' फुकट इंटरनेट वापरताय, मग या ९ गोष्टी तुम्ही नक्कीच जाणून घेतल्या पाहिजेत! – InMarathi

फुकट इंटरनेट वापरताय, मग या ९ गोष्टी तुम्ही नक्कीच जाणून घेतल्या पाहिजेत!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आजकाल अन्न, वस्त्र, निवारा याबरोबरच आणखी एक गरज निर्माण झाली आहे ती म्हणजे वायफाय. मंडळी, या इंटरनेटशिवाय आपलं पानही हालत नाही. इंटरनेट नसेल तर जणू काही विश्वच नाही अशी आपली तऱ्हा झाली आहे.

 

internet-speed-test-inmarathi

 

त्यातून जर आपण एखाद्या ठिकाणी गेलो आणि फ्री वायफाय मिळालं तर अगदी ‘सोने पे सुहागा’ अशी आपली स्थिती होते. कारण मोबाईल डेटा पेक्षा वायफायचा स्पीड चांगला असतो. हल्ली सार्वजनिक ठिकाणी ‘फ्री वायफाय’ असे बोर्ड लावलेले आपल्याला दिसतात.

बुक कॅफे, मोठी हॉटेल्स, विमानतळ, कॉलेजीस या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध असतेच, पण आता तर अगदी छोट्या-छोट्या हॉटेलांतूनसुद्धा ही सुविधा दिसून येते.

पण मंडळी, हे फ्री वायफाय घेताना जरा जपून. यामधून काही गंभीर गोष्टी घडू शकतात. तर आपण पाहुया या फ्री वायफाय म्हणजेच सार्वजनिक विनामूल्य वायफाय चे दुष्परिणाम:

सार्वजनिक वायफायचे दोन प्रकार आहेत सुरक्षित आणि असुरक्षित.

असुरक्षित नेटवर्क श्रेणीमध्ये कोणत्याही सांकेतिक शब्दाशिवाय म्हणजेच आपण ज्याला पासवर्ड म्हणतो त्या पासवर्डशिवाय आपण नेटला कनेक्ट होऊ शकतो.

दुसरा प्रकार म्हणजे सुरक्षित नेटवर्क त्यामध्ये नेटवर्कशी कनेक्ट होण्यासाठी पासवर्ड टाइप करणे आवश्यक आहे. किंवा सुरक्षित नेटवर्कद्वारे लॉगीन होता येतं. त्यासाठी तुम्हाला कोड दिला जातो.

 

 

तर असं सार्वजनिक नेट वापरताना आपल्याला थोडी नव्हे खूप काळजी घेतली पाहिजे. जेव्हा तुम्ही असुरक्षित किंवा अगदी सुरक्षित नेटवर्क्सवर पण सार्वजनिक वायफाय वापरत असाल तर वैयक्तिक बँक खाती किंवा संवेदनशील अशा वैयक्तिक डेटा ओपन करू नका.

कारण आपलं खातं हॅक होऊ शकतं. यातून गैरप्रकार होऊन आपल्या खात्यातील रक्कम काढली जाणे किंवा आपला महत्त्वाचा डेटा जो गुप्त असायला हवा तो इतर कुणालाही समजू शकतो.

जेव्हा तुम्ही अपरिचित ठिकाणी प्रवेश करत असाल तेव्हा तुम्ही तुमच्या मोबाईलला, टॅबला किंवा लॅपटॉपला असं सेटिंग ठेवा की तो तुमच्या अनुमतीशिवाय तिथल्या वायफायला कनेक्ट होणार नाही.

विनामूल्य सार्वजनिक वायफाय हॉटस्पॉटची संख्या वाढत आहे, परंतु प्रत्येक हॉटस्पॉट सुरक्षित असेलच असं नाही. त्यासाठी कोणती काळजी घेता येईल ते आपण पाहू.

१. शेअरिंग सुरक्षा नियंत्रण

आपल्या घरी आपल्या वायफाय नेटवर्कमध्ये आपण म्युझिक फाईल्स, प्रिंटर किंवा महत्त्वाच्या फाईल्स शेअर करू शकता तसंच दुसऱ्या कॉम्प्युटरद्वारे रिमोट लॉगीनला सुद्धा परवानगी देऊ शकता.

 

Wifi Dabba.Inmarathi2

 

जेव्हा तुम्ही सार्वजनिक वायफायला जोडले जाता त्यावेळी वरील सर्व सेटिंग्ज डिसेबल करा. जेणेकरून दुसरी कुठली व्यक्ती तुमचा कॉम्प्युटर अॅक्सेस करून हॅक करू शकत नाही.

