' अबब, असं नेमकं काय घडलं की या तरुणांच्या डोक्यावर अचानक शिंग फुटली – InMarathi

अबब, असं नेमकं काय घडलं की या तरुणांच्या डोक्यावर अचानक शिंग फुटली

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आधुनिक जीवनशैलीत मोबाईलचा वापर अनिवार्य झाला आहे.

तंत्रज्ञानातील या नवीन शोधाने माणसाचे जीवन इतके व्यापून टाकले आहे की पंचेंद्रियांइतकेच हे यंत्र मानवी आयुष्यात महत्वाचे स्थान पटकावून बसले आहे.

 

using mobile inmarathi

 

==

हे ही वाचा : खिशातला फोन व्हायब्रेट झाल्याचा भास होतोय? सावधान – तुम्हाला “हा” सिन्ड्रोम झालाय!

==

मोबाईलमुळे जग लहान झाले, नेटच्या मदतीने हवी असलेली माहिती चुटकीसरशी मिळू लागली, कित्येक अवघड गोष्टी सोप्या झाल्या हे खरे. पण त्याचा अतिवापर झाल्याने जे काही नुकसान झाले आहे, किंवा होत आहे त्याकडे देखील डोळेझाक करून चालणार नाही.

यापूर्वी आपण कित्येक व्हिडीओ पाहिलेत. मोबाईलचे दुष्परिणाम विदित करणारे.

मोबाईल हातात आल्यावर शांत होणारे बाळ, सतत मोबाईल वापरल्याने मेंदुवरचे नियंत्रण सुटून नशेत असल्याप्रमाणे चालणारा मुलगा यांचे व्हिडिओ व्हायरल झालेत.

डोळ्यांची कमी होत जाणारी दृष्टी, खिशात फोन ठेवल्यास हृदयाला निर्माण होणारा धोका, सातत्याने फोन कानाला लावून बोलल्यास असणारा ट्युमरचा धोका, डोक्याच्या केसांपासून नखापर्यंत प्रत्येक अवयव या यंत्राच्या वापराने प्रभावित होतो हे सांगणारे अनेक शोध पुढे आले आहेत.

माणसाचे आचार, विचार, राहणीमान, आरोग्य या साऱ्यांवर या छोट्या, हाताच्या तळव्यात मावू शकेल इतक्या लहान यंत्राने अतिक्रमण केले आहे. आणि आता तर असे संशोधन झाले आहे की हा फोन तुमच्या शरीराच्या आंतररचनेत देखील बदल करत आहे.

 

human hornes 1 inmarathi

 

आश्चर्य वाटले ना? पण कल्पना करा. अचानक तुमचे डोके दुखू लागले आणि कारणांचा शोध घेता यावा म्हणून काढायला लावलेल्या एक्स रे मध्ये, तुमच्या कवटीच्या मागच्या बाजूला शिंगासारखे एक हाड वाढत आहे असे आढळले तर? काय असेल तुमची प्रतिक्रिया?

लहानपणी डोक्यावर डोके आपटले तरी आता आपल्याला शिंगे येणार अशी भीती कोणी घातली तर तुम्ही त्यावर विश्वास ठेवला असेल ना? ती तर केवळ गंमत होती. पण हे जे सिद्ध झाले आहे, ते संशोधनाच्या आधारे सिद्ध झाले आहे. ती गंमत नव्हे !

ऑस्ट्रेलियामधील क्वीन्सलँड येथील सनशाईन कोस्ट विद्यापीठातील संशोधकांच्या जोडीने मोबाईलच्या वापराने शरीररचनेत होणाऱ्या या बदलावर प्रकाश टाकला आहे.

या शोधात काही तथ्य नाही अशी टीका यावर झाली असली तरी या शोधनिबंधाच्या लेखकांनी उपस्थित केलेले काही मुद्दे विचारात घेण्यासारखे आहेत.

डेव्हीड शाहर, हे संशोधन करणाऱ्या दोघांपैकी एक व्यक्ती एकूणच सर्व घडामोडीबद्दल चिंता व्यक्त करताना म्हणतात,

‘आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यावरच जर या समस्या उद्भवत असतील, तर तरुण पिढीसाठी भविष्यात अजून काय राखून ठेवले आहे हा प्रश्न काळजी निर्माण करणारा आहे’.

कवटीच्या मागे वाढत जाणारे हे हाड कोणाला पक्ष्याच्या चोचीसारखे दिसेल, कोणाला शिंगासारखे तर कोणाला हूकच्या आकाराचे दिसेल, प्रत्येकाच्या कल्पनाशक्तीप्रमाणे प्रत्येकजण त्याला वेगळे नाव देईल, पण मूळ समस्या तीच आहे.

