' "मोदी जगात भारी!" : माध्यमांनी खातरजमा नं करता व्हायरल केलेला प्रोपागंडा

“मोदी जगात भारी!” : माध्यमांनी खातरजमा नं करता व्हायरल केलेला प्रोपागंडा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

मागील काही दिवसांपासून सोशल मिडीयावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातील एक बातमी व्हायरल होते आहे. त्या बातमीनुसार नरेंद्र मोदींना ‘ब्रिटीश हेराल्ड’ नामक नियतकालिकाने ‘वर्ल्डस मोस्ट पावरफुल मॅन’ हा किताब बहाल केला आहे.

अर्थातच हे जरी सत्य असले कि त्या ब्रिटीश नियतकालिकाने हा किताब बहाल केलेला असला, तरी एक नवीन प्रश्न निर्माण झाला आहे.

तो प्रश्न आहे या नियतकालिकाच्या विश्वसार्हतेबद्दलचा!

 

british herald 1 inmarathi

 

ALT न्यूज ह्या संकेतस्थळाने केलेल्या सत्य पडताळणीत ब्रिटीश हेराल्ड ह्या नियतकालिके संदर्भातील जी महिती उघडकीस आली आहे, ती थक्क करणारी आहे!

सर्वात आधी आपण या संदर्भातली पार्श्वभूमी काय ते जाणून घेऊया.

लोकसभा निवणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश संपादन केले आहे. ह्या अद्वितीय विजयाची जगभरातील नियतकालिकांनी दखल घेतली आहे. प्रत्येक नियतकालिकात त्यानुरूप वेगवेगळी मतमतांतरे नोंदवण्यात आली आहेत.

अनेकांनी ह्य विजयाला धार्मिक उन्मादाचा विजय म्हटले आहे, अनेकांनी ह्या विजयाला मोदींच्या लोकप्रियतेची इष्टापत्ती देखील संबोधलं आहे.

या सर्व नियतकालिकांच्या मंदियाळीत “ब्रिटीश हेराल्ड” नामक एक नियतकालिक, जे दावा करतात कि ते ब्रिटन मधील एक अग्रणी नियतकलिक आहे.

त्यांनी त्यांच्या नियतकालीकाच्या मुखपृष्टावर नरेंद्र मोदींचे छायाचित्र प्रकाशित करत, त्याला ‘वर्ल्डस मोस्ट पावरफुल मॅन’ असे शीर्षक दिले. ज्याला आधार म्हणून त्यांनी एका  सर्वेक्षणातील आकडेवारी प्रकाशित केली.

त्या आकडेवारी नुसार मोदींना जगभरातील प्रमुख नेत्यांपेक्षा जास्त मतं मिळवली आहेत, त्यात मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना पिछाडीवर टाकले आहे.

 

british herald 2 inmarathi
British Herald

आता अर्थातच हि आकडेवारी प्रकाशित झाल्यावर देशभरातील नरेंद्र मोदी समर्थकच नाही तर अनेक केंद्रीय मंत्री आणि खासदारांनी सोशल मिडीयावर ती आकडेवारी प्रसिद्ध केली.

जगभरात मोदींचा गौरव सुरु असल्याची बतावणी करत, भारताला मोदींसारखे सक्षम नेतृत्व  लाभले हे भारताचे अहोभाग्य आहे, असं नमूद केलं. 

मग त्यांचीच री ओढत देश्भारातील प्रसार माध्यमांनी मोदींच्या गौरवाची बातमी देशभरात चालवली. अनेक वृत्त वाहिन्यांनी यावर विविध कार्यक्रम देखिल घेतले. ट्विटरवर मोदींच्या गौरवार्थ ट्रेंड चालवला गेला.

 

british herald 3 inmarathi
ALT News

परंतु ज्यावेळी या ब्रिटीश हेराल्ड नामक तथाकथित अग्रगण्य ब्रिटीश नियतकालिकाची उलट तपासणी ALT न्यूज द्वारा करण्यात आली तेव्हा खरं गौडबंगाल समोर आलं आहे !

तर काय आहे ब्रिटीश हेराल्डचं सत्य ? 

ब्रिटीश हेराल्डच्या ऑनलाईन आवृतीच्या संकेतस्थळावर त्यांनी स्वतःचा उल्लेख जगभरातील माहिती प्रसारण क्षेत्रातील प्रमुख नियतकालीक असा केला आहे.

या संकेतस्थळानुसार ह्या नियतकालिकाचे मालकी हक्क हे “हेराल्ड मिडिया नेटवर्क्स लिमिटेड” ह्या ब्रिटन स्थित कंपनीकडे आहेत.