२. व्हिपीएनचा वापर करा.

सार्वजनिक नेटवर्कवर ब्राऊझर करण्याचा सर्वांत सुरक्षित मार्ग म्हणजे व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क वापरणे.

व्हीपीएनमुळे जरी तुम्ही सार्वजनिक वायफाय वापरत असाल तरीदेखील सर्व सुविधा एका सुरक्षित नेटवर्कमधून पुरविल्या जातात अर्थात व्हीपीएनमुळे सार्वजनिक नेटवर्क वापरतानादेखील खाजगी सुरक्षित नेटवर्कच्या सुरक्षा पुरविल्या जातात.

काही व्हीपीएन सर्व्हिसेस मोफत उपलब्ध आहेत, परंतु पैसे भरून मिळविलेल्या व्हिपीएनच्या सर्व्हिसमध्ये कनेक्शन चांगलं राहातं.

 

vpn-inmarathi.jpg

 

त्यामुळे जर तुम्ही कामानिमित्त सार्वजनिक नेटवर्क नेहमीच वापरत असाल तर तुमची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी व्हिपीएनचा वापर करणं हा एक चांगला उपाय आहे.

३. वायफाय हॉटस्पॉट नियंत्रण

आपले स्मार्ट फोन, टॅब्लेट बरेचदा आपोआप उपलब्ध असलेल्या कुठल्याही वायफाय हॉटस्पॉटला जोडले जाऊ शकतात. अशा प्रकारचं सेटिंग आपल्या डेटा सुरक्षिततेसाठी अतिशय घातक आहे.

तुम्ही तुमच्या मोबाईलला असं सेटिंग ठेवा की तो हॉटस्पॉटशी कनेक्ट होताना तुमची परवानगी घेईल.

बऱ्याच नवीन फोनमध्ये हा ऑप्शन बाय डिफॉल्ट डिझेबल केलेला असतो, परंतु नेहमीच असे नसते आपण नेहमीच हे सेटिंग पुन्हा पुन्हा तपासले पाहिजे. हे कसं करायचं तर प्रथम आपण आपल्या फोनच्या सेटिंग्ज अॅपचा वायफाय विभाग उघडा.

 

wifi hotspot inmarathi

 

आपल्याला स्वयंकनेक्टिंग अक्षम करण्याचा पर्याय दिसत नसल्यास, आपण आधीपासूनच सुरक्षित आहात, अन्यथा हे सेटिंग बंद करा.

४. एचटीटीपीएस वापरा

नियमित वेबसाइट साध्या मजकुरात माहिती पाठवते, ज्यामुळे आपल्या नेटवर्कमध्ये हॅक केलेले कोणीही हे सहजी वापरू शकते.

हस्तांतरण डेटा एन्क्रिप्ट करण्यासाठी अनेक वेबसाइट एचटीटीपीएस वापरतात, परंतु आपण संरक्षित ठेवण्यासाठी वेबसाइट किंवा वेब सेवेवरच अवलंबून राहू नये.

आपण हे एन्क्रिप्टेड कनेक्शन एचटीटीपीएस या ब्राऊझरद्वारे सगळीकडे वापरू शकतो.

 

https inmarathi

 

एचटीटीपीएसमुळे कनेक्शन सुरक्षित होतात आणि कोणीही डेटा चोरण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या हाती काही लागणार नाही.

५. दोन घटक प्रमाणीकरण

टू फॅक्टर प्रमाणीकरण म्हणजे खात्यात लॉग इन करण्यासाठी आपल्याला दोन प्रकारच्या माहितीची आवश्यकता असते. एक म्हणजे आपल्याला माहिती असलेल्या गोष्टी आणि दुसरी म्हणजे आपल्याकडे असलेली.

थोडक्यात पासवर्ड व मोबाईलवर पाठवण्यात येणारा ओटीपी किंवा कोडवर्ड.

बऱ्याचशा सेवांमध्ये आणि वेबसाइटमध्ये हे टू फॅक्टर ऑथेंटीकेशन वापरले जाते.

 

two step verification inmarathi

 

यामुळे सार्वजनिक वायफाय नेटवर्कचा गैरवापर करून कुणीही तुमचा पासवर्ड जरी मिळवला तरी देखील तो तुमच्या अकाऊंटमध्ये लॉगीन करू शकत नाही.

जीमेल सारखी प्रचलित मेलसुविधा देखील ही सुविधा वापरते.

