' चटकदार ‘फ्रेंच फ्राईज’चा शोध फ्रान्समध्ये लागलेला नाही! तरीही त्यांना ‘फ्रेंच’ का म्हटलं जातं? – InMarathi

चटकदार ‘फ्रेंच फ्राईज’चा शोध फ्रान्समध्ये लागलेला नाही! तरीही त्यांना ‘फ्रेंच’ का म्हटलं जातं?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

किट्टी पार्टी असो किंवा बर्थडे पार्टी, कॉकटेल पार्टी असो, कॉर्पोरेट पार्टी किंवा छोटासा गेट-टूगेदर! लहानांपासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वांचा लाडका फ्रेंच फ्राईज हा पदार्थ प्रत्येक पार्टीची शान असतो. या शिवाय मॉलला जा की मूवीला फ्रेंच फ्राईज पाहिजेतच.

मस्त सोनेरी रंगाचे खमंग खुसखुशीत फ्रेंच फ्राईज सॉस, केचअप, मेओनीज, बार्बेक्यू सॉस, विविध प्रकारचे डिप्स, कश्याहीसोबत ही खायला अफलातून लागतात.

हे फ्रेंच फ्राईज जगाच्या पाठीवर कुठेही अगदी सहज उपलब्ध होतात. फ्रेंच फ्राईज हे बटाट्यापासून बनवले जाते. हे आपल्या सर्वांना माहीत आहेच. बटाटा हा मूळचा दक्षिण अमेरिकेचा.

पेरू-बॉलिव्हियाच्या सीमेवर तितकाका सरोवराजवळील प्रदेशात सुमारे २००० वर्षांपूर्वीपासून बटाट्याची लागवड झाली.

 

potato origin inmarathi

 

स्पॅनिश दर्यावर्दी लोकांनी १५८७ च्या सुमारास तो युरोपात आणला.

बटाट्यात असलेल्या पोषक घटकांमुळे जगभरात याचा मानवी आहारामध्ये समावेश केला गेला. आणि विविध पद्धतीने बटाटा खाल्ला जाऊ लागला.

पण बोटांच्या आकाराचे बटाट्याचे खमंग-कुरकुरीत फ्राईज बनवण्याची सुरुवात बेल्जियममध्ये झाली. होय शेक्सपिअरनी म्हटल्याप्रमाणे नावात काय आहे! तसे फ्रेंच फ्राईज हे मूळचे फ्रांसचे नसून बेल्जियमचे पदार्थ आहे.

अल्बर्ट वर्डेन या प्रसिध्द शेफनी त्यांचा ‘कॅरमेन्ट फ्रीट्स’ या पुस्तकात म्हंटले आहे की “अमेरिकेत जरी फ्रेंच फ्राईज म्हणत असले तरी या पदार्थाचे मूळ नाव ‘फ्रेंकॉफोन फ्राय’ असे आहे.”

काही तथाकथित मिथकानुसार ‘फ्रेंकॉफोन फ्राय’ चा जन्म बेल्जियमच्या नामुर भागात झाला.

 

burger inmarathi

 

तेथील स्थानिक लोकांना मासे फ्राय करून खाणे खूप आवडत होते. पण १६८० साली हिवाळ्यात मूस नदी पार गोठली गेली. आणि तेथील लोकांना मासे मिळणे कठीण झाले.

त्यामुळे वरचेवर माश्यांऐवजी बटाट्याचे काप तळून खाणे हे त्यांच्या रोजच्या आहाराचे भाग बनले.

अश्या पद्धतीने फ्रेंच फ्राईज/फ्रॅंकॉफोन फ्रायचा जन्म झाला. बेल्जियमकरांनी फक्त फ्रेंच फ्राईजचा शोध लावला नाही तर ‘फ्रेंच फ्राईज’ हे नाव देखिल त्यांच्यामुळेच मिळाले.

पहिल्या महायुद्धादरम्यान फ्रेंकॉफोन भागात अमेरिकी सैनिक तैनात होते. या सैनिकांची मुख्य भाषा फ्रेंच होती. त्यांनीच बटाट्याच्या या पदार्थाला ‘फ्रेंच फ्राईज’ हे नाव दिलेे.