 

british herald 4 inmarathi
ALT News

ह्या कंपनीची स्थापना २०१८ साली ब्रिटीनस्थित भारतीय वंशाच्या अन्सीफ अश्रफ यांच्याकडून करण्यात आली, त्यांच्या ताब्यात ह्या कंपनीचे ८५ % शेयर्स आहेत.

अहमद शमसुद्दीन नामक भारतीय व्यक्तीकडे ह्या कंपनीचे बाकी शेयर्स असून, ते मूळ केरळचे असून, तिथे कोचीन हेराल्डचे ते मुख्य संपादक आहेत.

ब्रिटीश हेराल्ड हे खरंच अग्रणी नियतकालिक आहे का ? 

ह्या नियतकालीकाने आपल्या संकेतस्थळावर स्वतला जरी अग्रगण्य ब्रिटीश नियतकालिक उल्लेखलं असलं तरी प्रत्यक्षात हे पण एक सफेद खोटं आहे.  ते कसे ते बघून घेऊयात …

१. ग्लोबल अलेक्सा रॅन्कींगमध्ये या मॅगझीनला २८१५८ वे रॅन्कींग आहे. (इंडिया टाईम्सला १९०  वे तर एनडीटीव्हीला हेच रँकिंग ३९५ आहे).

२. ट्विटरवर या मॅगझीनचे केवळ ४१२५ फॉलोअर्स आहेत. (जगप्रसिद्ध बीबीसी किंवा सीएनएनचे फॉलोअर्स मिलीयन्सच्या आकड्यात असतात. विशेष म्हणजे तुलनेत अनेक जिल्हास्तरीय मीडिया एजन्सीजचे फॉलोवर्स जास्त आहेत)

 

british herald 5 inmarathi
Twitter

३. फेसबुकवर या मॅगझीनला फक्त ५७००० फॉलोअर्स आहेत.

४. मोदींबाबतच्या या पॉवरफुल ट्विटला या मॅगेझिनच्या ट्विटर अकाऊंटवरुन केवळ २४२ रिट्विट मिळाले आहेत.

 


दरम्यान, वरील सर्व बाबींमुळे ब्रिटीश हेराल्डला आंतराराष्ट्रीय पातळीवरील नावाजलेलं म्हणणं अतिशयोक्ती ठरेल.

परंतु खरा महत्वाचा मुद्दा वेगळा आहे.

ह्या ब्रिटीश हेराल्ड नामक नियतकालिकेच्या लोकप्रियतेचा बनावटी फुगा फुटल्यानंतर, आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे ते प्रसार माध्यमांनी ह्या नियतकालिकेच्या आधारावर चालवलेल्या बातमीपत्रावर आणि मंत्र्यांनी केलेल्या पोस्ट्स वर.

एकवेळ पक्षश्रेष्ठींची मर्जी राखण्याचा मंत्र्यांचा आणि खासदारांचा प्रयत्न असावा, असं आपण समजू शकतो.

परंतु देशभरातील जनता ज्या प्रसार माध्यमांकडे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून बघते, त्या प्रसार माध्यमांनी कुठलीही खातरजमा न करता ही बातमी चालवणे आणि जनतेची दिशाभूल करणे हे कितपत योग्य आहे?

 

british herald 6 inmarathi
ALT News

 

यावरून भारतीय प्रसार माध्यमांच्या विश्वासार्हतेवर, पुन्हा एकदा, प्रश्नचिन्ह उभे रहात आहे.

ब्रेकिंग न्यूज, व्हायरल न्यूज, “सबसे तेज – सबसे पेहले” च्या स्पर्धेत सर्वच माध्यमं आपली पहिली जबाबदारी – विश्वासार्हता – पणालालावत आहेत. यात आपापल्या समूहाच्या धोरणास अनुकूल बातमी असेल तर ती चटकन दिली जाते, अतिरंजित करून दिली जाते. परंतु या प्रकारामुळे फेक न्यूज सारखा प्रकार established माध्यमांमध्येदेखील सर्रास रुजत चालला आहे ही बाब चिंताजनक आहे.

शिवाय आजपर्यंत कोणत्याही मिडीयाने ‘आम्ही चुकीची बातमी दिली, facts चुकवल्या, निष्कर्ष चुकवले – त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत’ अशी प्रांजळ कबुलीदेखील दिल्याचं कधी घडलं नाही.

एकुणात, ज्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाकडे ‘आम्हाला शहाणं करणारी माणसं’ म्हणून आपण अपेक्षेने बघत असतो, त्यांनाच थोडासा शहाणपणा शिकवण्याची गरज वारंवार अधिरेखीत आहे, हेच काय ते सत्य आहे.

(altnews ने प्रसिद्ध केलेला मूळ इंग्रजी लेख इथे क्लिक करून वाचू शकता.)

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?