कर्षानुसार,

टायटॅनिकमध्ये सर्वात प्रथम मागच्या बाजूला आग लागली होती. त्यामुळे ते जहाज कमजोर झाले होते. सुमारे तीन आठवड्यापर्यंत ही आग धुमसत होती. यावर कोणी लक्ष दिलं नाही.

जहाजाच्या ज्या भागात आग लागली होती, तीच कमजोर बाजू हिमनगाला ठोकली गेली आणि त्यामुळे जहाज बुडाले.

 

titanic-marathipizza

स्रोत

जहाजात आग लागण्याचा हा निष्कर्ष जहाजामध्येच दिसलेल्या ३० फूट उंचीच्या मोठ्या काळ्या डागावरुन काढण्यात आला आहे. ज्या बाजुला जहाज हिमनगाला ठोकलं होतं त्याच जहाजाच्या मागच्या बाजुला हे काळे डाग दिसले.

बॉयलर रूमच्या मागे असलेल्या इंधनाच्या स्टोरमध्ये ही आग लागली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे.

जहाजावरील १२ लोकांनी ही आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण एव्हाना खूप उशीर झाला होता. ती आग आटोक्यात येण्याच्या पलीकडे गेली होती. या आगीमुळे तापमान तब्बल १००० डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचल्याचा दावा केला जात आहे.

संशोधकांच्या या निष्कर्षाचा सबळ पुरावा म्हणजे ज्या कंपनीने टायटॅनिक बनवली त्या कंपनीचे अध्यक्ष जे. ब्रूसने यांचे विधान होय! ते म्हणाले,

जहाजवर कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आलं होतं की जहाजामध्ये लागलेल्या आगीबाबत प्रवाश्यांना काहीही कळता कामा नये.

 

titanic-marathipizza01

स्रोत

टायटॅनिकबद्दल अजून अनेक जणांचे अनेक तर्कवितर्क आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात संशोधकांच्या पेटाऱ्यातून काही वेगळे निष्कर्ष बाहेर आले तर त्यात नवल वाटायला नको!

===

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?