 

frenchfry inmarathi

 

वर नमूद केलेले मिथक जरी खरे असले तरी लीज विद्यापीठाचे प्राध्यापक ‘पियरे लेक्लेर्क’ यांनी आपल्या पाकशास्त्राच्या इतिहासाच्या लेखात लिहिले आहे की ‘नामुर-आधारित कथा जरी सत्य असली तरी १६८० मध्ये नाही तर १७३९ मध्ये घडली आहे.

कारण १७३५ पर्यंत त्या भागात बटाटे आलेच नव्हते. पियरे लेक्लेर्क याशिवाय अनेकांना फ्रेंच फ्राईजच्या शोधा बद्दलच्या या मिथकावर विश्वास नव्हता. खासकरून फ्रेंच लोकांना.

त्यांच्या मते फ्रेंच फ्राईज सुरुवातीला पॉम-पोंट-नेफच्या स्वरूपात १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात पॅरिसच्या जुन्या पुलावर रस्त्याच्या बाजूला हातगाडीवर विकले जाणारे पदार्थ होते.

पॉम-पोंट-नेफ हे फ्रेंच फ्राईज पेक्षा आकाराने मोठे होते शिवाय फ्रेंच फ्राईज इतके कुरकुरीत देखील नव्हते पण हे देखील बटाट्याचे काप तळून बनवलेले पदार्थ होते.

 

french fry inmarathi

 

१८०२ मध्ये थॉमस जेफर्सन त्यांच्या शेफनी व्हाईट हाऊसमधील पार्टीमध्ये बटाट्याच्या कापाला कुरकुरीत तळलेले पदार्थ सर्व्ह केले गेले होते.

त्या पार्टीमध्ये थॉमस जेफर्सन यांनी या पदार्थाला फ्रेंच फ्राईज असे संबोधले होते. हे देखील नावाच्या उगमाचे एक लिखित संदर्भ मानले जाते.

खरं सांगायचं म्हणजे हे खूप कठीण आहे की फ्रेंच फ्राईजबद्दल मिळालेले लिखित संदर्भ हे पूर्णपणे तळलेल्या बटाट्याच्या कापा संदर्भात होते, की लोण्यात हलके परतवून घेतलेल्या संदर्भात होते!

सध्य स्थितीतल्या फ्रेंच फ्राईजची पहिली लिखित नोंद विसाव्या शतकाच्या सुरुवातीला बेल्जियम गाईड (Treatise on Domestic Economy and Hygiene) यामध्ये सापडते.

पण तरी देखील फ्रेंच फ्राईजचा नेमका शोध कोणी लावला याचं उत्तर देणं तसं कठीणच आहे.

बंगाल आणि ओरिसामध्ये रसगुल्ला कुणाचा यावरुन जितके मतभेद होते, त्याहीपेक्षा अधिक मतमतांतरं आहेत. फ्रेंच फ्राईजच्या मूळ जन्मस्थानाबद्दल.

 

fries inmarathi

 

इतके रुचकर हे फ्रेंच फ्राईज जास्त प्रमाणात खाणे शरिराला पोषक नाहीत ‘ये बहुत नाइनसाफी है’.

फ्रेंच फ्राईजमध्ये भरपूर प्रमाणात फॅट्स आणि मीठ असल्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो शिवाय उच्च रक्तदाब, मधुमेह आणि लठ्ठपणा अशा अनेक शारीरिक व्याधी जडू शकतात.

पण हार्वर्ड विद्यापीठाचे प्रोफेसर टी. एच. चॅन यांच्या म्हणण्यानुसार जर तुम्हाला रोजच्या आहारात फ्रेंच फ्राईजचा समावेश करायचा असेलच तर मोजून फक्त ७ फ्राईज खा. जेणेकरून अपायकारक ठरणार नाही.

तर नुकत्याच झालेल्या योग दिनानिमित्त इतकंच सांगावस वाटतं की जर तुम्हाला फ्रेंच फ्राईज खाऊन तुमच्या जिभेचे चोचले पुरवायचे असतील तर नियमित व्यायाम व योग साधना करा.

कारण काय आहे ना शेवटी कंटाळवाण्या आयुष्याला कुरकुरीत करण्यासाठी फ्रेंच फ्राईज एक उत्तम पर्याय आहे पण जरा तब्येत सांभाळूनच बरं हा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?