६. नेटवर्कचं नाव नीट तपासून पाहा

कधीकधी हॅकर्स विनामूल्य वायफाय मिळणाऱ्या ठिकाणी स्वत:चं बनावट वायफाय नेटवर्क तयार करतात आणि आपण खरं नेटवर्क सोडून बनावट नेटवर्कला जोडले जातो.

 

secure wifi featured inmarathi

 

बनावट नेटवर्कशी आपण जोडले जाणे म्हणजे आपला डेटा अयोग्य माणसांच्या हाती लागणे. जर तुम्हाला खात्रीपूर्वक कनेक्शनचं नाव माहीत नसेल तर तिथल्या संबंधित व्यक्तीकडून तुम्ही ते जाणून घ्या आणि योग्य नेटवर्कला कनेक्ट व्हा.

७. पासवर्डला सुरक्षा

आपण आपल्या प्रत्येक खात्यासाठी वेगवेगळे पासवर्ड वापरले पाहिजेत. पण वेगवेगळे सांकेतिक शब्द लक्षात ठेवणे जरा कठीण जाते.

 

password inmarathi

 

म्हणून त्यासाठी कीपास किंवा लास्टपास यासारख्या पासवर्ड मॅनेजर अॅप्लीकेशनचा वापर करून आपल्याला आपला पासवर्डस् सुरक्षित ठेवता येतो.

कीपास आणि लास्टपास हे दोन्ही विनामूल्य आहेत. दोन्ही सेवा पूर्णपणे सुरक्षित आहेत.

८. फायरवॉल सुविधा वापरा

बऱ्याच ओएसमध्ये अंगभूत फायरवॉल आहे, जे इनकमिंग आणि आऊटगोईंग कनेक्शनचे परीक्षण करते. फायरवॉल संपूर्ण संरक्षण करणार नाही, पण हे सुविधा नेहमी वापरात असावी.

 

firewall-inmarathi

 

९. अँटीव्हायरस सॉप्टवेअर वापरा

असुरक्षित नेटवर्कशी कनेक्ट केलेले असताना सगळ्यात मोठा धोका असतो तो व्हायरसचा. आपण आपल्या सिस्टीमशी कधीही तडजोड करू नका. नेहमीच चांगल्या कंपनीचे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर चालू ठेवा.

जर व्हायरस आलाच तर अँटीव्हायरस सॉफ्टवेअर लगेच आपल्याला सूचना करते आणि कॉम्प्युटरचा त्यापासून बचाव करते.

तर आपण या मार्गातून सार्वजनिक वायफायपासून आपला डेटा तसंच आपल्या डिव्हाइसचे सुद्धा संरक्षण करू शकतो. नेट न वापरणे आता कोणाला शक्य नाही कारण आपल्या बऱ्याच गोष्टी नेटवरच अवलंबून असतात.

 

antivirus inmarathi

 

आता तर बँकांचे व्यवहार सुद्धा जास्तीत जास्त ऑनलाइनच होतात. ऑनलाइन हा वेळ वाचवण्याच्या दृष्टीने खरंतर चांगला पर्याय आहे. पण जसं की प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात एक चांगली एक वाईट.तसंच ऑनलाइन हॅकींग ही गोष्ट खूप वाईट आहे त्यापासून जपून राहिलं की झालं.

आजकालच्या युगात, आपल्याला इंटरनेट शिवाय, एक मिनिट देखील स्वस्थ बसवत नाही. जेव्हा हे इंटरनेट फ्री मिळतं, तेव्हा तर आपण कोणताही विचार न करता ते अमर्याद रीत्या वापरत जातो.

पण मित्रांनो, हे लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा आपण इंटरनेट आणि इंटरनेट वरील वेगवेगळ्या वेबसाईट आणि त्यावरील सर्विसेस वापरत असतो तेव्हा आपली माहिती त्या वेबसाईट ला फुकटात पुरवत असतो.

उदाहरणार्थ,जेव्हा आपण फेसबुक वर जातो तेव्हा आपली सर्व पर्सनल माहिती, दुकान मांडल्या सारखी, अख्ख्या जगाच्या समोर ठेवतो. जर तुम्ही गुगल वर जाऊन एखादी गोष्ट सर्च केली, तर तुमच्या मनात काय चाललंय, तुम्हाला कोणती वस्तू विकत घ्यायची आहे, हे गुगलला आपण फुकटात माहित करून देतो.

मग हीच माहिती, व्यावसायिकांना विकली जाते, ज्या तुमच्यावर जाहिरातींचा आणि spam चा भडीमार करतात.

तेव्हा इंटरनेट वापरताना काळजी घ्या आपली वैयक्तिक माहिती जपून ठेवा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?