 

==

हे ही वाचा :  दारू, सिगारेट नव्हे तर `ही’ ७ व्यसनं तुमचा घात करू शकतात

==

अशा प्रकारे शरीरात व्यंग निर्माण होत असेल तर हे भविष्यातील गंभीर समस्येचे लक्षण आहे. यामुळे दीर्घ काळ डोकेदुखी, मानदुखी तसेच पाठीचा वरचा भाग दुखणे या तक्रारी उद्भवत राहतील.

मार्क सेयर्स, डेव्हिड शाहर बरोबर काम करणारे सहलेखक म्हणतात, ‘कवटीमागे उगवू पाहणारे हे शिंग म्हणजे एका प्रकारे तुमच्या शरीरात अंतर्गत काही बिघाड होऊ पाहत आहे हे सांगणारी धोक्याची घंटाच आहे’.  डोके आणि मान यांची व्यवस्थित जुळवलेली रचनाच बिघडत आहे असा याचा अर्थ आहे.

या साऱ्याच्या निष्कर्षापर्यंत त्यांना घेऊन गेले त्यांच्या समोर पडलेले काही एक्सरेंचे ढीग. या एक्स रेज मध्ये स्पष्टपणे डोक्याच्या मागील भागात वाढलेले हे शिंगस्वरूप हाड दिसत होते.

या अगोदर असे एक्स रे कोणी पाहिले नव्हते असे नाही, पण या अगोदर ज्या रुग्णांच्या मध्ये ही समस्या आढळली ते वयोवृद्ध होते. त्यामुळे अशा प्रकारे निर्माण होणारी विकृती वाढत्या वयाचा दोष आहे असे मानले जात होते.

पण समोर पडलेल्या एक्स रेज च्या ढिगातून शाहरला आढळले की तरुण पिढी मध्ये पण ही समस्या उद्भवत आहे.

त्यांनतर कारणांचा शोध घेत असताना जे अभ्यासपूर्ण संशोधन झाले, त्यात असे आढळून आले की हे कोणत्या अनुवंशिकतेमुळे होत नाही तर मोबाईलच्या स्क्रीनवर काय चालले आहे हे पाहण्याकरता ही तरुण मुले मुली ज्या चुकीच्या पद्धतीने बसतात त्यामुळे झाले आहे.

 

human hornes inmarathi

 

डोके पुढे घेऊन, मान खाली झुकवून सातत्याने मोबाईलच्या स्क्रीनकडे बघण्याने संपूर्ण ताण पाठीवर, मानेवर नि खांद्याच्या मसल्स वर येतो. चॅट, पब जी सारखे गेम्स, पोर्न फिल्म्स, यांसारख्या मायाजालात गुंतून तंत्रज्ञानाने माणसाला एका जागी खिळवून ठेवले आहे.

अलगदपणे सिस्टम मध्ये येऊन बसणाऱ्या व्हायरसप्रमाणे ही यंत्राची अनिवार्यता विषारी द्रव्यासारखी रक्तात भिनत चालली आहे.

अशा परिस्थितीत तरुण पिढी स्वतःला मोबाईल पासून दूर ठेवू शकेल? कितीही कौन्सेलिंग केले, शिबिरे भरवली तरी मोबाईलची अपरिहार्यता त्याच्या दुष्परिणामांसह मनुष्याने स्वीकारली आहे.

त्यामुळे तरुण मुले मोबाईल दूर ठेवतील हा आशावाद दूर ठेवून त्यातल्या त्यात परिणामांची तीव्रता कमी होईल अशा उपाययोजना करता यायल हव्यात. म्हणून शाहर लोकांना आवाहन करत आहे की आपल्या आरोग्याची काळजी आपणच घ्यायला हवी.

 

india mobile internet-inmarathi

 

१९७० मध्ये जसे दाताच्या आरोग्याबद्दल जागृती होऊन सवयींमध्ये शिस्तबद्धता आणली गेली, रोज दात घासणे कसे गरजेचे आहे हे विविध माध्यमातून बिंबवले गेले, तसेच या बाबतीत देखील होणे अत्यावश्यक आहे.

शाळांमधून मोबाईल वापरताना आपली बैठक कशी असावी, मान, खांदे, डोके यावर कमी ताण पडून शरीर रचना बिघडणार कशी नाही याची प्रात्याक्षिके द्यायला हवीत, यंत्राने तुमचा पैसा, वेळ, झोप, मनःस्वास्थ्य सारेच ताब्यात घेतले आहे.

==

हे ही वाचा : मोबाईलच्या चार्जिंगप्रमाणेच मेंदू थकल्यावर त्याला रिचार्ज करण्यासाठी १० झक्कास टिप्स!

==

 

kid with mobile inmarathi

 

या दुष्टचक्रातून सुटका करून घ्यायची असेल तर निदान त्याला तुमचे शरीर बिघडवू देऊ नका. काही गोष्टी आपल्या हातात असतात, त्या शेवटपर्यंत आपल्याच हातात ठेवल्या तर यंत्र यंत्रच राहील, राक्षस बनणार नाही.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?